139 दिवस ‘या’ 3 राशींवर असणार शनीची शुभदृष्टी

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे आपल्या निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव स्पष्टपणे 12 राशींवर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच शनीने कुंभ राशीत प्रवेश केला असून 2025 पर्यंत तो या राशीत विराजमान राहील. 5 जून रोजी शनी वक्री होणार आहे. या चालीत शनी 139 दिवस राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ आनंद देणारा आहे. या लोकांना धनलाभ होईल. त्यांची अनेक स्वप्न पूर्ण होतील.

या 3 राशींना होणार फायदा

  • मिथुन

ज्योतिष शास्त्रानुसार शनीची वक्री चाल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देणार आहे. या काळात या लोकांना नशिबाची साथ मिळेल. यांच्या अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

  • तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी देखील शनीची वक्री चाल लाभदायक आहे. यादरम्यान तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तूळ राशीच्या लोकांना लव लाईफमध्ये यश मिळेल. या काळात प्रॉपर्टी, रिअल इस्टेट संबंधी चांगले यश मिळेल.

  • धनु

धनु राशीच्या लोकांना शनीची वक्री चाल लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. परदेशात जाण्याचा विचार करणारे लोक देखील सकारात्मक परिणाम देतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. या काळात बचत करण्यात यश मिळेल.


हेही वाचा :