घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार ११ सप्टेंबर ते शनिवार १७ सप्टेंबर २०२२

राशीभविष्य रविवार ११ सप्टेंबर ते शनिवार १७ सप्टेंबर २०२२

Subscribe

मेष : या सप्ताहात कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. नोकरांना सांभाळून ठेवा. गिर्‍हाईकाला दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा राहील. नेते, सहकारी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. संततीची मदत मिळेल. घरात क्षुल्लक वाद होईल. जमीनसंबंधी कामे करण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन ओळख होईल. मोहाला बळी पडू नका. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. मित्र मनातून जेलसी करतील. काम पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. व्यसनाने तुमचे नुकसान होईल. शुभ दि. ११, १२

वृषभ : या सप्ताहात कन्या राशीत शुक्र-बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना खूश कराल. योजना पूर्ण करण्यासाठी मदत कराल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. नोकरीत बदल करता येईल. घर, जमीन, खरेदी करता येईल. संसारात शुभ घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. नवीन परिचय होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस लवकर संपवा. कामात मोठी प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला मेहनत घेतल्याचे चांगले फळ मिळेल. शुभ दि. ११, १३

- Advertisement -

मिथुन : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश होत आहे. धंद्यात क्षुल्लक अडचण येईल. नोकरांची कमी जाणवेल. वादाला जास्त महत्त्व देऊ नका. मैत्रीत गैरसमज होईल. घर, जमीन यासंबंधी प्रश्न सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विचारवंतांचा सल्ला घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. लाभ मिळेल. घरातील लोकांचा विचार ऐकून घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात यश मिळेल. जुने मित्र आर्थिक मदत मागण्यास येतील. प्रवासाचा बेत आखाल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाने योग्य संगत ठेवावी. शुभ दि. १२, १३

कर्क : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. फायदा होणारे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. तुमच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. कामात वाद व तणाव होईल. तुम्ही समस्या वाढवू देऊ नका. तुमचा विचार पटणे कठीण होईल. घरात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरीत मनाप्रमाणे बदल होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन परिचय होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. प्रकृती सांभाळा. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ दि. ११, १४

- Advertisement -

सिंह : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, बुध प्लुटो त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मोठी वाढ करता येईल. ओळखीतून कामे मिळवता येतील. थकबाकी वसूल करा. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात क्षुल्लक वाद होईल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्याला गती मिळेल. आत्मविश्वासात भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी मिळवाल. बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष यश व प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील. जमीन, घर यासंबंधी प्रश्न सोडवता येईल. जुने मित्र भेटतील. काम यशस्वीपणे पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला प्रेरणा मिळेल. यशस्वी व्हाल. शुभ दि. १३, १५

कन्या : तुमच्याच राशीत या सप्ताहात शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव कमी होऊ शकेल. वाद मिटवता येईल. नोकर मिळतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करू नका. प्रवासात घाई नको. तब्येत सांभाळा. मारामारीचा प्रसंग येऊ शकतो. दुखापत होईल. सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात परिस्थिती पाहूनच बोला. तुमचे मत स्फोटक ठरवले जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. जास्त अपेक्षा ठेऊ नका. कामात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी.
शुभ दि. ११, १६

तूळ : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अडथळे येतील. तुमचे स्पष्ट बोलणे काही लोकांना पटणार नाही. नोकर माणसे कामात गोंधळ करतील. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. चर्चा फायदेशीर ठरेल. नोकरीत वरिष्ठ मानाने वागवतील. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. घरातील कामे वाढतील. दगदग होईल. थकवा वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. प्रसिद्धी मिळेल. कामात बदल होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. वेळेला महत्त्व द्यावे. वाहन जपून चालवा.
शुभ दि. १३, १७

वृश्चिक : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात चांगली वाढ होईल. मोठे काम मिळेल. मोठे लोक मदत करतील. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व मिळेल. लोकांना खूश कराल. विरोधक मैत्री करतील. घरातील कामे होतील. अविवाहितांना स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. ओळखी वाढतील. बुद्धिचातुर्य दिसून येईल. गोड बातमी मिळेल. नोकरीत मोठ्या फायद्याचा बदल करता येईल. कोर्ट केस यशस्वी कराल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल.
शुभ दि. १४, १५

धनु : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश, सूर्य नेपच्यून प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. काम मिळेल. महत्त्वाच्या लोकांची भेट घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. दौर्‍यात यश मिळेल. मान-सन्मान मिळेल. घरातील समस्या सोडवता येतील. प्रकृतीत सुधारणा होईल. घर, जमीनसंबंधी कामे करून घ्या. आप्तेष्ठ भेटतील. तुमचा उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखीचा फायदा होईल. नवे काम मिळेल. पुरस्कार मिळेल. लोकांच्यात मिसळा म्हणजे तुमचे गुण दिसतील. प्रवास सुखाचा होईल. विद्यार्थी वर्गाला प्रगती करता येईल. ध्येय लक्षात ठेवावे.
शुभ दि. १६, १७

मकर : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुम्हाला माणसांच्या प्रवृत्तीचा नवा अनुभव येईल. त्यामुळे कोणत्या पद्धतीने वागायचे हे ठरवता येईल. धंद्यात सुधारणा करता येईल. वाद मिटवता येईल. रविवारी रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही खंबीर राहू शकाल. अरेरावी मात्र करू नका. नोकरीत फायद्यानुसार निर्णय घ्या. बेकायदा कृत्य टाळा. काम उत्तमरित्या पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाने वेळ फुकट घालवू नये. व्यसन टाळावे. स्पर्धा कठीण असेल.
शुभ दि. १४, १६

कुंभ : कन्या राशीत शुक्र, बुध प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात नवीनच समस्या येऊ शकते. सप्ताहाच्या सुरुवातीला मतभेद होतील. धावपळ होईल. हिशोब नीट तपासा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. तुम्ही योजनांच्यावर लक्ष केंद्रित करा. लोकांना मदत करा. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून मनस्ताप होऊ शकतो. अनोळखी माणसांच्या बरोबर व्यवहार करू नका. घरात जवळच्या व्यक्तीसाठी धावपळ होईल. खर्च वाढेल. खाण्याची काळजी घ्या. प्रवासाचा बेत आखाल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. वाहनाचा वेग कमी ठेवावा.
शुभ दि. १६, १७

मीन : या सप्ताहात कन्या राशीत, शुक्र, बुध, प्रवेश करीत आहे. चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. मैत्रीतील वाद मिटवता येईल. धंदा वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात सौम्य धोरण ठेवा. वरिष्ठांच्या वागण्याचा तुम्हाला राग येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. भांडणापासून दूर राहा. मारा-मारी करू नका. वाद पकटन वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी कामात लक्ष द्या. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत होईल. नवीन ओळखी होतील. उत्साह वाढेल. कामात कष्ट पडतील. दगदग होईल. विद्यार्थी वर्गाने उतावळेपणा करू नये. नम्र रहावे. शुभ दि. १५, १६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -