Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 23 नोव्हेंबर 2024

Horoscope : शनिवार 23 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – आपल्या हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. चिकाटी सोडून चालणार नाही. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा लागेल.
वृषभ – गोड बोलून तुमची फसगत होऊ शकते. आपली वस्तू नीट सांभाळा. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
मिथुन – नोकरीत आपला प्रभाव पडेल. धंद्यात फायदा होईल. वादविवादात सहभागी होऊ नका. दिवसभर कामात गुंतून राहाल.
कर्क – जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. नवीन ओळख होईल. आपले आप्तेष्ट भेटतील.
सिंह – तुमच्या क्षेत्रात वर्चस्व वाढेल. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. निश्चयावर ठाम राहा. वैचारिक सैरभैरता टाळावी.
कन्या – गैरसमज वाढू देऊ नका. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. खरेदी कराल.
तूळ – व्यवसायात चांगला लाभ होईल. काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.
वृश्चिक – कुटुंबासाठी खर्च कराल. तुमचा अंदाज योग्य असेल. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ला घ्या. मनाच्या चंचलतेवर मात करावी.
धनु – खंबीरपणाने महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. प्रेमाला चालना मिळेल. भावंडांकडून त्रास संभवतो. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर – अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांची मोलाची मदत मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ – भावना आणि व्यवहारात गुंता होऊ शकतो. आपल्या सरकारी कामाला चांगली गती येईल. कौटुंबिक खर्च वाढता राहील.
मीन – इतरांना मनापासून मदत कराल. नोकरीत काम वाढेल. काळाची पावले ओळखून वागा. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल.

- Advertisment - Maharashtra Assembly Election 2024
- Advertisment - Maharashtra Assembly Election 2024
- Advertisment - Maharashtra Assembly Election 2024