घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार 1 जानेवारी ते शनिवार 7 जानेवारी 2023

राशीभविष्य रविवार 1 जानेवारी ते शनिवार 7 जानेवारी 2023

Subscribe

मेष ः- नवीन वर्ष तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश देणारे ठरणार आहे. तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. प्रगतीचा नवा टप्पा तुमच्या कार्यात तुम्हाला गाठता येईल. प्रयत्न करा. ग्रहांची उत्तम साथ मिळेल. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभ योग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात जम बसवण्याचा नवा प्रयत्न करा. वसुली होईल. नोकरीतील समस्या कमी होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा स्पर्धेत नावलौकीक मिळेल. शोध कार्यात वरिष्ठ खूश होतील. शिक्षणात उत्तम प्रगती कराल. शुभ दि. 1, 4

वृषभ ः- नवीन वर्ष आर्थिक लाभाचे असेल. परंतु अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. जबाबदारी वाढेल. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. जवळच्या व्यक्तीचा विरह होण्याचा संभव आहे. कोणताही वाद जास्त वाढवू नका. चंद्र शुक्र युती, चंद्र मंगळ केंद्रयोग या सप्ताहात होत आहे. मन खंबीर असले म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करता येतो. धंद्यात समस्या होईल. मोठे काम मिळाले तरी सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत कायद्याचे पालन करा. शोध मोहीम कठीण वाटेल. संसारात सर्वांकडून मदत मिळेल. शिक्षणात आळस नको. शुभ दि. 2, 5

- Advertisement -

मिथुन ः- नवीन वर्षात तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल. योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनाला कलाटणी मिळेल. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभ योग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. नवीन ओळखी होतील. त्याचा उपयोग होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात चांगली प्रगती कराल. संसारातील कामे कराल. सर्वांना खूश कराल. शुभ दि. 3, 6

कर्क ः- नवीन वर्षात संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. सुख-दुःख जीवनाला जोडलेले असतात. तुमच्या क्षेत्रात टिकून राहण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंध जपा. कोणताही अतिरेक नको. कायदा पाळा. या सप्ताहात चंद्र मंगळ त्रिकोण योग, बुध, गुरू युती होत आहे. धंद्यात तडजोड करण्याची वेळ येईल. गोड बोलून चर्चा करा. अरेरावीमुळे नुकसान होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी काम सावधपणे करा. कला-क्रीडा स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करा. घरात तणाव व चिंता राहील. खर्च वाढेल. शोध मोहीम सोपी नाही. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. 4, 7

- Advertisement -

सिंह ः- नवीन वर्षात तुमच्या कार्याचा ठसा उमटवता येईल. आर्थिक स्थिरता येईल. कठीण कामे करून घ्या. नवीन ओळखीतून तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे काम मिळेल. नावलौकिक वाढेल. कोर्ट केस संपवा. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, बुध, गुरू युती होत आहे. धंद्यातील तणाव कमी करता येईल. वसुली करा. मोठे काम मिळवा. नोकरीत बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्याची सुरुवात दमदार होईल. रागावर ताबा ठेवा. दगदग होईल. शोध मोहिमेत चमकाल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. घरातील समस्या सोडवाल. शुभ दि. 1, 3

कन्या ः- नवीन वर्षात तुमची चतुराई उपयोगात आणा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. कायद्याचे पालन करूनच व्यवहार करा. प्रतिष्ठा जपा. ग्रहांची साथ कमी असते तेव्हा अडचणी येतात. या सप्ताहात चंद्र, मंगळ त्रिकोण योग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. वसुली होणे कठीण वाटेल. गोड बोलून कामे करा. संसारात तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. अचानक प्रवास करावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात विलंबाने अधिकार प्राप्ती होऊ शकते. शोध मोहिमेत कष्ट जास्त होतील. शुभ दि. 2, 4

तूळ ः- नवीन वर्ष भरभराटीचे, उत्कर्षाचे असेल. वेळेला महत्त्व द्या. आळस सोडून तुमचे ध्येय गाठा. कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. तुमचा विकास होईल. गुप्त कारवाया ओळखून ठेवा. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात जम बसेल. वसुली लवकर करा. कोर्ट केस संपवा. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत जम बसेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. अधिकार मिळेल. शोध मोहीम फत्ते कराल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगती कराल. परदेशात जाल, घर, वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण कराल. शुभ दि. ३, 5

वृश्चिक ः- नवीन वर्षात तुम्हाला नवे आव्हान स्वीकारावे लागेल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही मोठे यश मिळवाल. तुमचे सोनेरी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करा. कठीण कामे करून घेता येतील. ओळखी वाढतील. या सप्ताहात चंद्र गुरू लाभयोग, बुध गुरू युती होत आहे. प्रत्येक दिवस यशाकडे नेणारा आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळवा. नोकरीत प्रगती कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांची नाराजी होऊ शकते. कला-क्रीडा शिक्षणात पुढे जाल. प्रयत्न करा. केस जिंकाल. शुभ दि. 4, 6

धनु ः- नवीन कार्यात तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. प्रगतीचे नवे दालन खुले होईल. मागील अपयश पुसून टाका. नवे कार्य आरंभ करा. तुमचे क्षेत्र तुम्हाला गाजवता येईल. साडेसाती सुरू आहे. गुरुबल तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. चंद्र शुक्र युती, बुध गुरू युती होत आहे. रागावर ताबा ठेवा. वसुली करा. घरातील समस्या कमी होतील. नोकरीतील ताण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा काबीज करता येईल. केस जिंकाल. स्पर्धेत चमकाल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. शुभ दि. 5, 7

मकर ः- जीवन म्हटले की चांगले, वाईट अनुभव त्याच्याबरोबर जोडूनच येतात. नवीन वर्षात नवी परीक्षा द्यावी लागेल. नवे शिकावयास मिळेल. उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासाचा बेत आखाल. संयम व खंबीरपणा यामुळेच सप्ताहात पुढे जाता येईल. चंद्र शुक्र युती, चंद्र मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात समस्या वाढेल. मित्र मदत करतील. नोकरीत कामात चूक करू नका. कायदा पाळा. राजकीय-सामाजिक कार्यात अतिरेक नको. टीका करताना सावध रहा. प्रतिष्ठा सांभाळा. स्पर्धा करताना मेहनत घ्या. दुश्मनी नको.
शुभ दि. 1, 5

कुंभ ः- नवीन वर्ष उत्कर्षाचे आहे. जबाबदारी वाढेल. नोकरी धंद्यात तुम्हाला स्थिर होता येईल. प्रतिष्ठा वाढेल. जीवनाला योग्य वळण देता येईल. विवाह, संततीप्राप्ती होईल. पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करा. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. जम बसेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत बढती होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. कठीण काम करून घ्या. केस जिंकाल. शोध मोहीम यशस्वी होईल. शुभ दि. २, 6

मीन ः- नवीन वर्षात नवे पाऊल समृद्धीकडे पडेल. ग्रहांची साथ आहे. प्रयत्न करा. मोठे यश प्राप्त करा. ओळखी होतील. मान-सन्मान मिळेल. जीवन मार्गी लावता येईल. घर, वाहन, घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. या सप्ताहात सूर्य चंद्र लाभ योग, बुध गुरू युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळेल. घरातील लोकांना दुखवू नका. मैत्रीत गैरसमज होईल. नोकरीत प्रगतीकारक बदल होऊ शकेल. केस जिंकाल. शोध मोहिमेत प्रसिद्धी मिळेल. स्पर्धेत यश येईल. शिक्षणात उच्च पदवी घ्याल. शुभ दि. 3, 7


 

- Advertisment -