Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यHoroscope : रविवार 23 फेब्रुवारी ते शनिवार 01 फेब्रुवारी 2025

Horoscope : रविवार 23 फेब्रुवारी ते शनिवार 01 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष :- आर्थिक बाजू सावरता येईल. उत्पन्नांचे स्रोत सापडू शकतील, मात्र प्रलोभने, कुसंगतीपासून दूर राहणे हितकारक ठरणार आहे. प्रकृतीबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. सतत चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मोठे निर्णय विचारपूर्वक, तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणेच योग्य ठरेल. कामाचे प्रमाण वाढणार आहे. गोंधळाची स्थिती असल्याने प्रत्येक बाबतीत हुशारीने वागणे हितकारक ठरणार आहे. जे मिळेल ते स्वीकारा आणि अधिकासाठी प्रयत्नशील राहा. सध्या गुंतवणूक टाळणे योग्य राहील. आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. शुभ दि. 26, 28

वृषभ :- आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलल्यास आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे पसंत केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य होणे शक्य होईल. नोकरी, व्यवसाय, क्रीडा क्षेत्रात आगेकूच करू शकाल. स्वतःबाबत दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. प्रलोभने टाळा. सरकारी नियम कटाक्षाने पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विरोधकांचा ससेमिरा, आर्थिक प्रश्न आणि प्रकृतीच्या तक्रारी यांसारख्या गोष्टींतून आपणास मार्ग काढावा लागणार आहे. वादाचे, मतभेदाचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रकृतीस्वास्थ्याला अधिक प्राधान्य द्या. नातलगांकडून भावनिक आधार मिळू शकेल. शुभ दि. 24, 1

मिथुन :- कला क्षेत्रातील व्यक्तींना आपले कौशल्य, कर्तृत्व दाखवता येईल. प्रवासाचे योग येतील. महिलांच्या अंगीभूत कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. घरगुती शोभेच्या वस्तू खरेदी करण्याचा आपला मानस राहील. कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल. प्रकृतीमान ठीक असले तरी पथ्यपाणी सांभाळा. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. कामाचे योग्य नियोजन यशदायी ठरू शकते. आर्थिक बाजू ठीक राहील. विरोधकांची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. विद्यार्थीवर्गाला अध्ययनात प्रगती करता येईल व यशाची अपेक्षा ठेवता येईल. शुभ दि. 23, 28

कर्क :- सामाजिक संपर्क वृद्धिंगत होईल. विचारपूर्वक गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत जागरूक राहा. मतभेद टाळा. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरू शकेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. कोणत्या नात्याला किती महत्त्व द्यावयाचे हे लक्षात असू द्या. स्वतःचे शारीरिक बळ आणि क्षमता शाबूत ठेवू शकाल. धार्मिक गोष्टींचा आनंद घेता येईल. नोकरी-व्यवसायाची वाट सुलभ होईल. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रवासात सावधानता बाळगा. कोणतीही गोष्ट ताणून न धरता संयमाने तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. मित्रांकडून अपेक्षित मदत मिळू शकेल. शुभ दि. 27, 1

सिंह :- आपल्या अनुभवांचा योग्य वापर केल्यास त्याचा लाभ घेता येईल. प्रवासाचे बेत साध्य होतील. आपल्या कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. नव्या ओळखीचा लाभ मिळू शकेल. वरिष्ठांचा सल्ला घेऊन काम करणे हितकारक ठरू शकते. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. भावी काळाचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. नोकरी-व्यवसायात सुलभता जाणवू लागेल. अपेक्षितांकडून आपणास मदतीचा हात मिळेल. काही जुनी येणे येण्याची शक्यता आहे. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. शुभ दि. 23, 24

कन्या :- कामाचे नियोजन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कामकाजात तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास बर्‍याच गोष्टी साध्य करणे शक्य होईल. मेहनत सत्कारणी लागू शकेल. परिश्रमाने आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल. धार्मिक कार्यक्रमातून समाधान मिळू शकेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवा. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पुढील काळाचा विचार करून कार्याचे नियोजन करा. जोडीदाराचे मत मोलाचे ठरेल. शुभ दि. 25, 28

तुळ :- एकूण परिस्थिती चांगली वाटली तरी पुष्कळशा अडथळ्यांतून मार्ग काढावा लागणार असल्याने प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पाऊल टाकणे हितकारक ठरणार आहे. स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा. सकारात्मक ऊर्जेने व उत्साहाने काम करण्याचा मानस ठेवल्यास यशाचा मार्ग गाठू शकाल. तुमच्या विचारातील सर्जनशीलता, वरिष्ठांची कृपा, कामाची एकाग्रता प्रामुख्याने कामाला चालना देऊ शकेल. कामाचा भार वाढला जाईल. आपल्या प्रकृतीबाबत चालढकलपणा न करता औषधोपचार करा. अहंकाराला मुरड घाला. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. ध्येयाचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. 23, 27

वृश्चिक :- कामकाजात अधिक लक्ष दिल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. शिक्षण क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवता येईल व प्रगती करता येईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळू शकेल. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. सकारात्मक वृत्तीने आणि धैर्याने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाकडून विशेषत: ज्येष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. लहानसहान गोष्टींचा बाऊ न करता त्याकडे दुर्लक्ष करा. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. शुभ दि. 25,1

धनु :- आत्मविश्वासाने आणि कामाची योग्य आखणी करून कार्य केल्यास भावी काळाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. मित्रमंडळींकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. दागिने, हॉटेल व्यवसाय या क्षेत्रात सुलभता जाणवू शकेल. अध्ययन क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल व यशाची अपेक्षा ठेवता येईल. प्रलोभनांपासून दूर राहा. सरकारी कामांना प्राधान्य द्या. आपले प्रकृतीस्वास्थ्य जपा. कुटुंबीय व मित्रमंडळींच्या संपर्कात राहाल. वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. अनेक व्यक्तींशी संपर्क वाढेल व त्याचा लाभ घेता येईल. हाती घेतलेल्या कामात यशाची अपेक्षा ठेवू शकाल. शुभ दि. 24, 28

मकर :- नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. आप्तेष्टांशी, मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणे हितकारक ठरू शकेल. प्रवासाचे योग संभवतात. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. घरात नवीन वस्तूंच्या खरेदीचे बेत आखले जातील. शेतीविषयक कामांना गती मिळेल. घरासंबंधीचे प्रश्न सोडवू शकाल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरू शकेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नये. कामाचा उत्साह असला तरी रागावर योग्य नियंत्रण ठेवावे. व्यापाराला चालना मिळेल. शुभ दि. 26, 01

कुंभ :- सध्या नको ते धाडस करण्याचे कटाक्षाने टाळा. सार्वजनिक कामकाजात आपली वाहवा होण्याची संधी प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे प्रश्न योग्य रीतीने हाताळा. आपल्या प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक ठरणार आहे. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारून आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करणे हितकारक राहील. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सरळ मार्ग स्वीकारूनच पुढे चला. कोणीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. आत्मविश्वासाने वागा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. परोपकाराचे ओझे अंगावर घेऊ नका. शुभ दि. 23, 24

मीन :- आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास टाकू नका. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. विरोधकांची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. प्रकृतीबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. नोकरी-व्यवसायातील धावपळ वाढेल. आपण सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर राहण्याची शक्यता आहे. आपली छाप पाडू शकाल. नियोजित क्षेत्रात अग्रेसर राहण्याची संधी प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत धोके पत्करू नका. शब्दफेक विचारपूर्वक करा. आठवड्याच्या शेवटी जुने येणे येण्याची शक्यता राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. आप्तेष्ठांशी सामंजस्याने वागणे हितकारक राहील. शुभ दि. 25, 01