राशीभविष्यः शनिवार, २० नोव्हेंबर २०२१

मेष :- क्षुल्लक आरोपांचा विचार कराल. किरकोळ दुखापत संभवते. कामाचा व्याप वाढेल. गैरसमज वाढू देऊ नका.

वृषभ :- आप्तेष्ठांच्या भेटी-गाठी होतील. धंद्यात सुधारणा करता येईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.

मिथुन :- नवीन कामाचे पैसे मिळतील. जुना व्यवहार पूर्ण करता येईल. मित्र-परिवाराची भेट होईल.

कर्क :- वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. मनावरील दडपण कमी होईल. जीवनसाथीचे सहाय्य मिळेल.

सिंह :- अचानक तुमचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या अपरोक्ष नवे विधान तयार केले जाईल.

कन्या :- रेंगाळलेले काम मार्गी लागेल. शुभ संकेत मिळेल. घरगुती प्रश्न सुटल्याचा आनंद मिळेल.

तूळ :- एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटेल. नवीन परिचय होईल. धंद्यातील येणे वसूल करता येईल.

वृश्चिक :- भाग्य बदलण्याची आशा निर्माण होईल. सहकार्य मिळेल. कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल.

धनु :- धावपळ, दगदग होईल. उत्साहाच्या भरात मोठे आश्वासन कोणाला देताना विचार करा. थकवा वाढेल. आर्थिक लाभ.

मकर :- तुमच्या शब्दाचा मान सर्वजण ठेवतील. खुशीचे वातावरण राहील. पाहुणे येतील.

कुंभ :- मर्यादा व कायदा याचे पालन करावे लागेल. नकळत चूक होईल. वाद वाढेल. नको ती व्यक्ती तुमचा वेळ घेईल.

मीन :- अपेक्षा वाढतील. व्यवसायात जम बसल्याने त्याचा विस्तार करण्याचा विचार मनात येईल.