मेष ः- आपल्या जीवनात एखादी उत्तम संधी मिळण्याची शक्यता राहील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. धंद्यात नेटाने काम करा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. आप्तेष्टांशी, मित्रमंडळींशी वाद टाळा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळेल. थकबाकी वसूल करा. नवे कंत्राट मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. अधिकारात वाढ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे डावपेच यशस्वी होतील. शिक्षणात प्रगतीचा चांगला मार्ग मिळेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. शुभ दि. ४, ५
वृषभ ः- महत्त्वाच्या कामात अनेक गोष्टींचे अडथळे आले तरी आपण आपले ध्येय गाठण्यात प्रयत्नशील राहाल. आपणास अपेक्षितांकडून योग्य ते सहकार्य व मदतीचा हात मिळाल्याने आपल्या कार्याला चालना मिळेल. नाती सांभाळताना आपले अस्तित्व विसरू नका. नकारात्मक विचार सकारात्मक स्वरूपात बदलल्यास अधिक लाभदायक ठरू शकेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. आपल्या ध्येयापासून विचलित न होता पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात आशादायक वातावरण राहील. शोधमोहिमेत इतरांचे सहाय्य घेता येईल. ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाने प्रामाणिकपणे अभ्यास करावा. शुभ. १, ६
मिथुन ः- आपणास नोकरी-व्यवसायात एखादी संधी येण्याची शक्यता राहील. विरोधकांबाबत सध्या चिंता करण्याचे कारण नाही. शिक्षण, राजकारण अशा क्षेत्रात प्रगती कराल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. काही जबाबदार्या वाढण्याची शक्यता राहील. आत्मविश्वास टिकून राहील. धंद्यात काम मिळवण्यासाठी सौम्य शब्दांत बोला. दादागिरीची छटा दिसू देऊ नका. नोकरीत काम वाढेल. कायद्याच्या चौकटीतच कोणताही निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. शुभ दि. ३, ७
कर्क ः- उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, परंतु अनेक गोष्टींचा तिढा संयमाने सोडवू शकाल. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद न करता जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. वैवाहिक जीवनात वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. धंद्यातील परिस्थितीत सुधारता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात यश खेचता येईल. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. शिक्षणात आळस नको. चांगले मित्र ठेवा. शोधमोहिमेत प्रगती कराल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी करू शकाल. वेळेत काम करून देता येईल. नवे काम मिळवता येईल. प्रवासाचे बेत साध्य होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. शुभ दि. २, ४
सिंह ः- आपल्या कार्यक्षेत्रातील जागा टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा. विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासात सावधानता बाळगा. प्रवासाचे बेत साध्य करता येतील. सामाजिक क्षेत्रात आपली वाहवा होण्याची शक्यता राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धंद्यात किरकोळ अडचण येईल. काम वेळेत पूर्ण करता येईल. धार्मिक कार्यात रस घ्याल. जागेसंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता राहील. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठ तुमच्याकडे जबाबदारी देण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता दाखवावी लागेल. शुभ दि. ४, ७
कन्या ः- व्यापार उद्योगात गिर्हाईकांची ये-जा चांगली असल्यामुळे आपणास अपेक्षेनुसार पैसे मिळतील. काही जुनी देणी देणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल, पण त्यांच्या कलाने वागावे लागेल. धंद्यात काम मिळवता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध काम करावे लागेल. संसारात क्षुल्लक कारणाने नाराजी होऊ शकते. घरातील खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढवता येईल. कला-क्रीडा साहित्यात तुम्हाला प्रयत्नाने यश खेचता येईल. नवीनच ओळख झालेल्या माणसाबरोबर व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. शुभ दि. ६, ७
तूळ :- तुमच्यापुढचे प्रश्न सोडवण्याकरिता हितचिंतक उपयोगी पडतील. व्यापार उद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून साथ मिळणार नाही, पण इतर मार्गाने मदत मिळाल्याने तुमचे मनोधैर्य वाढेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा पूर्वी कंटाळा केला होता त्याचा उपयोग होईल. सहकार्यांवर जास्त विसंबून राहू नका. बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला धुडकावून लावू नका. धंद्यात किरकोळ समस्या येईल. तुमचे मत समोरच्या व्यक्तीला सविस्तरपणे समजवावे लागेल. गैरसमज होऊ शकतो. नोकरीत गोड बोलून काम करून घ्या. संसारातील कामे होतील. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख होईल. शुभ दि. २, ४
वृश्चिक :- ओळखीतून काम मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. मैत्रीत सावध राहा. नोकरीत प्रभाव पडेल. वरिष्ठांना खूश कराल. बदल करता येईल. संसारातील समस्या सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. विरोधक मात्र खंबीर राहतील. लोकांचे सहकार्य मिळवणे सोपे नसेल. राग वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पराक्रम कराल.
शोधमोहिमेत प्रगती होईल. राजकीय-सामाजिक कार्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. वेगाने जुनी कामे पूर्ण करा. तुमच्या विचारांवर टीका होईल. मन अस्थिर करू नका. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. आळस करू नका. शुभ दि. १, ४
धनु :- आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी व्हाव्यात असे वाटत असले तरी काही घटना मनाप्रमाणे होत नाहीत. त्याचा विचार न करता हुशारीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. त्याचा योग्य परिणाम दिसून येईल. आर्थिक बाजू सुधारण्याची संधी मिळेल. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात मतभिन्नतेमुळे तणाव होऊ शकतो. कोर्टाच्या कामात विचाराने बोला. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट ताणून धरू नका. घरातील कामे होतील. पदाधिकार मिळवा. मागे राहू नका. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. शोधमोहीम गाजेल. शुभ दि. ३, ७
मकर :- व्यापार उद्योगात काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची तुमची इच्छा असेल. बराच काळ चाललेले काम बंद करून त्याऐवजी दुसरे काम करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ परवानगी देतील असे गृहीत धरून कोणतेही काम परस्पर करू नका, अन्यथा वाद संभवतो. उतावळेपणा कुठेही उपयोगी पडणार नाही. संयम ठेवा. खंबीर राहा. धंद्यात सुधारणा करता येईल. उसने दिलेले पैसे वसूल करता येतील. राजकीय-सामाजिक कार्यात अभ्यासपूर्ण चर्चा करता येईल. योग्य अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. संसारातील कामे होतील. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. शोधमोहिमेत यश मिळेल. शिक्षणात जिद्द ठेवा. शुभ दि. १, ५
कुंभ :- घरातील वातावरण आनंदी राहील. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न कराल. नोकरीतील समस्या सोडवता येईल. चूक सुधारता येईल. अध्यात्मिक कार्यात मन रमेल. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. धंद्यात काम करताना घाई करू नका. व्यवहारात सावध राहा. दुसर्यांच्या चुका सुधाराव्या लागतील. संसारातील कामे होतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांचा गैरअर्थ काढला जाईल. आपसात भांडण लावण्याचा प्रयत्न विरोधक करतील. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. शोधमोहीम कठीण असेल. विद्यार्थी वर्गाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. शुभ दि. ४, ६
मीन :- काही कौटुंबिक जबाबदार्यांना सामोरे जावे लागेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. संसारात खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. चांगला बदल करण्याची संधी येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला अधिकार मिळतील. जनहितासाठी कार्य करीत राहा. अनोळखी व्यक्तींवर एकदम विश्वास ठेवू नका. घरामध्ये जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून दुरावा निर्माण होईल. कला-क्रीडा स्पर्धेत यश मिळवाल. कोर्टकेसमध्ये जिंकाल. सौम्य शब्दांत बोला. शोधमोहीम यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. प्रकृतीबाबत जागरूक राहा. शुभ दि. २, ५