घर दिवाळी 2022 Surya Grahan 2022: सूतक काळात करू नका 'या' चुका

Surya Grahan 2022: सूतक काळात करू नका ‘या’ चुका

Subscribe

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दिवशीच सूर्य ग्रहण असणार आहे. यामुळे लोकांवर सूर्यग्रहणाचे दुष्प्रभाव पडणार आहे. सूर्य ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

अश्विन अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. अशामध्ये सूर्यग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे.

- Advertisement -

भारतामध्ये सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी 2 वाजून 29 मिनिटांनी सुरु होणार असून हे संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांपर्यंत असणार आहे. हा ग्रहण काळ जवळपास 4 तास 3 मिनिटांचा असणार आहे.
या सूर्यग्रहणाचा प्रभाव संपूर्ण भारतामध्ये सर्व लोकांवर पडणार आहे.

सूर्यग्रहणाच्या काळात करु नका ‘हे’ काम

  • सूर्यग्रहणाच्या वेळी फक्त वृद्ध, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं सोडल्यास सर्व लोकांनी ग्रहण काळात झोपू नये, काही खाऊ-पिऊ नये.
  • या काळात गर्भवती स्त्रियांनी एका जागी बसावे.
  • सोबतच हनुमान चालिसेचं पठण करावे. यामुळे ग्रहणाचा वाईट परिणाम त्यांच्यावर पडणार नाही.
  • आजारी व्यक्तींनी ग्रहणामध्ये कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. फक्त ग्रहण काळात काहीही खाऊ नये.
  • घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये, दूधामध्ये ग्रहण लागण्यापूर्वीच तुळशीचे पान टाकून ठेवावे.
  • ग्रहण काळात सर्वांनी देवी-देवतेच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करणं शुभ मानलं जातं.
  • तसेच ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करु नये शिवाय कोणतीही खरेदी करु नये.
  • ग्रहणादरम्यान, दात साफ करणं, केस विचरण्यास देखील मनाई केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा :

दिवाळीच्या काळात ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सूतक काळ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -