घर भविष्य जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य - २८ ते ४ मे २०१९

जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य – २८ ते ४ मे २०१९

Subscribe

मेष ः तुमच्याच राशीत बुध प्रवेश, बुध, मंगळ लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक विषयावर चर्चा करता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. क्षुल्लक तणाव होईल. तडजोड करावी लागली तरी प्रतिष्ठा राहिल. धंद्यात वाढ होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. सप्ताहाच्या मध्यावर घरगुती समस्या येईल. प्रकृतिची काळजी घ्या. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. खोट्या अभिषाला बळी पडू नका. नोकरीत वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. बदल करण्याची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगतीकारक घटना घडेल. मैत्रीत दूरावा संभवतो. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. व्यसनाने नुकसान होईल. शुभ दि. २८. २९

वृषभ ः– मेष राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र युति या सप्ताहात होत आहे. धंद्यातमध्ये अडचणी वाढू शकतात त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रश्न सोडवा. नवे काम घेऊन ठेवा कामगारांच्या बरोबर चांगली संबंध ठेवा. रागवार नियंत्रण ठेवा. शुक्रवार राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. तुमच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला जाईल. सौम्यपणे समस्या सोडवा. कायदा मोडू नका. कला-क्रिडा क्षेत्रात नविन ओळखीचा फायदा करून घेता येईल. प्रसिद्धीसाठी वेळ लागेल. कोर्टकेस कठीण आहे. संशोधनाच्या कामात वरिष्ठांना सल्ला मानवा लागेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे तरच यश मिळेल. आळस करू नये. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २८, २९

- Advertisement -

मिथुन ः– मेष राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात रविवार किरकोळ तणाव होईल. त्यानंतर तुमच्या प्रत्येक कामाला गती मिळेल. धंद्यात वाढ करू शकाल. नवे काम मिळवा. मागिल देणे वसूल करा. नविन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. संताप वाढेल असे कृत्य विरोधक करतील. घरात चांगला निर्णय घेता येईल. मुलांची प्रगती आनंद देणारी असेल. नोकरीत फायदेशीर घटना घडेल. कला-क्रिडा क्षेत्रात नवा मिळेल. आर्थिक फायदा होईल. वाहन जपून चालवा. दुखापत टाळता येईल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. संशोधनाच्या कामात वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळेल. आळस करून चालणार नाही. शुभ दि. २९, ३०

कर्क ः- या सप्ताहात मेष राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला गुप्त कारवाया विरोधक करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे स्थान टिकवता येईल. कामे करा. दौर्‍यात यश येईल. लोकांचे सहकार्य मिळेल. धंद्यात तुमच्या पद्धतीने सुधारणा करू शकाल. मोठे कंत्राट मिळेल. प्रयत्न करा. मागे राहू नका. थकबाकी वसूल होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पुरस्कार मिळेल. नवे काम मिळवता येईल. कोर्टकेस जिंकता येईल. त्याचा पाठपुरावा करा. नोकरीत वर्चस्व राहिल. संशोधानाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठ कौतुक करतील. प्रमोशन होऊ शकेल. विद्यार्थ्यांना चांगले मार्क घेता येईल. प्रयत्न सोडू नये हे वर्ष फुकट घालवू नये. शुभ दि. १, २

- Advertisement -

सिंह ः- मेष राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. मोठे काम मिळवता येईल. जवळच्या लोकांना दुखवू नका. भागिदाराशी नम्रपणे चर्चा करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व टिकवता येईल. लोकांच्या मनात गोंधळ होईल. त्यामुळे त्यापद्धतीने कामे करा. आश्वासन द्या. कुटुंबात सप्ताहाच्या मध्यावर वाद होईल. वाटाघाटीत एक वाक्यता घडवावी लागेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगती होईल. मैत्रीत ताणा-ताण होऊ शकते. कल्पना कृतित आणणे कठीण असते. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास चांगला करावा यश मिळेल. खाण्याची काळजी घ्यावी चांगली संगत ठेवा. शुभ दि. २९, ३०

कन्या ः- या सप्ताहात मेषेत बुध प्रवेश, चंद्र शुक्र युति होत आहे. धंद्यात अडचण येईल. भागीदार वाद वाढू शकतो. नोकर माणसांसाठी मर्जी ऐकून घ्यावी लागेल. दादागिरीने प्रश्न सुटण्यापेक्षा तो वाढेल. संयम ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा पाणउतारा होऊ शकतो. आर्थिक सहाय्य करणारे लोक मदत करतील. मैत्री असलेले लोकच सांभाळून ठेवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कामात चूक होईल. सावध रहा. संशोधनाच्या कामात योग्य सल्ला घ्या. सहकारी उपयोगी पडतील. कोर्टकेसमध्ये समस्या येईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी वेळ लागू शकतो. विद्यार्थी वर्गाने नम्र रहावे. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता होईल. धावपळ या सप्ताहात जास्त होईल. शुभ दि. १,२

तूळ ः– मेष राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात फायदा वाढेल. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. खाण्याचे तंत्र सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. तुमचे कौतुक वरिष्ठ करतील. सहकारी, कार्यकर्ते यांना दुखवू नका. प्रेमाने बोला. तरच जास्त महत्त्व वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात नविन ओळख झालेल्या माणसावर एकदम विश्वास ठेऊ नका. प्रसिद्धी व पैसा मिळेल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. मोठे कामे मार्गी लावता येईल. विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवता येईल. मागे राहू नये. शुभ दि. २९, ३०

वृश्चिक ः– या सप्ताहात मेषेत बुध प्रवेश, चंद्र शुक्र युति होत आहे. सप्ताहाच्या शेवटी धंद्यात समस्या येऊ शकते. मनासारखे प्रसंग न घडल्याने राग वाढेल. खर्च होऊ शकतो. मित्राची मदत मिळेल. अरेरावीने कुठेही बोलू नका. सौम्य धोरण ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्यावर आरोप येईल. घरगुती कामे वाढतील. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कामे वेळच्या वेळी करा. दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कला-क्रिडा क्षेत्रात कौतुक होईल. मोठे आश्वासन मिळेल. कोर्टकेसमध्ये क्षुल्लक बाकी उरल्याने अर्धवट काम होऊ शकते. संशोधनाच्या कामात तत्परता ठेवा. बुद्धि वापरा. सल्ला ऐकून घ्या. विद्यार्थी वर्गाने डोके शांत ठेऊन अभ्यास करावा. यश मिळेल. शुभ दि. १,२

धनु ः– मेष राशीत बुधाचे राश्यानंतर, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. जास्त वैर न करता तुमची कामे करून घ्या. घरचा प्रश्न सोडवता येईल. वाटाघाटीत चर्चा सफल होईल. धंद्यात काम मिळेल. थकबाकी वसूल करा. महत्त्वाची कामे आहे. सप्ताहात करण्याचे ठरवा. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत जास्त घ्या. फाजिल आत्मविश्वास ठेऊ नका. गुरु महाराजांची प्रार्थना करा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. नवे कामे मिळेल. कोर्टकेसमध्ये यश येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. शुभ समाचार मिळेल. विद्यार्थी वर्गाने मागे न राहता हे वर्ष पूर्ण करावे. उत्तम यश मिळेल. शुभ दि. २८, २९

मकर ः– मेष राशीत बुधाचा प्रवेश, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. तुमचा उत्साह प्रत्येक दिवशी वाढणार आहे. राहून गेलेली कामे करून घ्या. धंद्यातील गुंता सोडवा. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वेगळ्याच पद्धतीने वाढेल. सप्ताहाच्या शेवटी टिकात्मक चर्चा होईल. घरातील कामे होतील. आपल्या व्यक्तीसाठी चांगली योजना कराल. वाटाघाटीत यश मिळेल. कोर्टकेस संपवा. कला-क्रिडा क्षेत्रात आत्मविश्वास वाढेल. दिशा मिळेल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थी वर्गाने स्वतःच्या अभ्यासात आळस करू नये. उत्तम यश मिळवाल. शुभ दि. २९, ३०

कुंभ ः– मेष राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग या सप्ताहात होत आहे. तुम्ही जे ठरवाल ते काम करून घेता येईल. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. नवे परिचय होतील. तुमच्या राजकीय-सामाजिक वाटचालीत सर्वाचे सहाय्य मिळेल. आर्थिक मदत होईल. दौर्‍यात प्रभाव वाढेल. लोकांच्या गरजा पूर्ण करा. मान-सन्मान मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी, पुरस्कार मिळेल. नोकरीत चांगला बदल करू शकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्टकेस लवकरच संपवा. कुटुंबात महत्त्वाच्या प्रश्न मार्गी लागेल. मुलांची प्रगती सुखावह राहिल. संशोधनाच्या कामात कौतुकस्पद काम कराल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे प्रगती करता येईल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल. शुभ दि. १, २

मीन ः– या सप्ताहात मीन राशीच्या धनस्थानात बुध प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. उद्योग-धंद्यात चांगला जम बसवता येईल. गुंतवणूक वाढेल. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून ठेवता येईल. पदाधिकार मिळेल. लोकांच्यामध्ये नावलौकिक मिळेल. वास्तु, जमिन, वाहन खरेदीचा पूर्ण करता येईल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे मित्र मिळतील. साहित्याला नवा परिचय मिळेल. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचा संधी घेता येईल. संशोधनात प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. मनाप्रमाणे मार्ग निवडता येईल. शुभ दि. ३, ४

- Advertisment -