घरभविष्यआजपासून मंगळ होणार वक्री; 'या' 4 राशींना होणार फायदा

आजपासून मंगळ होणार वक्री; ‘या’ 4 राशींना होणार फायदा

Subscribe

मंगळ ग्रह आजपासून वक्री होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये जेव्हा एखादा ग्रह वक्री होत असेल तर त्याची चाल उल्टी होते. ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मंगळ मिथुन राशीमध्ये संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी वक्री होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीमध्ये मंगळ वक्री झाल्याने काही राशींना त्याचा फायदा होणार आहे. या चार राशींच्या व्यक्तिंना धन, व्यवसाय, करिअर आणि आरोग्यासाठी शुभ परिणाम पाहायला मिळू शकतील.

  • वृषभ
    ग्रहांचे सेनापती मंगळ वृषभच्या दुसऱ्या भावामध्ये वक्री होणार आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हटले जाते. मंगळाची उल्टी चाल सुरु होताच तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये उत्तम परिणाम पाहायला मिळू शकतात. लांबचे प्रवास घडतील.
  • सिंह
    सिंह राशीमध्ये मंगळ 11 व्या स्थानी वक्री होणार आहे. यादरम्यान, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. खर्च कमी होतील. घरातील वृद्धांचे आरोग्य सुधारेल.
  • कन्या
    कन्या राशींमध्ये मंगळ 10 भावात वक्री होणार आहे. नोकरी, व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता. अडकलेले पैसे परत मिळतील.
  • कुंभ
    कुंभ राशीत मंगळ ग्रहाच्या वक्री होण्याने त्यांच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह वाढेल. नोकरी, व्यवसायात यश मिळेल. समस्यांचा अंत होईल.

हेही वाचा :

शनीदेवांच्या राशीपरिवर्तनामुळे ‘या’ 5 राशींना होणार फायदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -