या राशींमध्ये शनिदेव ६ महिन्यांसाठी होणार विराजमान

कोणताही ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. यानुसार शनि लवकरच त्याची प्रिय राशी असलेल्या मकर राशीमध्ये मार्गक्रमण करत आहे. १२ जुलैला शनि मकर राशीत वक्री होत मार्गक्रमण करणार असल्याने त्याचा सर्वच राशींवर परिणाम होणार आहे. मात्र १२ पैकी ३ राशींना शनिच्या या मार्गक्रमणात धनलाभ होणार आहे. या राशी आहेत मीन, वृषभ आणि धनु.

मीन राशी- शनिदेव मीन राशीच्या ११ व्या स्थानी भ्रमण करणार आहे. जे उत्पन्न आणि लाभाच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. यामुळे याकाळात व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता होते. तसेच उत्पन्नाचे इतर स्त्रोतही निर्माण होतील. तसेच शनिग्रह हा बाराव्या स्थानाचाही स्वामी आहे. परिणामी या काळात मीन व्यक्तीला करियरमध्येही अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. नवीन जॉबची ऑफरही येऊ शकते . तसेच गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे.  मीन राशीवाल्यांना जुन्या दुर्धर आजारांपासून या काळात मुक्ती मिळू शकते. कोर्टाची कामे निकाली लागू शकते.

वृषभ राशी
वृषभेतून शनिदेव नवव्या स्थानी वक्री होत आहे. यामुळे या काळात नवीन नोकरीची ऑफर येईल. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हांला पगारवाढ होऊन बढती मिळेल. तसेच करियरचा आलेखही उंचावेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. या काळात तुमच्या कामाची स्तुती होईल. वृषभ राशीचा शुक्र ग्रह स्वामी तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि शनि ग्रह मित्र आहे. यामुळे शनिचे वक्री होणे वृषभ राशीसाठी लाभदायक आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत.

धनु राशी
शनिदेवाचे वक्री होणे धनुराशीसाठी लाभदायक असेल. कारण शनि धनुराशीच्या कुंडलीच्या दुसऱ्या स्थानात मार्गक्रमण करत आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हटले जाते. यामुळे याकालावधीत अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायातही लाभ होणार असून पैशांचे व्यवहारही मार्गी लागणार आहेत.