Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious मंगळ ग्रहाचे झाले राशीपरिवर्तन; 'या' 3 राशींनी राहा सावध

मंगळ ग्रहाचे झाले राशीपरिवर्तन; ‘या’ 3 राशींनी राहा सावध

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठारावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा सेनापती असणाऱ्या मंगळ ग्रहाने 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीमध्ये प्रवेश केला असून याचा शुभ-अशुभ प्रभाव काही व्यक्तींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. मंगळाच्या या राशीपरिवर्तनाने 3 राशींना पुढचे काही दिवस सांभाळून राहावे लागणार आहे.

‘या’ 3 राशींनी राहा सावध

- Advertisement -

वृषभ

मंगळाच्या कन्या राशीतील राशीपरिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद-विवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

- Advertisement -

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनी याकाळात केवळ आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी वाद-विवाद करु नये. जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव वाढू शकतो.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना देखील नोकरी-व्यवसायामध्ये समस्यांचा सामना करावा लागेल. या काळात कामाच्या ठिकाणी तणाव देखील वाढेल. भावंडांमध्ये वाद होऊ शकतो. त्यामुळे याकाळात जास्तीत जास्त शांत राहावे.


हेही वाचा :

2024 पर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींची होणार चांदी

- Advertisment -

Manini