घरभविष्य29 डिसेंबरपर्यंत धनू राशीमध्ये राहणार शुक्र; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार जबरदस्त फायदा

29 डिसेंबरपर्यंत धनू राशीमध्ये राहणार शुक्र; ‘या’ राशींच्या व्यक्तींना होणार जबरदस्त फायदा

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. या राशीपरिवर्तनाचा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. शुक्र ग्रह धन, वैभव, सौंदर्य, प्रेम, आकर्षण प्रदान कराणारा ग्रह आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह धनू राशीमध्ये प्रवेश करेल. शुक्र ग्रहाचे हे राशीपर्रिवरर्तन काही राशींसाठी उत्तम मानले जाते. यामुळे त्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम, वैभव, धन यांची वाढ होईल.

29 डिसेंबरपर्यंत धनू राशीमध्ये राहणार शुक्र
शुक्र ग्रह यावेळी वृश्चिक राशीमध्ये आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह धनू राशीमध्ये प्रवेश करेल. जो 29 डिसेंबरपर्यंत धनू राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर शुक्र मकर राशीमध्ये प्रवेश करेल.

- Advertisement -

मेष
शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असणार आहे. त्यांना आर्थिक धनलाभ होईल. वैवाहिक आयुष्य सुखी राहिल. नातेसंबंध घट्ट होतील.

सिंह
सिंह राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचे राशीपरिर्वतन शुभ फळ देणारे असेल. दांपत्य आयुष्यामध्ये प्रेम वाढेल. नवी नोकरी मिळेल किंवा जुन्या नोकरीत प्रमोशन होईल.

- Advertisement -

वृश्चिक
शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा या राशींच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ होईल. आयुष्यामध्ये सुख-समृद्धी वाढेल. विदेशी यात्रेचे योग येतील.

कुंभ
शुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कर्ज मुक्ति होण्यास मदत होईल. प्रेमीकडून भरपूर प्रेम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -