घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्य : रविवार ३१ मार्च ते ६ एप्रिल

साप्ताहिक राशीभविष्य : रविवार ३१ मार्च ते ६ एप्रिल

Subscribe

मेष :- चंद्र गुरु लाभयोग, बुध नेपच्यून युति होत आहे. या सप्ताहात उद्योगात जम बसेल. मागिल येणे वसूल करा. नवे काम मिळवा. तुमची जिद्दच उपयोगात येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठे लोक आरोप करतील. टीका करतील. तुमचे मन स्थिर ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. लोकांची साथ मिळेल. आर्थिक मदतही मिळेल. घरातील तणाव कमी करू शकाल. नोकरीत वरिष्ठांना विचारून निर्णय घ्या. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. तुमच्याशी स्पर्धा करणारे वाढतील. संशोधनाच्या कामात गुमराह करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुम्ही बुद्धिने काम करा. मित्र मदत करतील. परीक्षेसाठी तयारी करा. नम्र रहा. गुढीपाडवा शुभ ठरेल. शुभ दि. ३१, १

वृषभ :- चंद्र शुक्र युति, बुध नेपच्यून युति होत आहे. धंद्यात वाढ होईल. प्रयत्नांचा जोर वाढवा. कायदा कुठेही मोडू नका. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा असला तरी बरोबरचे लोक अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. रागाचा पारा वाढवण्याचा कट करतील. गुढीपाडव्याच्या दिवशी नम्रपणे वागा. प्रवासात सावध रहा. घरगुती तणाव कमी होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी स्वतःला व इतरांना फसवू नये. परीक्षा द्यावी. शुभ दि. ३१, ३

- Advertisement -

मिथुन :- या सप्ताहात चंद्र गुरु त्रिकोण योग, चंद्र, बुध युति होत आहे. नोकरीत मनाप्रमाणे अडलेले काम करून घेता येईल. धंद्यात फायदा वाढेल. मोठे कंत्राट मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना मार्गी लावा. तत्परता दाखवा तरच पुढे निभाव लागेल. प्रगतीची संधी मिळेल. लोकांचे मन वळवता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. गुढीपाडव्याला शुभ समाचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमक दिसेल. पैसा मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. कोर्ट केस संपवण्याची संधी मिळू शकेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून स्वतःचे ध्येय गाठावे. घर, जमीन खरेदी विक्रीत फायदा होईल. शुभ दि. ३,५

कर्क :- चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. मीन राशीतील सूर्य तुमच्या पाठीशी आहे. धंद्यात मिळेल ते काम नीट पूर्ण करा. जास्त अपेक्षा ठेऊ नका. नम्र रहा. वाद होतील. कामगार बंड करतील. त्यांना सांभाळून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी दूरदृष्टीकोन ठेवा. जवळचे लोक कट करतील. प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्या. भावना-व्यवहार यांचा गुंता होईल. नोकरीत अडचणी येतील. तुमच्या कामाचे कौतुक होणे कठीण. कला-क्रीडा क्षेत्रात फसगत संभवते. गोड बोलून जवळीक करणार्‍या व्यक्तीपासून सावध रहा. कोर्ट केस चिंता वाढू शकते. संशोधनाच्या कामात शांतपणे विचार करा. तुमची कामाची पद्धत पडताळून पहा. मैत्रीत दुरावा संभवतो. गुढीपाडवा आनंद देईल. शुभ दि. ३१, ६

- Advertisement -

सिंह :- चंद्र गुरू लाभयोग, चंद्र शुक्र युति होत आहे. घरातील ताणतणाव कमी करू शकाल. वृद्ध व्यक्तीला दुखवू नका. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. नविन नोकरी मिळू शकेल. गुढीपाडवा चांगली बातमी देईल. त्यानंतर दिशा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात एखादी नजर चूक होईल. त्यामुळे प्रतिष्ठा कमी होऊ शकते. दुसर्‍यावर आरोप करताना स्वतःच्या कार्याकडे दुर्लक्ष करू नका. लोकांचा विश्वास मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कोर्ट केस सावधपणे हाताळावी लागेल. संशोधनाच्या कामात अडथळे येतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. जीवनसाथी, मुले यांचे विचार ऐकून घ्या. विद्यार्थ्यांना यश खेचून आणता येईल. अरेरावी करू नका. शुभ दि. १, २

कन्या :- चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. मीनेतील सूर्य तुमची प्रतिष्ठा जाऊ देणार नाही. तुम्ही धंद्यात वाद वाढवू नका. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. कामगार विरोधात जाण्याची शक्यता आहे. बुद्धिमता उपयोगी पडेल. सप्ताह कठीण आहे. त्यामुळे घरातील जबाबदारी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. वडील माणसाचा शब्द मोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिमा सांभाळा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा तटस्थ रहा. सहकारी दुतोंडेपणा करतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. मैत्रीत मतभेद होईल. कोर्टमध्ये फसवा-फसवी होऊ शकते. चांगली संगत ठेवा. व्यसनाने नुकसान होईल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. प्रेमात तणाव होईल. शुभ दि. ३१, ५

तुला :- चंद्र गुरू लाभयोग, बुध नेपच्यून युति या सप्ताहात होत आहे. धंद्यात वाढ करण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी रागाचा पारा वाढवणारी घटना राजकीय-सामाजिक कार्यात घडून येईल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. टिकात्मक चर्चा होऊ शकते. लोकांची सहाय्यता तुम्हाला मिळेल. नोकरीत क्षुल्लक तणाव होईल. घरातील वातावरण छान ठेवता येईल. आप्तेष्टांच्या भेटी होतील. वृद्ध व्यक्तींची काळजी वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनतच जास्त करा. नवीन ओळखीने तुमचा उत्साह वाढेल. संशोधनाच्या कामात चौकसबुद्धि वापरा. नम्रपणे बोला. विद्यार्थी वर्गाने वडिलधार्‍या लोकांचा मान ठेवावा. यश मिळेल. गुढीपाडवा खूशखबर देईल. शुभ दि. १, २

वृश्चिक :- चंद्र मंगळ केंद्र योग, चंद्र बुध युति होत आहे. धंद्यात प्रयत्न जास्त, यश कमी अशी परिस्थिती राहील. ओळखून कामे मिळण्याचे आश्वासन मिळेल. घरातील व्यक्तींची मर्जी राखावी लागेल. नाराजी होऊ शकते. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. गुढीपाडव्याच्या दिवशी सहनशीलता व तत्परता ठेवा. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. संशोधनाच्या कामात सहकारी वर्गाला कमी समजू नका. विद्यार्थी वर्गाला यश मिळवता येईल. मौज-मजेत जास्त वेळ जातो का, याकडे लक्ष द्या. शुभ दि. ३१, ५

धनु :- चंद्र, शुक्र युति, बुध नेपच्यून युति होत आहे. साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. या सप्ताहात धंद्यात तुमचा जम बसवता येईल. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. भागिदाराबरोबर चांगली चर्चा होईल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या हातून काही कामे राहून गेली असतील तर ती पूर्ण करा. गैरसमज दूर करा. तुमचे स्थान टिकवण्यासाठी मेहनत घ्या. लोक मदत करतील. पैसाही मिळेल. त्यामुळे कार्य चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. कला-क्रीडा-साहित्यात नावलौकिक, लाभ मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीतील समस्या कमी होईल. घरात शुभ समाचार मिळेल. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. मनाप्रमाणे यश मिळेल. शुभ दि. १, ६

मकर :- बुध नेपच्यून युति, मीन राशीत सूर्य. या सप्ताहात तुमच्या मनातील कामे पूर्ण करता येतील. लोकांची मदत फारच महत्त्वाची ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. अनुभवी व्यक्तींना न दुखावता त्यांच्याकडून चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकून घ्या. तुमचे ध्येय पूर्ण करण्याचा पूरेपूर प्रयत्न करा. प्रत्येक दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात चांगली संधी मिळेल. गुरुठायी असलेल्या व्यक्तीला नाराज करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट जास्त द्यावे लागतील. कौतुक, प्रसिद्धी होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीला उभे रहावे लागेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. संततीच्या प्रगतीने तुम्हाला समाधान मिळेल. विद्यार्थी वर्गाने चांगल्या संगतीत राहून अभ्यासक्रम पूर्ण करावा. शुभ दि. १,२

कुंभ :- चंद्र गुरु, लाभयोग, बुध नेपच्यून युति होत आहे. रविवारी क्षुल्लक तणाव झाला तरी त्यानंतर तुमची सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करू शकाल. धंद्यात मोठी उडी घेता येईल. कंत्राट मिळेल. मागिल देणे वसूल करा. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने पैसे ठेवता येतील. संसारात चांगल्या घटना घडतील. समारंभात हजर रहावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल. प्रसिद्धी मिळेल. धडपड केल्याने समाधान मिळेल. लोकांचा विश्वास मिळवता येईल. कला-क्रीडा साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाण्याची तयारी करू शकाल. नोकरी लागेल. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळवता येईल. गुढीपाडवा आनंद देणारा ठरेल. शुभ दि. ५, ६

मीन :- चंद्र गुरु त्रिकोण योग, चंद्र मंगळ लाभयोग होत आहे. आत्मविश्वास वाढेल. जास्त उतावळेपणा कुठेही करू नका. घाईत कोणतेही काम चांगले होत नाही, तुमच्या मनाप्रमाणे घटना आता घडत जातील. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च चुकीच्या ठिकाणी होऊ शकतो. घरात वाद होईल. धंद्यात सावध रहा. मैत्री तुटण्याची शक्यता निर्माण होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. अधिकाराचे पद मिळण्याची आशा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. स्पर्धा करणारे वाढतील. नोकरीत सहकारी वर्गाला कमी समजू नका. संशोधनाच्या कामात प्रगती होईल; पण धावपळ वाढेल. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या प्रगतीची गुढी अधिक उंचावर दिमाखाने झळकेल. शुभवार्ता कळेल. शुभ दि. ३१, ६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -