Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य : रविवार १२ सप्टेंबर ते शनिवार १८ सप्टेंबर २०२१

साप्ताहिक राशीभविष्य : रविवार १२ सप्टेंबर ते शनिवार १८ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील अडचणी कमी होतील. नवे काम मिळेल. फायदा होईल. नोकरीतील तणाव कमी होईल. संसारातील कामे होतील. गैरसमज दूर करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देता येईल. दुसर्‍यांचा विचार ऐकून घ्या. कदाचित तुम्हाला त्यातून नवा विचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. स्पर्धा जिंकाल. शोध मोहिमेत यश मिळेल. कोर्ट केसमध्ये जिंकण्याची आशा निर्माण होईल. शिक्षणात आळस न करता अभ्यास करा. प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. १४, १५

वृषभ : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यातील तुमचा अंदाज चुकणार नाही याकडे लक्ष द्या. कामगार कुरकुर करतील. खर्च वाढू शकतो. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला कठीण काम देतील. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. विचलित होऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात उतावळेपणा, अहंकार न ठेवता कार्य करा. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून फसगत होईल. दौर्‍यात स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात गैरसमज होईल असे बोलणे टाळा. संसारात कामे वाढतील. धावपळ होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. शोध मोहिमेत यश खेचून आणता येईल. मुलांनी चांगली संगत ठेवावी. शुभ दि. १३, १८

- Advertisement -

मिथुन : या सप्ताहात तुला राशीत सूर्य प्रवेश, बुध प्लुटो लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. अधिक फायदा होईल. मोठे कंत्राट मिळेल. उत्साह वाढवणारी घटना नोकरीत घडेल. परदेशात जाण्यासाठी तुमच्या नावाची शिफारस केली जाईल. संसारातील तणाव कमी होईल. घर, वाहन येण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्व टिकून ठेवता येईल. वरिष्ठ खूश होतील, असे कार्य करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुकास्पद काम कराल. नवीन ओळख होईल. मैत्री वाढेल. शोध मोहिमेत यश मिळेल. सप्ताहाच्या शेवटी वाहन जपून चालवा. कोर्ट केस जिंकता येईल. शुभ दि. १३, १४

कर्क : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. गुरु पौर्णिमेला शुभ घटना घडेल . धंद्यात वाढ करता येईल. वेळकाढू धोरण मात्र कोणत्याही कामात करू नका. नोकरीत फायदा होणारा बदल करता येईल. ओळखीतून चांगले काम मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती देऊन काम पूर्ण करा. लोकांचे सहकार्य मिळेल. जनहिताचा निर्णय घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. नवे मित्र मिळतील. कोर्ट केस लवकर संपवण्याचा प्रयत्न जरूर करा. शोध मोहिमेत यश मिळेल. घर, जमीन खरेदी-व्रिकीत फायदा होईल. शिक्षणात जिद्द ठेवा. आळस करू नका. शुभ दि. १३, १४

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात तुला राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात ओळखीतून काम मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जम बसेल. मागिल येणे वसूल करा. नोकरीत प्रगती होईल. तणाव कमी होईल. डोळ्यांची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार प्रभावी ठरतील. लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. मैत्री होईल. विचारांना चालना मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. शोध मोहिमेत यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कौटुंबिक वातावरण सुधारता येईल. तणाव कमी होईल. प्रयत्न करा. शिक्षणात पुढे जाता येईल. शुभ दि. १४, १५

कन्या : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. तुमच्या धंद्याला मोठे स्वरूप मिळेल. विक्री वाढेल. मोठी ऑर्डर ओळखीतून मिळवता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशात जाण्यासाठी तुमचे नाव पुढे येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या ठरविलेल्या योजना पूर्ण करा. वेळेला महत्व द्या. लोकसंग्रह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कौतुक होईल. नवे मित्र मिळतील. कोर्ट केससंबंधी समस्या सोडवता येईल. प्रयत्न करा. रागावर ताबा ठेवावा लागेल. शोध मोहीम विशेष ठरेल. शिक्षणात प्रगती करता येईल. शुभ दि. १३, १८

तूळ : या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. तुमचा मूड जाण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा. धावपळ करू नका. वाहन जपून चालवा. नोकरीत कामाचा व्याप असला तरी जबाबदारी पूर्ण कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे वरिष्ठ ऐकून घेतील. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. विरोधक क्षुल्लक टीका करून तुमचा राग वाढवण्याचा प्रयत्न करतील. घरातील कामे होतील. खरेदी कराल. भटकण्याचा बेत कराल. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकण्याची शक्यता वाढणार आहे. ओळखी होतील. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. १४, १५

वृश्चिक : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यातील चर्चा वादग्रस्त ठरू शकते. त्यामुळे काळजी घ्या. कठोर शब्द वापरू नका. उदास होऊ नका. काम मिळवण्याचा प्रयत्न करा. मैत्रीत तणाव होऊ शकतो. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात निर्णय घेताना उतावळेपणा होऊ शकतो. इतरांना कमी लेखू नका. त्यामुळे तुमचे महत्व वाढेल असे समजू नका. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह कमी पडेल. घरातील कामे वाढतील. दुसर्‍यांच्यासाठी धावपळ करावी लागेल. कोजागिरी पौर्णिमेला शुभ समाचार मिळेल. शोध मोहिमेत कष्ट जास्त होतील. शाब्दिक चकमक होईल. शुभ दि. १३, १८

धनु : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात चांगली बातमी मिळेल. रेंगाळत राहिलेले काम करून घेता येईल. मागिल येणे वसूल करा. मोठ्या लोकांची मदत मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना महत्व दिले जाईल. लोकांचे सहकार्य मिळेल. मान-सन्मान वाढेल. घरातील कामे होतील. घर, वाहन, दुकान घेण्याचा-विकण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्साह वाढेल. शोध मोहीम यशस्वी होईल. कोर्ट केस महत्वाची ठरेल. शिक्षणात प्रगती होईल. चांगली संगत ठेवा. कायदा पाळा. शुभ दि. १३, १४

मकर : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. धंद्यात लवकरच ठोस निर्णय घ्या. कामे मार्गी लावा. समस्या, भागिदारीतील वाद मिटवा. नोकरीत चांगला बदल करता येईल. परदेशात जाण्यासाठी तुमचे नाव घेतले जाईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्व वाढवण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या समस्या सोडवा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. घरातील व्यक्तीचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी नवा विचार कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. ओळखी होतील. कोर्ट केस जिंकता येईल. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. १३, १८

कुंभ : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. तणाव कमी होईल. मागिल येणे वसूल करा. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. नोकरीतील कामे होतील. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्व वाढेल. तुमचे विचार पटवून घेतले जातील. लोकप्रियता मिळेल. घरातील नाराजी कमी होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घर, जमीन, खरेदी-व्रिकीत फायदा होईल. कोर्ट केस जिंकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात आळस नको. शुभ दि. १३, १४

मीन : या सप्ताहात तूळ राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात नमते धोरण ठेवल्यास समस्या वाढणार नाही. कामगारांचा विचार ऐकून घ्या. आश्वासन द्या म्हणजे नाराजी होणार नाही. मोठे काम मिळवा. नोकरीत वरिष्ठांचा विचार घ्या. कायदा मोडू नका. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने कार्य करा. भलत्या मोहाला बळी पडू नका. अहंकार न ठेवता जनतेला मदत करा. घरातील जबाबदारी वाढेल. नातलगांसाठी धावपळ होईल. खर्च करावा लागेल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. आपसात गैरसमज होईल. शोध मोहिमेत दिशाभूल होऊ शकते. जिद्दीने यश मिळवता येईल. शुभ दि. १३, १४

- Advertisement -