Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य राशीभविष्य  २२ जुलै ते २८ जुलै

राशीभविष्य  २२ जुलै ते २८ जुलै

Related Story

- Advertisement -

मेष ः

चंद्र, मंगळ लाभयोग व चंद्र, शनि युति होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात तुमच्या जुन्या अनुभवाचा उपयोग करून योजना बनवा. तुम्हाला रोज विरोध होईल. धावपळीमुळे प्रकृती अस्थिर राहू शकते. बुधवारपासून तुमच्या कामातील अडचणी कमी होऊ शकतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. धंद्यात जास्त धोका पत्करू नका. कामगार वर्गाकडून सहकार्य कमी मिळेल. नवीन काम मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल. मुलांच्या विचारांचा उपयोग समस्येसाठी होईल. घरात खर्च वाढू शकतो. वाटाघाटीत गैरसमज होईल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात वरिष्ठांना उद्धटपणे बोलणे टाळा. शुभ दि. २५, २७

- Advertisement -

वृषभ ः

सूर्य चंद्र त्रिकोण योग, शुक्र नेपच्यून प्रतियुति होत आहे. परिश्रमाने तुम्हाला तुमच्या कार्यात यश खेचून आणता येईल. धंदा वाढेल. परंतु कायदा पालन करा. व्यसन, मोह यामुळे अडचणी वाढू शकतात. राजकीयसामाजिक कार्यात वरिष्ठ तुमच्याकडे मोठे काम देतील. सप्ताहाच्या मध्यावर वादविवाद वाढू शकतो. नोकरीत टिकून रहा. कोर्टाच्या कामात योग्य मुद्दे मांडता येतील. विशेष संशोधन कार्यात एखादा महत्त्वाच्या दुवा हाती लागेल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात नवीन ओळखीचा फायदा होऊ शकतो. परदेशात जाण्याचा योग काहींना येईल. जीवनसाथी, मुले यांना खूश ठेवता येईल. शुभ दि. २२, २३

- Advertisement -

मिथुन ः

ग्रहांची साथ असते तेव्हाच तुम्ही जास्त प्रयत्न केल्यास मोठे यश मिळवता येते. शुक्र, गुरू लाभयोग, चंद्र बुध त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायाचा व्याप वाढेल. फायदा होईल. क्षुल्लक तणाव होईल. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. वाहन जपून चालवा. राजकीयसामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधाला संयमाने सामोरे गेल्यास तुमचे हित तुम्हाला साधता येईल. नोकरीत जबाबदारी वाढेल. महत्त्वाच्या संशोधनात धावपळ जास्त होईल. जिद्दीने यश मिळेल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात बोलताना नम्रता ठेवा. यशाची नशा उतरवण्यात फारसा वेळ लागत नाही. वाहन जपून चालवा. शुभ दि. २५, २६

कर्क ः

शुक्र, गुरू लाभयोग, सूर्य मंगळ प्रतियुति होत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळू शकेल. नवीन ओळखीतून समस्या सोडवण्यास मदत होऊ शकेल. राजकीयसामाजिक कार्यात चूक सुधारून राहिलेले काम पूर्ण करता येईल. सप्ताहाच्या मध्यावर संताप वाढेल, अशी घटना घडू शकते. कुटुंबातील वाटाघाटीसंबंधी चर्चा होईल. नोकर माणसांना गुप्त गोष्टी कळू देऊ नका. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात यश मिळेल. प्रतिस्पर्धी पण तगडा असेल हे विसरू नका. संशोधनासंबंधी काम यशस्वी होऊ शकेल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्टकेस सोपी समजू नका. शुभ दि. २७, २८

सिंह ः

शुक्र, गुरु लाभयोग, सूर्य मंगळ प्रतियुति होत आहे. या सप्ताहात तुम्हाला धंद्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. कामगार वर्गाकडून त्रास होऊ शकतो. राजकीयसामाजिक क्षेत्रात संतापजनक घटना तुमच्या विरोधात होऊ शकते. अपमानकारक वागणूक मिळेल. नोकरीत भलत्याच माणसाच्या सांगण्यावरून अनुचित कार्य करू नका. कोर्ट केसमध्ये अडचणी वाढू शकतात. सभ्यता सोडून चालणार नाही. प्रवासात त्रास होऊ शकतो. संशोधन कार्यात अडथळे येतील. वरिष्ठांना तुमचा मुद्दा पटणे कठीण आहे. शुभ दि. २५, २६

कन्या ः

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य मंगळ प्रतियुति होत आहे. राजकीयसामाजिक क्षेत्रात हाती घेतलेल्या कामात मोठे यश मिळेल. तुमचा दबदबा वाढेल. जनतेचे सहकार्य मिळवणे तुम्हाला थोडे कठीण पडू शकते. विरुद्धलिंगी व्यक्ती तुम्हाला दिलेला शब्द फिरवण्याची शक्यता आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. घरात गैरसमज व वाद किरकोळ स्वरूपाचा असेल. खर्च अनाठाई करू नका. नोकरीत वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. मैत्रीमध्ये दुरावा होऊ शकतो. संशोधन कार्यात चांगलेच यश मिळू शकते. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी. शुभ दि. २२, २७

तूळ ः

चंद्र, बुध, त्रिकोण योग, शुक्र नेपच्यून प्रतियुति होत आहे. तुमचा उत्साह वाढेल. राजकीयसामाजिक कार्यातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा यशस्वी होईल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. विचारांना दिशा मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यातील मरगळ कमी होऊन आर्थिक लाभ वाढेल. नातलगांच्या, मित्रांच्या भेटी होतील. कोर्ट केससंबंधी चांगली बातमी मिळेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरुंच्या कृपेने मनःशांती मिळेल. गर्दीत जाण्यापेक्षा घरीच मनोमन जप करा. संशोधन कार्यात प्रगती होईल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा बदल होईल

शुभ दि. २३, २४

वृश्चिक ः

चंद्र, बुध, त्रिकोण योग, सूर्य, मंगळ प्रतियुति होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात चोहोबाजूने असलेला तणाव संपला नसला तरी तुम्हाला नवी दिशा मिळेल. अडचणीतून मार्ग शोधता येईल. धंद्यात तग धरून राहता येईल. नवीन काम मिळेल. नोकरीतील ताण कमी होईल. कोर्ट केसमध्ये बेजबाबदारपणे वागू नका. योग्य सल्ला घ्या. प्रकरण पुढे टाळता येईल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात तडजोड करून प्रतिष्ठा राखता येईल. संशोधन कार्यात एखादा धागा निश्चितपणे मिळू शकतो. संसारात आनंदी वातावरण राहील. परदेशात नोकरीसाठी जाण्याची संधी येऊ शकते. वाकडा वार करू नका. शुभ दि. २५, २७

धनु ः

शुक्र नेपच्यून प्रतियुति, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. आत्मविश्वास असला तरी राजकीयसामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच, मुद्दे अयशस्वी ठरवण्याचाच प्रयत्न होईल. समारंभात अपमान होऊ शकतो. धंद्यात बाचाबाची करू नका. मारामारीने प्रसंगाला गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकते. डोळ्यांची काळजी घ्या. भलत्याच कारणासाठी पैसा खर्च करण्याची वेळ येऊ शकते. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात नमते घ्या. प्रसिद्धी हुकण्याची शक्यता आहे. संशोधन कार्यात वरिष्ठांच्यामुळे तुमची दिशाभूल होऊ शकते. शेजारी त्रस्त करतील. गुरूपौर्णिमेच्या दिवशी दिलासा मिळेल. शुभ दि. २२, २३

मकर ः

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती मकर राशीला सुरू आहे. राजकीयसामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. जवळच्या लोकांना दुखवू नका. व्यवसायात मोठे काम मिळवा. जम बसेल. नुकताच परिचय झालेल्या माणसावर विश्वास ठेऊ नका. संसारात किरकोळ मतभेद होतील. खर्च वाढेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्याकडे जबाबदारीचे काम सोपवतील. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या मध्यावर सावध रहा. मैत्रीत आर्थिक व्यवहार टाळा. फसगत होईल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळेल. खाणेव्यसन इ. यांच्या नादी लागू नका. शुभ दि. २३, २७

कुंभ ः

शुक्र, गुरु, लाभयोग व सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही स्थिर राहू शकाल. राजकीयसामाजिक कार्यात विरोधक गुप्त कारवाया करून तुम्हाला त्रस्त करतील. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मन उदास होईल. मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. धंद्यात समस्या येऊ शकते. कठोर शब्द वापरू नका. घरातील तुमची माणसे तुमच्याबरोबर असल्याचे समाधान असेल. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात उर्मटपणा करू नका. शुभ दि. २३,२४

मीन ः

चंद्र, बुध, त्रिकोण योग, सूर्य शनि केंद्रयोग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. किरकोळ वाद संसारात होऊ शकतो. भावना व व्यवहार यांची गल्लत करू नका. राजकीयसामाजिक कार्यात प्रयत्न करा. जिद्द ठेवा. योजनांची पूर्ती करा. कौतुकाची वाट न पाहता काम करा. पुढे संधी मिळू शकते. कलाक्रीडाशिक्षण क्षेत्रात मेहनत घ्या. दर्जेदार लोकांचे मार्गदर्शन मिळेल. मैत्रीत वाद संभवतो. कोर्ट केसमध्ये आशा वाढतील. कोणतीही थकबाकी वसूल करा. शुभ दि. २३,२७

 

- Advertisement -