राशीभविष्य रविवार १० ऑक्टोबर ते शनिवार १६ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- सूर्य चंद्र षडाष्टक योग, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. धंद्यातील समस्या कमी होईल. नवे कामही मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक मदत करतील. दसर्‍याच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होण्याचा संभव आहे. विरोधक कट रचतील. घरातील समस्या कमी होईल. आप्तेष्ट मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रयत्न फार करावे लागतील. शोध कार्यात तत्परता ठेवा. डोके शांत ठेवा. शिक्षणात वाकडी वाट धरून यश मिळणार नाही. शुभ दि. १०, १५

वृषभ ः या सप्ताहात सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरू लाभ योग होत आहे. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. पैसे गुंतवताना सावध रहा. नोकरांना फटकारून चालणार नाही. संसारात नाराजी होऊ शकते. संयम ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव टिकवता येईल. लोकांची समस्या समजून त्यावर उपाय करा. तरच तुमचे महत्त्व राहील. नोकरीत बदल करण्याची संधी घेता येईल. विवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. मैत्रीत अतिरेकी वागणे, मस्करी करणे त्रासदायक ठरेल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. शिक्षणात प्रगती होईल. आळस करू नका. शुभ दि. १२,१६

मिथुन ः- या सप्ताहात बुध हर्षल प्रतियुती सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. भागिदारासंबंधी समस्या सोडवता येईल. मोठे काम मिळेल. नवीन परिचयाचा उपयोग होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा राग वाढेल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तत्पर रहा. आळस करून चालणार नाही. चूक सुधारा. घरातील समस्या कमी होतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कल्पनाशक्ती वाढेल. शोध मोहिमेत दगदग होईल. शिक्षणात लक्ष द्या. मन स्थिर ठेवा. शुभ दि. १३,1५

कर्क ः- या सप्ताहात सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र मंगळ प्रतियुति होत आहे. आत्मविश्वासाने धंद्यात सुधारणा करता येईल. मागिल येणे वसूल करा. रविवारी राग वाढवणारी घटना घडेल. संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व दिसेल. वरिष्ठ खुष होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करा. चांगली संधी थोड्या काळासाठी असते. नावलौकिक वाढवा. वाद करण्यापेक्षा कार्य करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. शिक्षणात पुढे जाल. चांगली संगत ठेवा. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. संततीच्या प्रगतीसाठी योजना बनवता येईल. शुभ दि. १५,१६

सिंह ः- या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोण योग, बुध हर्षल प्रतियुति होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. थकबाकी वसूल होऊ शकेल. संसारातील वाद मिटवता येईल. विजयादशमीच्या दिवशी क्षुल्लक कारणाने संताप येऊ शकतो. वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत बदल होऊ शकेल. डोळ्यांसाठी खर्च करावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठी संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. शोध मोहिमेत तुमची तडफदार वृत्ती कौतुकास्पद ठरेल. शिक्षणात पुढे जाल. नवे मित्र मिळतील. शुभ दि. १०,१६

कन्या ः- या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोण योग, चंद्र मंगळ प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी राग वाढेल. जुळत आलेले काम फिसकटण्याची शक्यता आहे. धंद्यात फायदेशीर योजना मिळेल. कंत्राट मिळेल. मागिल येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. आत्ताच विशेष कार्य करून दाखवता येईल. वादविवादापेक्षा कामावर भर द्या. नोकरीत चांगला प्रभाव पडेल. बढती मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शोध मोहिमेत यश मिळेल. प्रवासात घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. शिक्षणात मन एकाग्र करा. शुभ दि. ११,१३

तूळ ः- या सप्ताहात बुध हर्षल प्रतियुती, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. तुम्ही ठरवाल तेच घडेल असे समजून चालू नका. तडजोड करावी लागेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. दुखापत होऊ शकते. धंद्यात वाढ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणताही प्रश्न जास्त चिघळू देऊ नका. घरातील लोकांची मदत घेता येईल. खरेदीचा विचार येईल. प्रतिष्ठेचा विचार करू नका. उदास व्हाल. शोध कार्यात दिशाभूल होऊ शकते. कला-क्रीडा स्पर्धेत यश मिळवणे सोपे नाही. शिक्षणात कष्ट घ्या. वडिलधार्‍यांचा अपमान करू नका. शुभ दि. १५, १६

वृश्चिक ः- सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र मंगळ प्रतियुति होत आहे. या सप्ताहात प्रत्येक दिवस तुम्हाला यश देणारा ठरेल. धंद्यात धावपळ होईल. काम देण्याचे आश्वासन मिळेल. नोकरांची गैरहजेरी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. लोकांची नाराजी ओळखावी लागेल. खर्च वाढेल. संसारात घरातील व्यक्ती तुमच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवतील. खरेदी कराल. खिसापाकीट नीट सांभाळा. नोकरीत वरिष्ठांना खुष कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहीम यशस्वी कराल. दसर्र्‍यच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. शिक्षणात चांगले मार्गदर्शन मिळू शकेल. शुभ दि. १३, १५

धनु ः- बुध हर्षल प्रतियुती, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करू शकाल. मोठे काम मिळवता येईल. मागिल येणे वसूल होईल. नोकरीत चांगला बदल होऊ शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात योग्य पद्धतीने काम होईल. आर्थिक सहाय्य समाजकार्यासाठी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांकडून प्रगतीची बातमी कळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नविन ओळखीतून काम मिळेल. शोध मोहीम उत्तम कराल. शिक्षणात पुढे जाल. चांगली संगत चांगला परिणाम घडवते. शुभ दि. १२,१६

मकर ः- सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. रविवार क्षुल्लक अडचण तुमच्या कामात होईल. धंद्यात पक्का निर्णय घेता येईल. मोठे कंत्राट मिळेल. मागिल येणे वसूल करू शकाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. ध्येय गाठण्यासाठी योग्य मांडणी करा. म्हणजे जास्त कामे होतील. दौर्‍यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. काम करण्याची संधी समोरून येईल. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात मागे राहू नका. व्यसनाने माणूस जीवन उद्ध्वस्त करतो. शुभ दि. १४, १६

कुंभ ः- चंद्र बुध त्रिकोण योग, सूर्य चंद्र षडाष्टक योग या सप्ताहात होत आहे. धंद्यातील समस्या कमी करता येईल. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करू शकाल. ओळखीतून कामे मिळतील. दसर्‍याच्या दिवशी धावपळ करताना सावध रहा. दुखापत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या मनावर ओझे राहील. टीका सहन करावी लागेल. नोकरीच्या कामात लक्ष द्या. चूक होईल. निर्णय घाईत घेऊ नका. वाद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. शोध मोहिमेत ताण होईल. शिक्षणात प्रगती कराल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. शुभ दि. १०, १४

मीन ः- या सप्ताहात सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. दसर्‍यापर्यंत तुमची कामे वेगाने पूर्ण होतील. धंद्यात वाद होईल. नोकर माणसे कुरकुर करतील. जुने येणे वसूल करणे सोपे नाही. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व दिसेल. दौर्र्‍यत खाण्या-पिण्याची काळजी घ्या. भलत्या मोहात अडकू नका. रागावर ताबा ठेवा. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. जिद्दीने पुढे जाल. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. शोध मोहिमेत दगदग होईल. शिक्षणात नवा मार्ग शोधता येईल. अनाठाई खर्च टाळा. व्यसनाने वेळ फुकट जाईल. शुभ दि. १४,१६