Eco friendly bappa Competition
घर भविष्य श्रावणात 'या' ३ राशींवर असणार महादेवांची विशेष कृपा

श्रावणात ‘या’ ३ राशींवर असणार महादेवांची विशेष कृपा

Subscribe

ज्योतिषार्यांच्या मते यावर्षी श्रावण महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फळ देणारा असणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे.

हिंदू धर्मात आणि ज्योतिष शास्त्रात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. असं म्हणतात की श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने ते लवकर आपल्यावर प्रसन्न होतात. ज्योतिषार्यांच्या मते यावर्षी श्रावण महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ फळ देणारा असणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होणार आहे. मात्र भगवान शंकरांचा आर्शिवाद तर सर्व राशींवर असणार आहे. पण या ३ राशींवर भगवान शंकरांची विशेष कृपा असणार आहे.

श्रावणात या ३ राशींना होणार फायदा

  • मेष
    मेष राशींच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना खूप खास असणार आहे. भगवान शंकरांच्या आर्शिवादाने मेष राशींच्या व्यक्तींची अनेक अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. तसेच समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन सुखी राहील, तसेच आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  • कर्क
    भगवान शंकरांच्या आर्शिवादाने कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा श्रावण महिना उत्तम असणार आहे. तसेच आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल, वैवाहिक जीवन सुखी राहील.
  • कन्या
    कन्या राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ असेल. संपत्तीत वाढ होईल, तसेच नोकरी-व्यवसायात प्रगती मिळेल.

हेही वाचा:Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -