Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousगुरु पौर्णिमाच्या शुभ योगाचा 'या' 3 राशींना होणार फायदा

गुरु पौर्णिमाच्या शुभ योगाचा ‘या’ 3 राशींना होणार फायदा

Subscribe

हिंदू धर्मात गुरू पौर्णिमेला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. असं म्हणतात की, पृथ्वीवर गुरू ईश्वरासमान असतो. या दिवशी आपल्या गुरूची सेवा करण्याची परंपरा आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 3 जुलै रोजी (आज) गुरू पौर्णिमा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता आणि शास्त्रात वेदव्यासांना भगवान श्री गणेशाचे गुरू मानले आहे.तसेच व्यास ऋषींनी 18 पुराणांची रचना केली त्यामुळे वेदव्यास ऋषी यांचा जन्मदिवस गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आज गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी काही खास संयोग बनत आहेत. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना हा दिवस शुभ ठरेल.

ब्रह्म योग 2 जुलै 2023 रात्री 7:26 ते 3 जुलै दुपारी 3:45 पर्यंत राहिल.
इंद्र योग 3 जुलै 3:45 ते 4 जुलै सकाळी 11:50 पर्यंत असेल.

- Advertisement -

शुभ योगाचा ‘या’ 3 राशींना होणार फायदा

  • मिथुन

आजचा दिवस मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी धनलाभ करणार असेल. या शुभ योगाच्या प्रभावाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नाते मजबूत होईल. व्यवसायात लाभ होईल.

- Advertisement -
  • सिंह

आजच्या दिवशी सिंह राशींना कार्यक्षेत्रात यश मिळवता येईल. चांगली प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस आहे. संपत्तीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल.

  • धनू

कार्यक्षेत्रात पदोन्नति होईल पगारवाढ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. शिक्षणासंबंधित गोष्टीत यश मिळेल.


हेही वाचा :

7 जुलैपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा

- Advertisment -

Manini