राशीभविष्य: मंगळवार, 12 एप्रिल 2022

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मैत्रीमुळे समस्येतून मार्ग मिळेल.

वृषभ :- महत्त्वाचे काम करून घ्या. कठीण काम एखाद्या व्यक्तीच्या मदतीने होऊ शकेल. कलेत मन रमेल.

मिथुन :- वरिष्ठांच्या मतानुसार काम करावे लागेल. कामाचा व्याप वाढेल. दगदग होईल.

कर्क :- नोकरीत काम करताना एकाग्रता ठेवा. आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रेमाला चालना मिळेल.

सिंह :- प्रवासात घाई करू नका. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. रागावर ताबा ठेवा.

कन्या :- मुलांची प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल. आजचे काम आजच करून घ्या.

तूळ :- काम करताना मन एकत्र करा. चूक होऊ शकते. शेजार्‍याला मदत करावी लागेल.

वृश्चिक :- अडचणीतून मार्ग काढणारा माणूसच प्रगती करू शकतो. नम्रता ठेवा. नवीन ओळख होईल.

धनु :- धंद्यात प्रगतीकारक घटना घडेल. गोड बोलण्यावर जास्त भाळून जाऊ नका. प्रसिद्धी मिळेल.

मकर :- विचारांना दिशा मिळेल. तुमचा उपयोग झाल्याने मित्रपक्ष तुमचे कौतुक करतील.

कुंभ :- मनावर दडपण येईल. तुमचा विचार सर्वांना पटणे कठीण आहे. प्रवासात घाई करू नका.

मीन :- आजच्या कामात चांगले यश मिळेल. आळस करू नका. धंद्यात फायदा होईल.