Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीReligious2024 मध्ये 'या' 5 राशींवर असणार शनीच्या साडेसातीचा प्रभाव

2024 मध्ये ‘या’ 5 राशींवर असणार शनीच्या साडेसातीचा प्रभाव

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, 2023 मध्ये शनी ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला असून तो 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. लवकरच 2024 ची सुरुवात होईल. या वर्षी देखील काही राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. या काळात राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

2024 मध्ये ‘या’ राशींना राहा सावध

  • कर्क
    2024 मध्ये कर्क राशीच्या व्यक्तींनी सावध राहावे. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवा. यावेळी तुमचा आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.
  • वृश्चिक
    2024 मध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. कुटुंबात वाद-विवाद होतील.
  • मकर
    2024 मध्ये शनीच्या साडेसातीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल. यावेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत संयम बाळगण्याची गरज आहे.
  • कुंभ
    2024 मध्ये कुंभ राशीच्या डोकं शांत ठेवून कोणतेही काम हाती घ्यावे. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्च वाढतील.
  • मीन
    2024 मध्ये मीन राशीच्या व्यक्तींना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होईल. या काळात खर्चात वाढ होईल.

हेही वाचा : 2024 ची सुरुवात ‘या’ 3 राशींसाठी असणार खास

Manini