Thursday, June 1, 2023
घर मानिनी Religious 15 मे पासून होणार 'या' दोन ग्रहांचे राशीपरिवर्तन; 'या' 4 राशींचे उजळणार...

15 मे पासून होणार ‘या’ दोन ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ 4 राशींचे उजळणार भाग्य

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य प्रत्येक महिन्याला राशीपरिवर्तन करतो. 15 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच दिवशी बुध देखील मेष राशीत जाईल. तसेच 30 मे शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. या 3 राशींच्या राशीपरिवर्तनाने शुभ योग तयार होऊल. त्यामुळे याकाळात 12 राशींपैकी 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

‘या’ 4 राशींचे उजळणार भाग्य

  • कर्क
- Advertisement -

मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील हे संक्रमण कर्क राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. यादरम्यान, तुम्ही जे काही विचार करता ते तुम्ही साध्य करू शकाल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळवू शकतो तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळेल आणि पगारात वाढ होईल.

  • सिंह

सूर्याचे गोचर सिंह राशीसाठी विशेषतः प्रभावी ठरेल. या काळात तुमची कीर्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळेल. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील.

  • कन्या
- Advertisement -

या संक्रमणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना प्रवास घडतील. शिक्षणात तुम्हाला चांगले यश मिळेल. तुम्ही तुमचे काम समाधानकारकपणे करताना दिसतील. आर्थिक परिस्थितीती सुधारेल.

  • मीन

मीन राशीच्या व्यक्तींना या संक्रमणामुळे अनेक लाभ होतील. शिक्षण क्षेत्रात लक्ष केंद्रित करता येईल. तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. करिअरमध्ये यश मिळवता येईल. पार्टनरसोबतचे नाते चांगले राहिल.


हेही वाचा :

शनिवारपासून सुरु होतोय ‘मृत्यू पंचक’; जाणून घ्या पंचक म्हणजे काय

- Advertisment -

Manini