Sunday, October 1, 2023
घर मानिनी Religious मीन राशीत होणार पापी ग्रहाचे संक्रमण 'या' राशींचे चमकणार भाग्य

मीन राशीत होणार पापी ग्रहाचे संक्रमण ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, राहु-केतु या दोन्ही ग्रहांना पापी ग्रह मानलं जातं. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांसोबत मिळून शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. असं म्हटलं जातं की, राहु-केतु ज्या कुंडलीतील ज्या घरामध्ये बसतात. त्या घराशी संबंधित गोष्टींचा व्यक्तीली त्रास होतो. येत्या 30 ओक्टोबर रोजी राहू मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. राहूच्या या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे तर काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम पाहायला मिळेल.

राहू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींना होणार फायदा

  • मेष
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, राहू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर शुभ परिणाम पाहायला मिळेल. राहू या राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल. या परिवर्तनाने यांना अचानक धनलाभ होईल. सर्व कामात यश मिळेल.

  • कर्क

राहू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल.

  • तूळ
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, राहू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर लाभदायक परिणाम पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल.

 


हेही वाचा :

2 दिवसानंतर बुधाच्या राशीपरिवर्तनाने खुलणार ‘या’ राशींचे भाग्य

- Advertisment -

Manini