Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Numerology : खूप आकर्षक असतात 6, 15, 24 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : खूप आकर्षक असतात 6, 15, 24 या तारखेला जन्मलेले लोक

Subscribe

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तुम्हाला मूलांक 6 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 6 , 15 , 24 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे.

मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीमत्त्व

- Advertisement -

Pretty people are perceived to be more intelligent, study shows |  Stuff.co.nz

मूलांक 6 असणारे लोक दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. यांना अनेक मित्र-मैत्रिणी असतात. या व्यक्तींना आयुष्यात आर्थिक परिस्थितीचा फारसा त्रास सहन करावा लागत नाही. हे जन्मतः धनवान असतात. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सहज यश मिळवता येते. यांचे वैवाहिक जीवन सुखमय असते. शिवाय यांना लग्जरी लाइफ जगण्याची आवड असते.

मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

  • मूलांक 6 असणाऱ्या व्यक्तींनी देवी लक्ष्मीची उपासना करावी.
  • प्रत्येक शुक्रवारी देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्यावे.
  • दररोज जास्तीत जास्त पांढऱ्या किंवा हलक्या रंगांचा वापर करावा.
  • प्रत्येक शुक्रवारी घरात तांदळाची खीर बनवावी.
- Advertisement -

 

 


हेही वाचा :

Numerology : अत्यंत बुद्धीमान असतात 5, 14, 23 या तारखेला जन्मलेले लोक

- Advertisment -