घरभक्तीचातुर्मासात 'या' ५ राशींवर होणार भगवान विष्णूंची विशेष कृपा

चातुर्मासात ‘या’ ५ राशींवर होणार भगवान विष्णूंची विशेष कृपा

Subscribe

हिंदू धर्मग्रंथानुसार चार्तुमासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते

येत्या १० जुलैपासून चार्तुमास चालू होणार आहे. हिंदू मान्यतेनुसार देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात. तसेच चार महिन्याचा काळ पूर्ण झाल्यावर देवउठनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. कार्तिक एकादशीनंतर मांगलिक कार्य करण्यास सुरूवात केली होते. हिंदू धर्मग्रंथानुसार चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते. ज्योतिषार्यांच्या मते चातुर्मासात या ५ राशींवर भगवान विष्णूंची विशेष कृपा असणार आहे.

- Advertisement -

 

  • मेष
    मेष राशींच्या व्यक्तींसाठी चातुर्मास अत्यंत खास असणार आहे. या काळात मेष राशिंच्या व्यक्तींना खूप यश मिळणार आहे. चातुर्मासाच्या काळात मेष राशीच्या व्यक्तींनी घरात तूपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानले जाते.
  • वृषभ
    वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी चातुर्मास अत्यंत शुभ असणार आहे. भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल.
  • मिथुन
    ज्योतिषार्यांच्या मते मिथुन राशींच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यापारात उत्तम यश मिळेल. या काळात तुम्ही गाईला गोड चपाती खाऊ घाला.
  • कर्क
    ज्योतिषार्यांच्या मते कर्क राशींच्या व्यक्तींसाठी चार्तुमासाचा काळ उत्तम जाईल. मात्र या काळात तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर तुमचे वाद-विवाद होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. चातुर्मासात श्रीरामचरित मानसचे पठण करा.
  • वृश्चिक
    ज्योतिषार्यांच्या मते वृश्चिक राशींच्या लोकांना चातुर्मासात उत्तम यश मिळेल. तसेच अनेक आर्थिक लाभ होतील. चातुर्मासात मंदिराच दान-धर्म करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -