2023 मध्ये ‘या’ राशींवर असणार राहूची कृपा

ज्योतिष शास्त्रातील नवग्रहांपैकी राहू आणि केतु ग्रहाला पाप ग्रह मानलं जातं. राहू आणि केतु ग्रह नेहमी वक्री चाल चालतात आणि अडीच वर्षामध्ये राशी गोचर करतात. 2023 मध्ये 30 ऑक्टोबर रोजी राहू ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करतील. या आधी 10 महिने राहू ग्रह मेष राशीमध्ये राहिल. अशामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर 2023 पर्यंतची वेळ या 4 राशींसाठी शुभ असणार आहे.

2023 मध्ये ‘या’ राशींवर असणार राहूची कृपा

मिथुन
राहू मिथुन राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळवून देईल. अनेक खर्चांचा सामना करावा लागेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. मांगलिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क
अचानक धन प्राप्त होईल. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळेल. करिअरमधील जबाबदारी वाढेल.

वृश्चिक
राहूची मेष राशीतील वक्री चाल तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. तुमचे विरोधी तुमच्यासमोर हार मानतील. धन लाभ होईल. प्रवास घडतील.

कुंभ
कुंभ राशींच्या व्यक्तींना राहू शुभ फळ देईल. व्यापारात वाढ होईल.नोकरीमध्ये देखील उच्च पद प्राप्त होईल. परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल.