Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य जाणून घ्या आज 'गुरुपुष्यामृत योगा'चे महत्त्व; 'या' शुभ मुहूर्तावर वस्तू 'का' खरेदी...

जाणून घ्या आज ‘गुरुपुष्यामृत योगा’चे महत्त्व; ‘या’ शुभ मुहूर्तावर वस्तू ‘का’ खरेदी करतात

Subscribe

मुंबई | आज गुरू पुष्यामृत योग (Guru Pushya Nakshatra 2023) आहे. यंदाच्या मराठी नवीन वर्षात सहा ‘शोभन नाम संवत्सर’ गुरु पुष्यामृताचे योग आहे. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. आज गुरु पुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त आहे. या गुरु पुष्यामृत योगाचे महत्व जाणून घेऊयात.

पुष्य नक्षत्र हे सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आली आहे. या दिवशी सुरू केलेल कामाचे चांगले फळ प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. या नक्षत्रात केलेल्या कामात स्थायित्तव भाव असतो. यामुळे भविष्याच्या दृष्टीने लवकर बदल होऊ, नये अशी कामे या दिवशी केली जाते.

- Advertisement -

गुरुपुष्यामृत योग तिथी आणि मुहूर्तनुसार, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गृरुपुष्यामृत योग आज आहे. गृरुपुष्यामृत योग सकाळी ६. ५८ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६. १५ वाजेर्यंत म्हणजे सूर्योदयापर्यंत असेल.

गुरुपुष्य योगाचे महत्त्व

- Advertisement -

आजचा दिवस हा श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे. आज भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा देखील केली जाते. आज भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास वैभव, सुख आणि संपत्ती प्राप्त होते, अशी अनेक वर्षापासूनची मान्यता आहे.

असे आहे पुष्य नक्षत्राचे महत्त्व

या नक्षत्रात बृहस्पती देव यांचा जन्म झाला. तैत्रिय ब्राह्मणात म्हटले की, बृहस्पती प्रथम जयमनः तिष्यम् नक्षत्र अभिसे बभूव.. नारद या पुराणानुसार या नक्षत्राला जन्मलेले व्यक्ती दयाळू, धार्मिक, बलवान, धनवान, विविध कलांचा जाणकार आणि सत्यवाद असतो. अगदी सुरुवातीपासूनच या नक्षत्रात केलेली सर्व कर्मे शुभ मानली जातात. परंतु, देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणिग्रहण विधींसाठी वर्ज्य माले जाते.

गुरुपुष्य योगात करतात हे उपय

  • महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्षी नारायणांची पूजा देखील केली जाते. या पूजेमध्ये ‘ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:’ या मंत्राने १०८ वेळा जप करा.
  • या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी. यामुळे नोकरदार वर्गांनी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करा.
  • गुरु पुष्य योगात एकाक्षी नारळाची पूजा करा
  • गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे चमत्कारीक कनकधारा स्तोत्र आणि स्तोत्राचे पठण करा.

 

 

 

 

- Advertisment -