राशीभविष्य: सोमवार, २५ जानेवारी २०२१

राशीभविष्य

मेष – किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवहारात हिशोब नीट करा. वस्तू सांभाळा.

वृषभ – आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. नवीन ओळख होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

मिथुन – महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वरिष्ठांचा सल्ला घ्या. सर्वांची मर्जी राखणे सोपे नसते. धंदा मिळेल गोड बोला.

कर्क – निर्माण झालेली समस्या विचारपूर्वक सोडवता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. थकबाकी वसूल करा. धंदा मिळेल.

सिंह – घरातील व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. खाण्याची चंगळ कराल तर पोट दुखेल. नोकरीत नम्रपणे बोला.

कन्या – नोकरीतील, घरातील समस्या सोडवता येईल. खरेदी करता येईल. स्पर्धा जिंकाल. केस जिंकाल.

तूळ – भावनेच्या भरात एखादे गुपित उघड होऊ शकते. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. साहित्यात प्रगती कराल.

वृश्चिक – महत्त्वाचे काम करून घ्या. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखी होतील.

धनु – नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. प्रेमात यश मिळेल. खरेदी कराल. धंद्यात योग्य निर्णय घेतला येईल.

मकर – तुमचे महत्त्व वाढेल. अधिकार मिळेल. विचारांना चालना मिळेल. धंद्यात वाढ होईल. येणे वसूल करा.

कुंभ – तुमचा मुद्दा पटवून देताना कुणालाही अपमानीत करू नका. यश मिळवा. कोर्टकेसमध्ये सौम्यपणे बोला.

मीन – धंद्यात वाढ होईल. सरकारी कामे करून घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. धरसोड वृत्ती ठेऊ नका.