घरभक्तीShubh Muhurat : १४ एप्रिलपासून सुरू होणार लग्नसराईची धावपळ; मे महिन्यात सर्वाधिक...

Shubh Muhurat : १४ एप्रिलपासून सुरू होणार लग्नसराईची धावपळ; मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त

Subscribe

१४ एप्रिल पर्यंत या राशीमध्ये राहिल्यामुळे खरमास लागले आहे. त्यामुळे या काळात कोणतेही मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे. परंतु , १५ एप्रिल पासून पुन्हा एकदा शुभ मुहूर्त सुरू होत आहेत.

येत्या १४ एप्रिल रोजी खरमास संपणार असून, आता दीड महिन्यांनंतर लग्नसराईची धावपळ पुन्हा सुरू होणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते येत्या १४ एप्रिल नंतरपासून ते १० जुलैपर्यंत पुन्हा एकदा लग्नाचे बरेच शुभमुहूर्त निघत आहेत. १० जुलै रोजी देवशयनी एकादशी चालू होणार आहे, जी ४ नोव्हेंबरच्या देवोत्थानी एकादशीपर्यंत असेल. सनातन परंपरेनुसार येत्या मे महिन्यात लग्नाचे एकूण १९ शुभ मुहूर्त आहेत. तसेच जूनमध्ये १७ तर जुलैमध्ये ९, नोव्हेंबरमध्ये ५ आणि डिसेंबरमध्ये ९ हे शुभ मुहूर्त ज्योतिषाचार्यांच्या मते सांगण्यात आले आहेत.

ज्योतिषांच्या मते, १४ मार्चपासून सूर्य देवांनी मीन राशीमध्ये प्रवेश केला होता. अशा स्थितीत १४ एप्रिलपर्यंत या राशीमध्ये राहिल्यामुळे खरमास लागले आहे. त्यामुळे या काळात कोणतेही मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे. परंतु १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा शुभ मुहूर्त सुरू होत आहेत.

- Advertisement -

त्यानंतर चातुर्मास संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाचे ५ शुभ मुहूर्त आहेत. १० जुलै रोजी देवशयनी एकादशी चालू होणार आहे, जी ४ नोव्हेंबर देवोत्थानी एकादशीपर्यंत असेल. सनातन परंपरेनुसार या काळात सगळे देव-देवता निद्रावस्थेत असतात.

या दिवशी आहेत लग्नाचे शुभ मुहूर्त

- Advertisement -

एप्रिल : १५ ,१६ ,१७ ,१८ , १९ , २०, २१ , २२ ,२३ ,२७

मे : २ , ३, ४ , ९, १० , ११ १२ ,१३ १४ ,१५ ,१७ ,१८ , १९ , २० , २१ , २४, २५ , २६ आणि ३१

जून : १ , ५ , ६ , ७, ८ ,९, १० , ११ , १२ , १३ ,१४ , १५ , १६ , १७ , २१ ,२२ आणि २३

जुलै : २ , ३ , ४ ,५ ,६, ७ , ८ , ९ आणि १०

नोव्हेंबर : २४ , २५ , २६ , २७ आणि २८

डिसेंबर : २ , ३ ,४ , ७, ८ ,९ १४ , १५ आणि १६

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -