Sunday, March 7, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य जाणुन घ्या राशिभविष्य - १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट

जाणुन घ्या राशिभविष्य – १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट

Related Story

- Advertisement -

राशिभविष्य – १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट

मेष ः-

रवि, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहेत. राजकीय-सामाजिक कार्याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या विचारांचा आदर केला जाईल. नोकरीत सप्ताहाच्या सुरुवातीला कामचा व्याप वाढेल. धंद्यात तणाव होईल. तुमच्या गतीनुसार कामगार काम करतीलच असे समजू नका. आर्थिक व्यवहारात स्वतः लक्ष द्या. संसारात जीवनसाथी बरोबर किरकोळ मतभेद होतील. आप्तेष्ठांसाठी प्रवास, खर्च करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगति होईल. कोर्टाच्या वर्गाने मंगळवारपासून यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने प्रेम करण्यात गुंतण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्यावे. संशोधन कार्याला वेग प्राप्त होईल. वरिष्ठ खूश होतील. शुभ दि. 21,22

वृषभ ः-

चंद्र बुध त्रिकोण योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात नवीन काम ओळखीतून मिळू शकेल. नोकरीत सप्ताहाच्या मध्यावर गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या मर्जीचा आदर करावा लागेल. संसारातील समस्या कार्य करता येईल. तडजोड करण्याचा प्रयत्न करा. कला-क्रिडा क्षेत्रात नविन ओळख फायदाची ठरू शकते. कोर्टकेसमध्ये आशा वाढतील. फक्त कायद्याच्या ??? ओलांडू नका. विद्यार्थी वर्गाला प्रयत्नशिवाय चांगले यश मिळणे कठीण आहे. परदेशात जाण्यासाठी योग्य सल्ला घ्या. संशोधनाच्या कामात पुढे जाता येईल. शुभ दि. 24,25

- Advertisement -

मिथुन ः-

चंद्र बुध त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रवेश करून चांगले यश मिळवता येईल. वादाचे प्रसंग निर्माण निर्माण होतील. धंद्यात जम बसेल. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आताच करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशात जाता येईल. घर, वाहन, जमिन इ. खरेदीची संधी मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात कठोर स्पर्धा होईल. नावलौकिक मिळवता येईल. कोर्टाच्या कामात संयमाने मत मांडा. प्रवासात वाहनापासून त्रास संभवतो. संशोधन कामात वरिष्ठ मदत करतील. सरकारी वर्गाला नाराज करू नका. विद्यार्थी वर्गाने नम्रता ठेवावी. शुभ दि. 21,22

कर्क ः-

- Advertisement -

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात कामाचा व्याप वाढेल. आर्थिक मदत मिळेल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व वाढेल. चूका सुधारून अधिक लोकांच्यात सामावून जाता येईल. त्यांचे क्षेत्र मिळवता येईल. योजना तयार करा. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. कल्पनाशक्तिचा न करता मुद्दे मांडा. संघर्ष संपलेला नाही. सप्ताहाच्या मध्यावर ताण वाढेल. विद्यार्थी वर्गाला पास होण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवावा लागेल. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. संशोधन कार्यात यश मिळवता येईल. घरातील समस्या कमी होतील. शुभ दि. 24,25

सिंह ः-

चंद्र शुक्र लाभयोग, सूर्य हर्षल त्रिकोण योग होत आहे. मनावरील ताण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यांत खंबीरपणे काम करावे लागेल. विरोधक तुम्हाला खचविण्याचा प्रयत्न जोरात करतील. प्रतिष्ठा सांभाळता येईल. धंदा कमी झाल्याने चिंता वाटेल. थकबाकी मिळवा. कला-क्रिडा क्षेत्रात थकबाकी जास्त येतील. नोकरीत धावपळ होईल. तुमचे वर्चस्व राहिल. प्रकृतिकडे दुर्लक्ष करू नका. घरातील क्षुल्लक वाद वाढू शकतो. वाटाघाटीत पुढाकार घ्यावा लागेल. नविन खरेदांची संधी मिळेल. पोलीसी संशोधन कार्यात महत्वाचे बाजू लक्षात येईल. विद्यार्थी वर्गाला पुढे जाता येईल. शुभ दि. 21,22

कन्या ः-

चंद्र बुध त्रिकोण योग, चंद्र, मंगळ युति होत आहे. या सप्ताहात कामे करून घेता येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर निष्कारण आरोप करण्याचा प्रयत्न होईल. त्याच स्पष्टपणे उत्तर देता येईल. कुठेही कायदा मोडू नका. धंधाला चांगली बाजार पेठ मिळेल. नविन कंत्राट मिळवता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल फक्त मोठेपणाचा ठेवा न मिटवता वागा. सर्वच ??? होईल. विद्यार्थी वर्गाने चांगल्या संगतीमध्येच रहावे. वडिल माणसांना कमी लेखू नये संशोधन कार्यात प्रगति होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कोर्टाच्या कामात लक्ष द्या. शुभ दि. 20,23

तुला ः-

सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युति होत आहे. या सप्ताहात तुमची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृति संबंधी खाण्याचे पथ्य पाळा. संसारातील घडी नीट बसवता येईल. धंद्यात सुधारणा होईल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना पूर्ण करता येईल. वरिष्ठांच्या बरोबर मैत्रीपूर्ण वातावरण राहील. अधिकार मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नविन ओळख झालेल्या व्यक्तीशी ??? पणे वागा. संशोधन कार्याला दिशा मिळेल. तुमचे कौतुक होईल. शुभ दि. 20,21

वृश्चिक ः-

चंद्र बुध त्रिकोण योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. परिक्षेचा कालावधी सर्वच ठिकाणी असेल. राजकीय-सामाजिक कार्यात जनतेच्या विरोधाचा विचार करा. धंद्यात काम मिळेल. स्वतः कष्ट घ्या. नोकरीत सरळ मार्ग मार्गाने कामात लक्ष द्या. संसारातील गुंता सोडवण्याच्या प्रयत्न करता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतिची संधी मिळेल. तडजोड करावी लागली तरी उत्साह राहिलं. विद्यार्थी वर्गाने यशासाठी प्रयत्न जास्त करावेत. संशोधन कार्यात सहाय्य मिळून शोध घेता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 21,22

धनु ः-

साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. गुरु नेपच्यून त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. आरोप झुकारून नव्या पद्धतीने कार्य करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात वाद, फसगत होऊ शकतो. खर्च वाढू शकतो. संयमाने बोला. डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. घरातील वातावरण चांगले राहिल. नविन ओळख कला-क्रिडा क्षेत्रात महत्वाची ठरेल. प्रगतिची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाला परिक्षेसाठी चांगला सप्ताह ठरेल. संशोधन कार्याला वेग येईल. काम पूर्ण होऊ शकेल. शुभ दि. 23,24

मकर ः-

साडेसातीचे पहिले वर्ष सुरू आहे. माणसाला शहाणपण शिकवणारी वृत्ति शनि ग्रहांची असते. सूर्य, मंगळ बडाष्टक योग, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मागे राहू नका. समोरून भागीदार येतील. सावधपणे व्यवहार करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर ताण, तणाव होईल. तुमच्यावर खोटा आरोप करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. कोणतेही काम लक्ष पूर्वकच करा. कला-क्रिडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धा कठीण असेल. विद्यार्थी वर्गाने कष्ट घ्यावेत. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. संशोधन कार्यात अडचणी येऊ शकतात. तरीही सर्वच ठिकाणी मार्ग मिळू शकेल. अहंपणाची भावना ठेऊ नका. शुभ दि. 19,20

कुंभ ः-

सूर्य चंद्र त्रिकोण योग, शुक्र नेपच्यून बडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील अडचणे दूर होतील. तुमची प्रतिष्ठा पणाला लावून कार्य करता येईल. जवळचे लोक नाराजी दाखवतील. धंद्यात समस्या, खर्च होईल. वाटाघाटीत नाराजी-तणाव संभवतो. कुटुंबात गैरसमज होईल. सप्ताहाच्या शेवटी मनावर एखाद्या प्रश्नाचा दबाव राहिल. कला-क्रिडा क्षेत्रात मैत्रीत वाद होऊ शकतो. दुखापत संभवते. विद्यार्थी वर्गाने अभ्यास बरोबर मौजजमा करावी परंतू चांगली संगत ठेवा. कोर्टाच्या कामात सहाय्य मिळेल. संशोधन कार्यातील मुख्य धागा मिळेल. वरिष्ठ खुष होतील. शुभ दि. 20,21

मीन ः-

सूर्य चंद्र बडाष्टक योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. तुमचे बोलणे प्रभावी ठेवा. धंद्यात मोठे काम मिळेल. पैसे मिळतील. योग्य ठिकाणी कमी गुंतवणूक करा. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठ तुम्हाला बोलावून मोठे काम करावयास सांगतील. सहनशीलता, नम्रता ठेवल्यास तुमचे वर्चस्व अधिक वाढेल. सर्व सोपे समजू नका. कुटुंबात जवळची माणसे मदत करतील. वृद्ध व्यक्तींला कमी समजू नका. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. विद्यार्थी वर्गाने न खचता अभ्यास करावा. यश मिळेल. प्रत्येक दिवस यश देईल. संशोधनात मेहनतीचे फळ मिळेल. शुभ दि. 20,21

- Advertisement -