राशीभविष्य: सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१

After 30 years Shani will enter in Aquarius these 4 zodiac get progress in career
३० वर्षांनंतर शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार; 'या' ४ राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचा योग

मेष :- उत्साहवर्धक घटना घडेल. दुसर्‍याच्या बोलण्यावर विश्वास ठेवताना काळजी घ्या. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ :- मित्र-परिवारासमवेत वेळ मजेत जाईल. अतिशयोक्ती व अरेरावी केल्यास त्रास संभवतो. आरोप येतील. टीका होईल.

मिथुन :- जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासाचा बेत यशस्वी होईल. खरेदी होईल. मौजमजेत वेळ घालवाल.

कर्क :- मनाची चंचलता वाढेल. आळ आल्याने संताप होईल. नोकरीत कामाचा व्याप व ताप नकोसा वाटेल.

सिंह :- मन उदास राहील. सर्व सुख असूनही मन मात्र खिन्न राहील. सावधपणे प्रसंग निभावून न्या. वाद व तणावाची शक्यता आहे.

कन्या :- जाणूनबुजून कोणाचा अपमान करू नये हे तुम्ही शिकला आहात. शहाणपणाचे वागणेच ध्येय गाठण्यास मदत करणार आहे.

तूळ :- नवीन योजना सफल करता येईल. प्रवासात आनंद मिळेल. मोठे-दर्जेदार परिचय होतील. प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक :- जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. सन्मानाची वागणूक मिळेल. मौज मजेत वेळ जाईल.

धनु :- स्वतःला न मिळणारे सुख इतरांना मिळेल यावर टीका केल्यास वाद होईल. विचारांना व रागाला लगाम घालावा लागेल.

मकर :- अपेक्षित व्यक्तीच्या भेटीने मनाला उभारी येईल. प्रतिष्ठा सांभाळून तुम्ही तुमचे चोचले पुरवा. बुंद से गई हौदसे नही आती!

कुंभ :- इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. चर्चा व संवाद साधता येईल. विचारांची देवाण-घेवाण योग्य प्रकारे होईल.

मीन :- मुलांच्या समवेत वेळ मजेत व्यतीत करता येईल. तुमचे डावपेच यशस्वी होतील. धंद्यात वाढ होईल.