मेष : एकाच वेळी अनेक कामे येऊ शकतात. शक्य तितक्या लवकर त्यातील महत्त्वाची कामे पूर्ण करणे योग्य होईल. मित्रांचा पाठिंबा घेणे आवश्यक असेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक अडचण येईल, मात्र तणाव वाढवू नका. धंद्यात प्रगती होईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा उजळेल. लोकसंग्रह वाढेल. थोरामोठ्यांचा परिचय होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. सर्व सोपे नाही. प्रयत्नाने साध्य करता येईल. घरातील कामे होतील. जवळची माणसे मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन लोकांशी ओळख होईल. उत्साह वाढेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. शुभ दि. 17, 20
वृषभ : कार्यक्षेत्रात काही मोठे बदल तुमच्या हिताचे असतील. तुम्हाला याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपले कार्य नेटाने करणे हितावह ठरेल. एखादा नवीन प्रस्ताव येऊ शकतो. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायदा होईल. भागीदाराशी वाद होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर विरोध होईल. तुम्हाला मिळालेले यश इतरांना बोचेल. प्रतिष्ठा राहील. नोकरीत प्रगती होईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. आवडत्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीमुळे काम मिळण्यास फायदा होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांची मदत घेता येईल. शुभ दि. 20, 21
मिथुन : नोकरी आणि व्यवसायात अधिक कष्ट करावे लागतील. तुम्हाला त्यातून चांगले परिणाम नक्कीच मिळतील. तुमच्या कार्यपद्धतीमुळे लोक प्रभावित होतील. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमची प्रतिष्ठा जपा. जवळचे लोक अडथळे आणतील. गुप्त कारवाया होतील. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रियजनांकडून चांगली बातमी येईल. कोणत्याही धार्मिक कार्याची योजना आखताना तुमचा सल्ला घेतला जाईल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. एखादा मोठा निर्णय घ्याल. चांगली संगत सोडू नये. शुभ दि. 16, 19
कर्क : आर्थिक व्यवहारात आपण सावध राहावे. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त होऊ शकते. मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता आहे. संशोधनाच्या कामात दगदग होईल. नोकरीत कायद्याचे पालन करूनच निर्णय घ्या. आवडत्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. घरातील समस्या सोडवता येतील. मनाचा उत्साह वाढीस लागेल. नवीन लोकांचा परिचय होईल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. संशोधनाचे काम लवकरात लवकर संपवा. गुप्तशत्रूंची कारस्थाने ओळखून ठेवा. त्याचा पुढे उपयोग होईल. विद्यार्थी वर्गाला सुयश मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. शुभ दि. 15, 18
सिंह : अनुभवी लोकांची मदत उपयोगी पडेल. लहानसहान गोष्टींचा बाऊ न करता त्याकडे दुर्लक्ष करा. धार्मिक कार्यातून आपणाला आनंद मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. क्रीडा व राजकीय क्षेत्रात यश मिळू शकेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवा. कुटुंबासाठी वेळ द्याल. मित्रांचा सहवास संभवतो. जोडीदाराची साथ मिळेल. धंद्यात चांगली संधी दवडू नका. मेहनत घ्या. मोठे काम मिळेल. घर, जमिनीसंबंधीची कामे करून घ्या. थकबाकी वसूल कराल. शुभ दि. 17, 18
कन्या : परिश्रमाने आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल. अपेक्षितांकडून मदतीचा हात मिळू शकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक वादविवाद होतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. जम बसवता येईल. कोणतीही गोष्ट ताणून न धरता संयमाने तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे पसंत केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य होणे शक्य होईल. थकबाकी वसूल कराल. घरातील समस्या कमी होतील. लोकांची कामे करून लोकप्रियता वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. जोडीदाराचे मत मोलाचे ठरेल. खाण्याची पथ्ये पाळा. शुभ दि. 15, 19
तूळ : आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलल्यास नोकरी, व्यवसाय आदी क्षेत्रात आपण आगेकूच करू शकाल. कधीही आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. नोकरदारांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक तणाव येईल. अपेक्षितांचे सहकार्य लाभल्याने आपले नियोजित कार्य साध्य करू शकाल. धार्मिक कार्यक्रमातून समाधान मिळू शकेल. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. नव्या ओळखींचा लाभ मिळू शकेल. आपले प्रवासाचे बेत साध्य होतील. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्या. शुभ दि. 18, 20
वृश्चिक : कामकाजात तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास बर्याच गोष्टी साध्य करणे शक्य होईल. आपल्या अंगीभूत कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. विविध क्षेत्रात आपण प्रगतीची पावले टाकू शकाल. विरोधकांचा ससेमिरा, आर्थिक प्रश्न व प्रकृतीच्या तक्रारी यांसारख्या गोष्टींतून आपणास मार्ग काढावा लागणार आहे. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करून घ्या. नंतर अडचणी येतील. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. शुभ दि. 16, 19
धनु : एकूण परिस्थिती चांगली वाटली तरी पुष्कळशा अडथळ्यांतून आपणास मार्ग काढावा लागणार असल्याने प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पाऊल टाकणे हितकारक ठरेल. स्वतःच्या विवेकबुद्धीचा योग्य वापर करा. वेळोवेळी वरिष्ठांचा सल्ला घेणे हितकारक ठरू शकते. तुमचा आत्मविश्वास शाबूत राहील. क्षुल्लक वाद वाढवू नका. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावा. राजकीय-सामाजिक कार्यात संमिश्र वातावरण राहील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धार्मिक गोष्टींचा आनंद घेता येईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. शुभ दि. 20, 21
मकर : कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल. प्रकृतीमान ठीक असले तरी पथ्यपाणी सांभाळा. आपणास जीवनात जे काही मिळवण्याची इच्छा असेल त्याला चांगली चालना मिळेल. सामाजिक संपर्क वृद्धिंगत होईल. क्षुल्लक कारणाने घरातील व्यक्तींची नाराजी होऊ शकते. विचारपूर्वक गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला जास्त धावपळ होईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. धंद्यात मेहनत घ्या. वादाला जास्त महत्त्व देऊ नका. विरोधकांना चेतावणी देण्यापेक्षा लोकांना आपलेसे करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. आपली प्रतिष्ठा सांभाळा. शुभ दि. 15, 18
कुंभ : आपण करीत असलेली मेहनत सत्कारणी लागू शकेल. नोकरी-व्यवसायाची वाट सुलभ होईल. स्वतःचे शारीरिक बळ आणि क्षमता शाबूत ठेवू शकाल. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय आणि सामाजिक कार्यात तणाव निर्माण होईल. तुमच्या विरोधात विधान केले जाईल. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल. आपला खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर मोठा व्यवहार करणे ठीक नाही. संशोधनाच्या कामात मेहनत वाढेल. आपल्या ध्येयाचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळेल. शुभ दि. 19, 21
मीन : सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने काम करण्याचा मानस ठेवल्यास आपण यशाचा मार्ग गाठू शकाल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रकृती स्वास्थ्याबाबत जागरूक राहा. प्रगतीची संधी मिळेल. रागावर ताबा ठेवा. धंद्यात मोठे काम मिळेल. कायद्यात राहा. राजकीय-सामजिक कार्यात उत्साह वाढेल. मोठ्या लोकांचे सहाय्य मिळेल. लोकप्रियता वाढेल. आर्थिक लाभ होईल. सप्ताहाच्या मध्यावर काहीशी गोंधळाची स्थिती असल्याने आपण प्रत्येक बाबतीत हुशारीने वागणे हितकारक ठरेल. कुठेही मोठेपणाची भाषा करणे उपयोगी ठरणार नाही. संशोधनात प्रगती होईल. नोकरीत चांगला बदल होईल. शुभ दि. 16, 20