ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशिपरिवर्तन होताच सर्व राशींवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. यामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात तर काहींच्या आयुष्यात नकारात्मक प्रभाव पडतो. ऑक्टोबरमध्ये अनेक मोठे ग्रह मार्गक्रमण करतील. 1 ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात सूर्य देखील कन्या राशीतच असेल. ज्यामुळे कन्या राशीत बुध आणि सूर्याची युती होईल. ज्याला बुधादित्य राजयोग म्हटलं जातं.
बुधादित्य राजयोगाचा ‘या’ राशींना होणार फायदा
- मेष
बुधादित्य राजयोगामुळे मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. गुंतवणुकीसाठी खूप चांगला काळ आहे. वाहन, मालमत्ता खरेदी करू शकता. प्रमोशन मिळू शकते.
- वृषभ
बुधादित्य राजयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरीत यश मिळेल. व्यवसायात प्रचंड आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.
- सिंह
ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग सुखमय सिद्ध होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.
- कन्या
बुधादित्य योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील उत्तम राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.
- धनु
हा काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभ करणारा असेल. नोकरीत बढतीसह अचानक आर्थिक लाभ होईल. प्रॉपर्टीच्या कामात संपत्तीत वाढ होईल.