मेष ः- या सप्ताहात प्रश्नांची भेंडोळी सुटू लागतील. अनेक अडचणींवर मात करता येईल. अनेकांची मदत मिळू लागेल व बर्याच प्रमाणात अपेक्षित यश मिळवता येईल, मात्र अनोळखी व्यक्तींवर विश्वास न टाकणे हितकारक राहील. घरात क्षुल्लक मतभेद होतील. धंद्यात समोरच्या व्यक्तीचे मत ऐकून घ्यावे लागेल. धंद्यात रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक गैरसमज करून घेतील. कला-क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. कोर्ट केसमध्ये योग्य पद्धतीनेच बोला. घरात जबाबदारी वाढेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत गुप्त कारवायांचा त्रास होईल. वाहन नीट चालवा. शुभ दि. १३, १५
वृषभ ः- अपेक्षित यश मिळेल. घरगुती वातावरण चांगले राखता येईल. धंद्यातील कामे आताच करा. मोठे काम मिळवा. मागील येणे वसूल कराल. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवता येईल. लोकांना मदत करून तुमचे स्थान बळकट करा. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत प्रगतीकारक वातावरण राहील. घर, जमीन घेण्याचे ठरवाल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्ती साथ देईल. विद्यार्थीवर्गाने आळस न करता ध्येयावर लक्ष द्यावे. कोर्टकेससारखी समस्या संपवा. प्रवासाचा बेत आखाल. शुभ दि. ११, १६
मिथुन ः- कौटुंबिक जीवनातील प्रश्नांना सामोपचाराने सामोरे जावे लागणार आहे. अनेक प्रश्नांची मालिका आपल्या पुढे उभी राहण्याची शक्यता आहे, विशेषतः घरातून आणि बाहेरूनही. धंद्यात चांगली सुधारणा होईल. मागील येणे वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल. योजनांना मागे ठेवू नका. घरातील समस्या सुटतील. तब्येतीची काळजी घ्या. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची चांगली संधी मिळेल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. कोर्टाच्या कामात जिंकाल. विद्यार्थी वर्गाला ध्येय गाठता येईल. कलाक्षेत्रात चांगला वाव मिळेल. शुभ दि. १४, १७
कर्क ः- धंद्यात आतापासूनच जम बसवण्याचा प्रयत्न करा. योग्य संधीचा फायदा घ्या. घरातील महत्त्वाची कामे होतील. वाटाघाटीत आपल्याला यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. मागे झालेली चूक सुधारून टाका. वैर भिजत ठेवू नका. पुढे त्यापासून त्रास होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. विशेष कार्य करून दाखवाल. आपली तब्येत उत्तम राहील. कोर्ट केस संपवता येईल याकडे लक्ष द्या. कुटुंबात एखादा सुखद समाचार मिळेल. आपला प्रवास सुखकारक होईल. नोकरीत प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने एकाग्र मनाने अभ्यास करावा. कोणत्याही क्षणी मोहाला बळी पडू नका. त्यामुळे फसगत होण्याची शक्यता आहे. मित्र वेळेवर मदत करतील. शुभ दि. ११, १५
सिंह ः- हाती घेतलेल्या कामाला गती मिळू शकेल. नोकरदारांकडून मिळणारा प्रतिसाद आणि ग्राहकांची पसंती याद्वारे नफ्याचे प्रमाण वाढवता येईल, मात्र एखाद्या खरेदीत अथवा व्यवहारात आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. धंद्यातील तणाव वाढू शकतो. तडजोड स्वीकारावी लागेल. नोकर माणसांकडून मनस्ताप, नुकसान संभवते. रागाचा पारा वाढेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही कृत्य करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात बोलताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा. वरिष्ठांचा दबाव राहील. नोकरीत कोणतीही चूक होऊ शकते. दुर्लक्ष करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. कामात धावपळ होईल. शुभ दि. १२, १६
कन्या ः- या सप्ताहात मोठ्या अपेक्षा न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवा. नोकरी-व्यवसायात आणि कुटुंबातही काही शुभ चिन्हे दिसू लागतील. धंद्यात मोठे काम मिळेल. चर्चा करताना तणाव होण्याची शक्यता आहे. संयमाने वागा. फायदा होणारे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेता येईल. योजनांना गतिमान करता येईल. लोकांपर्यंत तुम्हाला जावे लागेल. त्यामुळेच तुमचे स्थान पक्के होईल. घरातील कामे होतील. घर, जमीन खरेदी -विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. गोड पदार्थ खाण्यास मिळतील. विद्यार्थी वर्गाने ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. शुभ दि. १५, १७
तूळ ः- या सप्ताहात आपण काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ यशाच्या दिशेने नेता येणे शक्य आहे. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. कुटुंबात चांगले दिवस घालवू शकाल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत फायदेशीर योजना राबवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांची मर्जी राहील. पदाधिकार मिळेल. योजना तयार करून लोकांपर्यंत त्या पोहचवा म्हणजे अधिक परिणामकारक परिस्थिती तयार होईल. नवीन ओळखी होतील. शुभ दि. १४, १५
वृश्चिक ः- कौटुंबिक वातावरण गढूळ होणार नाही याची दक्षता घ्या. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे कंत्राट मिळवता येईल. मागील येणे वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकांच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीसाठी चांगली ऑफर येईल. परदेशात जाता येईल. संसारात सुखद संवाद साधता येईल. अविवाहितांना चांगली स्थळे मिळतील. कल्पनाशक्तीचा उपयोग करता येईल. कोर्ट केस यशस्वी होईल. कामात सुखकारक घटना घडतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. परीक्षेसाठी उत्तम तयारी करता येईल. शुभ दि. १२, १७
धनु ः- या सप्ताहात प्रकृतीस्वास्थ्याबाबत सतर्कता ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाची कामे योग्य माणसावरच सोपवणे या सप्ताहात आवश्यक ठरणार आहे. घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आणताना मिळणारा मदतीचा हात मोलाचा ठरेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित अशा गोष्टी साध्य करणे शक्य होईल. कामगार त्रस्त करतील. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला सहनशीलता ठेवण्याची गरज आहे. प्रवासात घाई करू नका. स्पर्धेत मेहनत कामी येईल. वाद वाढवू नका. कोर्ट केसमध्ये तणाव होऊ शकतो. कामाचा उत्साह वाढीला लागेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. शुभ दि. १३, १७
मकर ः- आर्थिक व व्यावहारिकदृष्ठ्या आठवडा चांगला जाणारा राहील. यशदायी सप्ताह राहील. नोकरी-व्यवसायात कोणाला दुखावू नका. वास्तूविषयक गोष्टींना चालना मिळेल. घरातून उत्तम पाठिंबा मिळेल. विविध अनुभव येतील. धंद्यात जम बसवा. आताच चांगली संधी मिळू शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वादाचे प्रसंग येतील. खूप लोकांना तुमचे स्पष्ट बोलणे आवडते. ते खरे असते म्हणून लोकप्रियता मिळते. प्रेमाने सर्वांना एकत्र कराल. संसारातील कामे होतील. मुले, जीवनसाथी यांना खूश करता येईल. घर, जमीन खरेदी-विक्री होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. शुभ दि. १६, १७
कुंभ ः- आर्थिक बाजू सावरता येईल. वैवाहिक जीवनात काही मतभेद असण्याची शक्यता राहील, पण ते सामोपचाराने सोडवावेत. प्रकृतीची पथ्ये पाळा. नातलगांसाठी धावपळ करावी लागेल. खर्च होईल. धंद्यात मंदी जाणवेल. भागीदार कुरबुर करेल. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. राजकीय-सामाजिक कार्यात छोटीशी चूक मोठी करून दाखवली जाईल. अपमान करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. योग्य वेळी सहकारी वर्गाची मदत मिळेल. स्पर्धेत यशस्वी व्हाल. कोर्ट केसमध्ये विजय संभवतो. वरिष्ठांचा दबाव राहील. नातेवाईकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. नोकरीत फायदेशीर बदल होईल. शुभ दि. ११, १६
मीन ः- या सप्ताहात आर्थिक बाजू सुधारण्याची संधी मिळू शकेल. आपल्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल. काही जुने येणेही वसूल होण्याची शक्यता राहील. आगामी काळाची काहीशी तरतूद करणे शक्य होईल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत मात्र चालढकलपणा करू नका. वेळीच औषधोपचार करा. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या निर्णयाने येणार्या प्रसंगांना आनंदाने सामोरे जा. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मागील येणे वसूल कराल. मोठे काम मिळेल. कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलताना नम्रता ठेवा. राजकीय-सामाजिक कार्याला वेग देता येईल. लोकांना सहाय्य कराल. घरातील कामे होतील. शुभ दि. १४, १७