Saturday, June 3, 2023
घर मानिनी Religious 'या' 4 राशींच्या व्यक्ती जोडीदाराबाबत असतात choosy

‘या’ 4 राशींच्या व्यक्ती जोडीदाराबाबत असतात choosy

Subscribe

लग्न कधी करावे आणि कोणासोबत करावे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. पण काहीवेळा लग्नाचा विचार करूनही जोडीदार शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार, असे ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे होते असे सांगितले जाते. काही लोक इच्छा नसतानाही लवकर लग्न करतात तर काही लोकांचे लग्न व्हायला खूप वेळ लागतो. मात्र तुम्हाला आम्ही अशा 4 राशी लोकांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांना लग्न करायला भीती वाटतेय, शिवाय अनेकदा जोडीदार शोधण्यासाठीही त्यांना जास्त वेळ लागतो.

कन्या

या राशीचे लोक एकदम परफेक्ट असतात. लग्नाच्या बाबतीतही त्यांचा हाच स्वभाव दिसून येतो. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून अनेक अपेक्षा असतात आणि त्यांच्या जोडीदाराने प्रत्येक अपेक्षा पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा असते. यामुळे कन्या राशीच्या लोकांना लग्नाचा निर्णय लवकर घेता येत नाही. त्यामुळे इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी बराच वेळ जातो.

वृश्चिक

- Advertisement -

या राशीचे लोक इतरांसमोर सहजासहजी आपले मन व्यक्त करू शकत नाहीत. एखाद्यावर प्रेम करत असले तरी ते प्रेम व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मनातील भावना कळतही नाही. या स्वभावामुळे ते कोणासोबत लवकर नात्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळे या राशीच्या लोकांना जोडीदार शोधण्यासाठी बराच वेळ लागतो.

धनु

या राशीच्या लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. त्यांच्या आयुष्यात कोणी हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना लग्नगाठ बांधण्याची भीती वाटते. सहसा त्यांच्या लग्नाला उशीर होण्याची शक्यता असते.

मीन

- Advertisement -

या राशीचे लोक सहजासहजी कोणात मिसळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवनसाथी निवडण्यासाठी खूप वेळ लागतो. पण ज्याच्याशी त्यांचे मन एकदा मनापासून जडले की ते त्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.


- Advertisment -

Manini