राशीभविष्य: शनिवार २५ फेब्रुवारी २०२३

do you know todays horoscope find out horoscope future

मेष : आत्मविश्वासाने तुमचे मुद्दे मांडता येतील. कोर्ट केस जिंकाल. मैत्रीत आपलेपणा वाढेल.

वृषभ : घरातील वाद वाढेल. मुलांनी चांगली संगत ठेवावी. आई-वडिलांना खोटे कारण देऊ नये.

मिथुन : धंद्यात वाढ करता येईल. घरातील कामे होतील. गोड बोलून कायद्याचे काम करून घ्या.

कर्क : महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन आल्याने तुमचा उत्साह वाढेल. आत्मविश्वासाने कामे होतील.

सिंह : पूर्वी झालेला तणाव मिटवण्याचा मार्ग मिळेल. कोर्टाच्या कामात यश जिद्दीने मिळवता येईल.

कन्या : घरगुती समस्येवर बोलताना प्रश्न वादाकडे जाईल. वाटाघाटीत नाराजी होईल. प्रकृती सांभाळा.

तूळ : ठरविल्याप्रमाणे कामे करता येतील. अपमानाचा त्रास करून घेण्यापेक्षा काम करत रहा.

वृश्चिक : आळसात वेळ व पैसा घालवू नका. पदाधिकार मिळेल. प्रतिष्ठा सांभाळा.

धनु : नातलगांच्या भेटी होतील. शुभ कार्यास जावे लागेल. धंद्यात मोठे काम मिळेल.

मकर : विरोध मोडून काढता येईल. पदाधिकार मिळेल. धंद्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल.

कुंभ : तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. कोर्ट केस संपवणे महत्त्वाचे असेल. त्यानुसार कामास लागा.

मीन : धंद्यात जम बसेल. वर्चस्व वाढेल. पदाधिकार मिळण्याचे आश्वासन मिळेल.