घरभविष्यरविवार ७ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर

रविवार ७ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर

Subscribe

मेष ः- रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे घालवू शकाल. घरात आनंदी रहाल. मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. जीवनसाथीची मर्जी राखता येईल. कला क्षेत्रात मन रमेल. ११ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. चंद्र शुक्र युति होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रेमानेच सर्वांना एकत्र करावे लागेल. जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात यश सोपे नाही. कोर्ट केसमध्ये कटकटी होऊ शकतात. तुमच्यावर तीव्र स्वरूपाचा आरोप केला जाण्याची शक्यता आहे. संशोधनात हस्तक्षेप त्रासदायक ठरेल. शुभ दि. १०, ११

वृषभ ः- रविवार घरात किरकोळ तक्रारी केल्या जातील. मुले तुमच्यावर रागावतील. खर्च वाढेल. महत्त्वाची वस्तू वेळेवर सापडणे कठीण होईल. शेजारी त्रास करण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीत ११ ऑक्टोबरला गुरु संध्याकाळी ७.२० प्रवेश करीत आहे. गुरुबल तुम्हाला मिळेल. त्यामुळे वर्षात अनेक अडचणी कमी होतील. धंद्यात लक्ष द्या. कामगार वर्गाला सांभाळा. मैत्रीत दरार निर्माण होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला जबाबदारीचे काम करावे लागेल. नवरात्रीच्या दिवशी जीवनसाथीचा राग सहन करावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे यश मिळेल. कोर्ट केसमध्ये वरिष्ठांची मदत मिळेल. संशोधन कार्यात तत्परता दाखवा. सहकारी वर्गाची मदत नाकारू नका. शुभ दि. १२, १३

- Advertisement -

मिथुन ः- रविवार उत्साहवर्धक ठरेल. मौज-मजेत वेळ जाईल. निसर्गाच्या सान्निध्यात रहाल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मिथुन राशीच्या षष्ठस्थानात म्हणजे वृश्चिकेत गुरु महाराज ११ ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार आहेत. चंद्र बुध युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करून घ्या. धंदा वाढेल. कष्ट घ्या. आळस करू नका. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्या उपयोगी पडल्यानेच तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्थान स्थिर करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे काम मिळेल. नवीन परिचय फायद्याचा ठरेल. संशोधन कार्यात किरकोळ अडचणींवर मात करू शकाल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. १०,१

कर्क ः- रविवार धंदा जोरात चालेल. घरात आनंदी वातावरण राहील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. किरकोळ वाद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ११ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह वृश्चिकेत प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. सरकारी सहाय्य करतील. धंद्यात मोठे कंत्राट मिळवण्यासाठी चर्चा सफल होईल. नवे संबंध वाढतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती दिसेल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. संसारात शुभ समाचार मुलांकडून मिळेल. घर, वाहन खरेदी करता येईल. शुभ दि. १२, १३

- Advertisement -

सिंह ः- रविवार तुम्ही ठरविलेला कार्यक्रम तुमच्या मर्जीनुसार पार पाडता येईल. नवरात्रीची तयारी व्यवस्थित करू शकाल. धंद्यात वाढ होईल. सिंह राशीच्या सुखस्थानात म्हणजे वृश्चिकेत गुरु महाराज ११ ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत आहे. ओळखीतून मोठे काम मिळवा. नोकरीचा प्रयत्न करता येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. विवाहासाठी स्थळ मिळेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नाव होईल. राहिलेले पैसे वसूल करा. कोर्टाच्या कामाला, राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी अडचणी येऊ शकतात. सावध रहा. यश खेचता येईल. संशोधन कार्यात मार्ग मिळेल. विद्यार्थी वर्गाने चौफेर अभ्यास करावा. शुभ दि. ७, १०

कन्या ः- रविवार तुमचा मूड जाण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणावरून वाद होऊ शकतो. महत्त्वाचे घरातील काम करण्याचा विसर पडू शकतो. ११ ऑक्टोबर गुुरुवार रोजी वृश्चिकेत पराक्रमात येत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात पुढे जाता येईल. झालेल्या चुका, राहिलेली कामे याकडे लक्ष देता येईल. धंद्यात जम बसेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरी मिळेल.
अविवाहितांना लग्नासाठी स्थळे येतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्काराने सन्मान मिळेल. नवरात्री उत्सवात तुमच्या कुुलदेवीची उपासना करा. चांगले यश मिळेल. विद्यार्थी पुढे जातील. शुभ दि. १०,१२

तूळ ः- रविवार तुम्ही महत्त्वाची कामे करायचा प्रयत्न करा. ठरविलेला कार्यक्रम पूर्ण होईल. अहंकार नको, वाद वाढवू नका. ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.२० मिनिटांनी वृश्चिक राशीत गुरू ग्रहाचे राश्यान्तर होत आहे. नवीन क्षेत्रात तुमची प्रगती करण्याची संधी तुम्हाला मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रतेची वागणूक सर्वत्र ठेवा. वरिष्ठांच्या शब्दाचा मान ठेवा. नोकरीत ताणतणाव होईल. कायद्यात रहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी वाट पहा. नवरात्री उत्सवात कुलदेवीची आराधना करा. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ल्यानेच निर्णय घ्या. उतावळेपणा नको. संशोधन कार्यात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. रागावर ताबा ठेवा. शुभ दि. १२, १३

वृश्चिक ः- रविवार हाती घेतलेले काम पूर्ण करू शकाल. घरातील व्यक्तींच्या कामात मदत करा. कुणालाही नाराज करू नका. धंद्यात सावध रहा. ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.२० मिनिटाने तुमच्याच राशीत प्रवेश करीत आहे. वर्षभर तुम्हाला गुरुबल राहील. साडेसाती सुरू आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला तुम्ही अस्थिर व्हाल. मनाची द्विधा अवस्था होईल. रागावर ताबा ठेवा. चिडचिडेपणा करून प्रश्न वाढेल. सुटणार नाही. कोर्ट केसमध्ये यश मिळवण्याची आशा वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात सडेतोड करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्याची काळजी घ्या. संशोधनाच्या कामात यश मिळवता येईल. धंद्यात तुम्ही बेसावध राहू नका. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. शुभ दि. 12,१३

धनु ः- रविवार आप्तेष्ठांच्या सहवासात रहाल. कला क्षेत्रात मन रमेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. कुटुंबातील व्यक्तीच्या बरोबर वेळ मजेत घालवाल. वृश्चिक राशीत ११ ऑक्टोबर रोजी गुरुसारखा मोठा ग्रह प्रवेश करीत आहे. घाई करू नका. धंद्यात वाढ होईल. बेजबाबदारपणे वर्तन केल्यास सर्वांचा त्रास घरात होऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. कामावर लक्ष देत रहा. नोकरीत सावधपणे काम करा. नकळत चूक होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. वाहन जपून चालवा. संशोधनाच्या कामात मनाची द्विधा अवस्था होईल. शुभ दि. ५, १०

मकर ः- रविवार रागावर नियंत्रण ठेवा. वाहनाचा वेग कमी. दुसर्‍याने केलेली चूक सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. ११ ऑक्टोबर रोजी गुरु महाराज वृश्चिकेत प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रगतीवर त्याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही. साडेसाती सुरू आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना मार्गी लावता येईल. प्रतिष्ठेत वाढ होईल. धंद्यात सुधारणा होईल. नवीन परिचय कला क्षेत्रात होतील. घरातील तणाव कमी होईल. चांगली बातमी मिळेल. कोर्ट केसमध्ये दिशा मिळेल. मदत घेता येईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. संशोधन कार्याला वेग येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, नोकरीत बदल करू शकाल. नवरात्रीत कुलदेवतेची प्रार्थना करा. शुभ दि. १०, १३

कुंभ ः- रविवार तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना खूश ठेऊ शकाल. चर्चेत तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. नवीन ओळखी होतील. वृश्चिक राशीत ११ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध, युति आहे. राजकीय सामाजिक कार्यात तुमच्या योजना तयार करा. वरिष्ठांच्या विचाराने पुढे जा. तुमच्यावर आरोप येईल. सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत काम वाढेल. दबाब राहील. घरातील जबाबदारी नकोशी वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट पडतील. प्रसिद्धी मिळवण्याची घाई करून चालणार नाही. संयम ठेवा. विद्यार्थी वेगाने चांगली वाट धरावी. संशोधनात वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. वाहन जपून चालवा. शुभ दि. १०, १२

मीन ः– रविवार ताणतणाव होईल. गैरसमज वाढेल. संसारात नाराजी होईल. बंधु भगिनी यांच्यात वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबर रोजी गुरू महाराज वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तुम्हाला वर्षभर गुरुबल मिळेल. तुमच्या कामाला यश मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांच्या मतांचा आदर करा. प्रगतीचा मार्ग मिळेल. नवरात्रीच्या दिवशी सामाजिक कार्यात तुम्ही शांतपणे निर्णय घ्या. रागावर ताबा ठेवा. तुमच्या कुलमातेची आराधना करा. घरात जवळच्या व्यक्तींना सांभाळून घ्यावे लागेल. खर्च वाढेल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. संशोधन कार्यात यश प्रयत्नाशिवाय नाही. परीक्षेसाठी चौफेर अभ्यास करा. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. १२, १३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -