घरभक्तीसूर्याचे राशी परिवर्तन 'या' 4 राशींना देणार मान-सन्मान

सूर्याचे राशी परिवर्तन ‘या’ 4 राशींना देणार मान-सन्मान

Subscribe

या 17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्याने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सूर्याचे हे परिवर्तन अत्यंत महत्वपूर्ण असून काही राशींसाठी ते शुभ ठरेल.

सूर्य ग्रहाचे प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन होत असते आणि यामुळे प्रत्येक ग्रहावर याचे परिणाम होत असतात. या 17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्याने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सूर्याचे हे परिवर्तन अत्यंत महत्वपूर्ण असून काही राशींसाठी ते शुभ ठरेल. या राशींच्या व्यक्तींना पुढचा एक महिना मान-सन्मान आणि धनसंपत्ती देणारा ठरेल.

या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असेल सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश
ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचे सिंह राशीमधील प्रवेश 4 राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. हे परिवर्तन मेष, कर्क, सिंह आणि मीन राशीच्या लोकांना हे परिवर्तन अत्यंत लाभकारी ठरणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या कामामध्ये भरपूर यश मिळेल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल.

- Advertisement -

भाग्य मजबूत करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

  • जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य मजबूत असेल तर तुम्ही वेगाने यश मिळवता आणि भरपूर पैसा देखील कमावता.
  • सूर्याची कृपा मिळवायची असेल तर प्रत्येक रविवारी लवकर उठून सूर्याच्या आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सोबतच गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
  • सूर्य ग्रहाला ज्योतिष शास्त्रामध्ये वडीलांचा कारक ग्रह मानला जातो, त्यामुळे सूर्य ग्रहाचा आर्शिवाद मिळवण्यासाठी वडीलांच्या दररोज पाया पडा.
  • सूर्याच्या ‘ओम ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा जाप करा.

हेही वाचा :दहीहंडी का साजरी केली जाते? काय आहे महत्व?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -