जाणुन घ्या, राशीभविष्य १२ – १८ ऑगस्ट

राशीभविष्य १२ – १८ ऑगस्ट

मेष ः-

सिंहेत सूर्याचे राश्यांतर, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंधात फारशी सुधारणा होणे कठीण आहे. मंगळवार, बुधवार आपसांत मतभेद होईल. घरात समस्या होईल. जवळच्या माणसाच्या संबंधी काळजी वाटेल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी महत्वाची घटना घडेल तुमचा उत्साह वाढेल. कला-क्रिडा-शिक्षण क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. मैत्रीत दूरावा येऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल. कोर्टाच्या कामात उतावळेपणाने संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. पैशाची गुंतवणूक घाईने करू नका. शुभ दि. १२, १७

वृषभ ः-

चंद्र शुक्र युति सिंहेत सूर्य प्रवेश करीत आहे. धंधात मेहनत घेतल्यास फायदा वाढेल. नविन काम सप्ताहाच्या सुरुवातीलाच मिळवा. जीवनसाथीच्या प्रगतिसंबंधी बातमी मिळेल. मोठे खरेदी करतांना काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. सहकारी वर्गांची मदत होईल. नोकरीत गुरुवार, शुक्रवार समस्या येण्याची शक्यता आहे. कला-क्रिडा-शिक्षण क्षेत्रात प्रगति होईल. अभ्यासात आळस करू नये. संशोधन कार्यात संमिश्र घटना घडेल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभ दि. 13,14

मिथुन ः-

चंद्र, बुध लाभयोग, सिंहेत सूर्य प्रवेश करीत आहे. तुमच्या कार्याला चांगले वळण मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्ण करा. लोकप्रियता मिळेल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. घरात मुलांच्या प्रगतिमुळे वातावरण आनंदी राहिल. दूरच्या प्रवासच्या बेत ठरवाल. नोकरीत चांगला बदल करता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. पैसा मिळेल. शिक्षणात मनाप्रमाणे यश मिळेल. नविन परिचय झाल्याने उत्साह वाढेल. संशोधन कार्यात अपूर्ण असे यश मिळेल. पुरस्कार मिळेल. शुभ दि. 16,17

कर्क ः-

सिंहेत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. तुमच्या मनाप्रमाणे राजकीय-सामाजिक क्षेत्रात घटना घडतील. लोकप्रिययेत वाढ होईल. स्वतःचे स्थान मजबूत करता येईल. धंद्यात जम बसेल. संघर्ष असला तरी जिद्दीने सर्वच ठिकाणी या सप्ताहात यशस्वी होता येईल. नोकरीतील वाद, तणाव कमी होईल. वरिष्ठांना खुष करता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. कौटुंबिक वाटाघाटीत फायदा होईल. विद्यार्थी वर्गाने रागावर नियंत्रण ठेऊन अभ्यासावर लक्ष ठेवावे. संशोधन कार्यात विशेष यश मिळवता येईल. नविन ओळख होईल. शुभ दि. 13,14

सिंह ः-

स्वराशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्न करता येईल. धंद्यात तुम्ही घाईने गुंतवणूक करू नये. नविन काम मात्र घ्याल. कामगार वर्गाला सांभाळून घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यातील दबाव कमी होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी तडफदारपणे निर्णय घेऊ शकाल. नविन मोेठ्या लोकांचा परिचय होईल. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रातील तणाव कमी झाल्याने निर्णय घेता येईल. नविन काम मिळेल. विद्यार्थी वर्गाला परिक्षेत यश मिळेल. कोर्टाच्या कामात संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहिल. शुभ दि. 16,17

कन्या ः-

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. या सप्ताहात महत्वाची कामे करून घ्या. रविवार, सोमवार किरकोळ अडचणीवर मात करावी लागेल. धंद्यासाठी गुंतवणूकदार मिळेल. नविन काम तुम्हाला मिळेल ते आव्हानात्मक असेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बुद्धी चातुर्याने गुंता सोडवा. लोकप्रियता मिळेल. लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळवावे लागेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. नविन ओळखीमुळे मनावरील दडपण कमी होईल. विद्यार्थी वर्गाने वेळ फुकट न घालवता अभ्यास करावा. पुढे मोठी संधी मिळेल. संशोधन कार्यात लवकरच धागा मिळू शकेल. घरात वडील माणसांचा सल्ला घेण्याची वेळ येऊ शकते. शुभ दि. 14,15

तुळ ः-

सिंहेत सूर्य राश्यांतर, चंंद्र बुध लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर घरात तणाव होईल. मानसिक दडपण येईल. किरकोळ दुखापत होऊ शकते. सावध रहा. धंद्यात मेहनत घेण्याची गरज आहे. व्यवहारात भावना आणल्यास समस्या होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठ तुमच्यावर विश्वासाने कामे देतील तुमचे महत्व वाढेल. सहकारी काड्या घालण्याचा व्यर्थ प्रयत्न करतील. कला-क्रिडा क्षेत्रात किरकोळ गैरसमज मैत्रीत होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने मौज करतांना वेगळ्याच वाटेने जाऊ नये. प्रेमात सावध रहा. अभ्यासाच्या वेळ फुकट घालवू नये. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. संशोधन कार्यात अधिकारी मदत करतली. शुभ दि. 12,13

वृश्चिक ः-

सिंहा राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यामध्ये सप्ताहाच्या सुरुवातीलाच निर्णय घ्या. मोठ्या लोकांच्या मदतीने काम मिळण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात जनहितासाठी योग्य तो निर्णय घ्या. विरोधक गुरुवार, शुक्रवार तुमची कोंडी करतील. टिका होईल. प्रतिष्ठा सांभाळणे कठीण होईल. नोेकरीत वरिष्ठांच्या मदतीला जावे लागेल. धावपळ होईल. कला-क्रिडा क्षेत्रात नविन मैत्री होईल. कामाचा उत्साह वाढेल. आर्थिक व्यवहार करतांना घाई करू नका. आर्थिक व्यवहार करतांना घाई करू नका. विद्यार्थी वर्गाला परिक्षेसाठी जास्त तयारी करण्याची गरज आहे. संशोधन कार्याला वेग येईल, मार्ग शोधता येईल. घरातील वातावरण सुखद ठेवता येईल. शुभ दि. 13, 14

धनु ः-

सिंह राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमाच कार्यातील अडचणी दूर करू शकेल. चंद्र, शुक्र युति होत आहे. साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी तणाव कमी होऊ शकेल. तुमच्या बद्दलचा झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यात अस्थिरता राहिल. कामगार वर्गाची नाराजी दूर करणे सर्व खर्च वाढू शकतो. घरातील नाराजी कमी होईल. वाटाघाटीमध्ये तक्रार होऊ शकते. डोळ्यांची समस्या कमी होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धिसाठी कष्ट पडतील. जास्त मोठ्या अपेक्षा कुठेच ठेऊ नका. प्रयत्न करा. कार्य करा. विद्यार्थी वर्गाने नम्रतेने वागावे. संशोधन कार्यात यशाचे कौतुक उशिरा होईल. शुभ दि. 16,17

मकर ः-

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी वाढू शकतात. तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न होईल. परिस्थितीचे गांर्भिय ओळखून निर्णय घ्या. बुद्धिचातुर्याने प्रसंगावर मात करू शकाल. धंदा वाढेल. आर्थिक मदत तुमचे चाहते करतील. कोर्टाच्या कामात क्षुल्लक चूक मोठी करून दाखवली जाईल. कला-क्रिडा क्षेत्रात हिम्मत ठेवा. यश खेचता येईल. विद्यार्थी वर्गाने भरकत न जाता वडिल माणसांचा सल्ला घ्यावा. व्यसनाने नुकसान होईल. घरातील माणसे तुमच्याबरोबर असतील. शुभ दि. 14,15

कुंभ ः-

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु, प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती सावरता येईल. मैत्री करणारे परंतू गुप्त शत्रू तुम्हालाही दिशाभूल करू शकतात. त्याकडे धंद्यात सावध रहा. पैशाची गुंतवणूक मोटावाई कुठेही करू नका. घरातील समस्या हतबल करणारी असली तरी उपाय निघेल. चिंता करण्यापेक्षा योग्य प्रयत्न करा. कला-क्रिडा क्षेत्रात संधीची वाट पहावी लागेल. नविन ओळख झालेल्या व्यक्तीशी कोणताही व्यवहार करू नका. संशोधन कार्यात जिद्द ठेवा. मार्ग सप्ताहाच्या शेवटी मिळू शकतो. विद्यार्थी वर्गाने उतावळेपणाने वागू नये. शुभ दि. 17, 18

मीन ः-

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र युति होत आहे. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. मोठे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबर नमते धोरण घेण्याची वेळ येऊ शकते. राजकीय-सामजिक कार्यात तत्परता ठेवा. संयमाने वागा. प्रश्न चिघळू देऊ नका. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. मुद्याचे बोला. कला-क्रिडा क्षेत्रात काम मिळेल. स्पर्धेत फार मेहनत घ्यावी लागेल. घरात किरकोळ तणाव होऊ शकतो. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. मान-सन्मानाचा प्रश्न कुठेही निर्माण करू नका. विद्यार्थी वर्गाने ध्येय युतिचाच विचार करावा. नम्रतेने वागावे. संशोधन कार्यात वरिष्ठांचे सहकार्य कमी मिळू शकते. शुभ दि. 14,15