Friday, May 26, 2023
घर मानिनी Religious बुधाच्या अस्त होण्याने 'या' 4 राशींच्या जीवनावर अशुभ परिणाम

बुधाच्या अस्त होण्याने ‘या’ 4 राशींच्या जीवनावर अशुभ परिणाम

ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला बुद्धीमत्तेचा कारक ग्रह मानला जातो. व्यक्तीच्या कुंडलीत जर बुध ग्रह शुभ असेल तर ती व्यक्ती कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम आरोग्य आणि जीवनात समाधान मिळते. जर बुध अशुभ असल्यास व्यक्तीच्या आयुष्यावर अनेक नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतो. 19 जून रोजी बुध वृषभ राशीत अस्त होणार आहे. यामुळे काही राशींना आर्थिक चणचण आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

या राशींच्या जीवनावर पडणार अशुभ परिणाम

  • वृषभ
- Advertisement -

बुध वृषभ राशीतच अस्त होणार आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाजू कमकुवत होईल. मेहनतीचे फळ मिळणार नाही. जोडीदारासोबत वाद-विवाद होण्याची शक्यता.

  • कर्क

बुधाच्या अस्त होण्याने कर्क राशीतील व्यक्तींना देखील आयुष्यात असमाधान लाभेल. नोकरी बदलण्याची शक्यता. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. त्वचेसंबंधित विकार उद्भवतील.

  • तूळ
- Advertisement -

बुध अस्त झाल्याने तूळ राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढेल. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतील. प्रवासादरम्यान काळजी घ्या.

  • मीन

बुधाच्या अस्त होण्याने मीन राशीतील व्यक्तींच्या करिअरच्या दृष्टीने हा काळ फारसा अनुकूल राहणार नाही. वैवाहिक जीवनात समस्येचा सामना करावा लागू शकतो.आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतील.


हेही वाचा :

दीड वर्ष राहू-केतुच्या संक्रमणाचा ‘या’ 3 राशींवर पडणार अशुभ परिणाम

- Advertisment -

Manini