घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार ०७ ऑगस्ट ते शनिवार १३ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य रविवार ०७ ऑगस्ट ते शनिवार १३ ऑगस्ट २०२२

Subscribe

मेष ः- या सप्ताहात सिंह राशीत मंगळ प्रवेश, मंगळ प्लुटो षडाष्टक योग होत आहे. धंद्यात वादाचे प्रमाण वाढेल. एखादी तडजोड केल्याशिवाय पुढे जाणे कठीण होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात आपसात, तसेच संततीबरोबर तणाव होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात अन्याय होत आहे, अशी भावना मनात येईल. घरगुती चिंता वाढेल. आर्थिक व्यवहार बेसावध राहू नका. कोर्ट केस अडचणीची असेल. शोधकार्यात दिशाभूल होईल. रागावर ताबा ठेवा. व्यसनाने नुकसान होईल. शुभ दि. ०७, ०९

वृषभ ः सिंह राशीत या सप्ताहात मंगळ प्रवेश होत आहे. चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम परिचयातून मिळवता येईल. चांगली मेहनत करा. घरगुती समस्या सोडवता येईल. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात मागे राहू नका. भविष्यासाठी चांगल्या कामाची तरतूद करून ठेवा. कला-क्रीडा स्पर्धेत मोठे यश मिळेल. नोकरीत चांगला बदल झाल्याने उत्साह वाढेल. कोर्ट केस संपवण्यात यश मिळेल. शोधकार्य पूर्ण कराल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाने योग्य सल्ला घेऊन वागल्यास फायदा होईल.
शुभ दि. ०८, १०

- Advertisement -

मिथुन ः सिंह राशीत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे काम मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. पदाधिकार मिळेल. नोकरीत जम बसेल. घर, जमीन संबंधी कामे करून घेता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. संसारात घरातील व्यक्तींच्या सुखासाठी नवी योजना ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे महत्त्व दिसेल. कौतुक होईल. प्रेमाला चालना मिळेल. शोधकार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने एकाग्र मनाने ध्येयपूर्ती करावी. शुभ दि. ०९, ११

कर्क ः- सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य गुरू त्रिकोण योग होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे कंत्राट पूर्ण करून दाखवाल. वरिष्ठ खूश होतील असे काम हातून होईल. नोकरीत प्रभाव दिसेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकाल. घरातील व्यक्तींना खूश कराल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार प्रगती होईल. नवी ओळख होईल. पैसा मिळेल. खर्च होईल. शोधकार्य पूर्ण कराल. कोर्ट केस लवकर संपवा. विद्यार्थी वर्गाने विचलित न होता अभ्यासात लक्ष द्यावे. कंपनीद्वारे परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. शुभ दि. ०७, १३

- Advertisement -

सिंह ः- तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश, चंद्र मंगळ केंद्रयोग होत आहे. धंद्यात कल्पनाशक्ती वापरली तरी व्यवहारीक दृष्टिकोन ठेवावा लागतो. संयमाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. तुमच्या बोलण्यावर टीका होईल. लोकांना नाराज करू नका. घरातील कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाऊ शकतो. सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात तणाव होईल. अपयश येईल. कोर्ट केसमध्ये बोलताना काळजी घ्या. नम्र रहा. शोधकार्यात मदत मिळणे कठीण आहे. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत व चांगले भोजन करावे. शुभ दि. ०८, ०९

कन्या ः- या सप्ताहात मंगळ सिंह राशीत प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यातील मोठे काम लवकर पूर्ण करा. मोठे कंत्राट मिळवा. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. जनहितासाठी चांगले कार्य करा. योजना तयार करा. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. घरातील कामे होतील. किचकट कामे करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रशंसनीय यश मिळेल. कोर्ट केस रेंगाळत ठेऊ नका. शोधकार्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. परदेशात जाण्याची संधी शोधता येईल. विवाहासाठी प्रयत्न करा. शुभ दि. १२, १३

तूळ ः- सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचण येईल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात हिशोबात सावध रहा. काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरेल. अधिकार मिळेल. लोकप्रियता वाढवता येईल. घरगुती कामे होतील. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. लाभ मिळेल. नवीन परिचय उत्साह देणारा ठरेल. कोर्ट केस यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाची प्रगती वेगाने होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. ०९,१०

वृश्चिक ः- या सप्ताहात सिंह राशीत मंगळ प्रवेश चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात तुमचे मत पटवून देता येईल. ओळखीचा उपयोग होईल. मागील येणे वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्या सोयीनुसार योजना बनवा. त्यांच्या समस्या सोडवा. तरच तुमचे महत्त्व वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर घरगुती समस्या येईल. कामे वाढतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कल्पनाशक्तीचा उपयोग होईल. शोधकार्य पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. विद्यार्थी वर्गाने ठरविलेले क्षेत्र निवडता येईल. अविवाहितांना चांगले स्थळ मिळेल. शुभ दि. ०८, १२

धनु ः- सिंह राशीत मंगळ प्रवेश, सूर्य शनि षडाष्टक योग होत आहे. धंद्यात नम्रपणे बोलावे लागेल. भागीदार सांभाळून ठेवण्यात समस्या येऊ शकते. गोड बोलणार्‍या व्यक्तीकडून फसवणूक होईल. सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. तुमच्या विरोधात कारस्थान केले जाईल. लोकांच्या मनात गैरसमज करून दिला जाईल. संसारात नाराजी होऊ शकते. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. विरह संभवतो. कला-क्रीडा स्पर्धेत जिद्द ठेवा. वाहन जपून चालवा. शोधकार्यात अंदाज चुकेल. शुभ दि. १०, १३

मकर ः या सप्ताहात सिंह राशीत मंगळ प्रवेश सूर्य गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम पूर्ण करता येईल. भविष्यासाठी एखादा निर्णय घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. लोकांचे सहकार्य मिळवता येईल. त्यांच्या समस्येसाठी भांडता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीकारक वातावरण राहील. परदेशात जाण्याचा मार्ग मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. प्रवासात घाई करू नका. शोधकार्यात यशस्वी व्हाल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. संसारात सुखद वातावरण राहील. परीक्षेत मुलांना यश मिळेल. घर, जमीन खरेदी-विक्री कशी होईल.
शुभ दि. ०९, १२

कुंभ ः- सिंह राशीत मंगळ प्रवेश, मंगळ प्लुटो षडाष्टक योग होत आहे. धंद्यात तणावाखाली रहाल. कामगारांचा प्रश्न राहील. रागावर ताबा ठेवा. पैशाची गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. अनाठाई खर्च होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात आरोप-प्रत्यारोप मनस्तापकारक राहील. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. मनोबल स्थिर राहील याकडे लक्ष ठेवा. कला-क्रीडा स्पर्धेत माघार घ्यावी लागेल. कष्ट जास्त होतील. कोर्ट केसमध्ये अडचण वाढेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे बोलावे. चांगली संगत घ्यावी. शुभ दि. ११, १३

मीन ः सिंह राशीत मंगळ प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात ठरविलेले काम पूर्ण करता येईल. मोठे काम मिळवण्याच्या मागे लागा. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्यासाठी कार्यक्रम करा. प्रतिष्ठा मिळेल. योजनांना पूर्ण करा. नोकरीत बस्तान बसेल. विरोधकांना गप्प करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. साहित्याला नवा विषय मिळेल. घरातील लोकांना खूश करू शकाल. घर, जमीन यासंबंधी कामे करून घ्या. कोर्ट केस जिंकाल. शोधकार्यात यशस्वी व्हाल. व्यसनापासून लांब राहा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाची मनीषा पूर्ण होईल.
शुभ दि. ०८, १२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -