Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024

Horoscope : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024

Subscribe

मेष:- योग्य व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत तुम्हाला मिळू शकेल. नोकरीमध्ये ज्या चांगल्या संधींनी तुम्हाला हुलकावणी दिली त्याचा पाठपुरावा कराल. तरुणांच्या जीवनात बहार येईल. खरेदीचे बेत पार पडतील. तुमचे मत मांडताना बेसावध राहू नका. नोकरीत तुमच्या परीक्षेचा कालावधी ठरू शकतो. घरातील समस्या कमी होतील. आप्तेष्टांच्या भेटी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप होतील. प्रकरण वाढू देऊ नका. मार्ग मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा विभागात आत्मविश्वास वाढेल. परिचयाचा फायदा करून घेता येईल. कोर्टाच्या कामात तत्परता दाखवा. नम्र राहा. शुभ दि. 15, 19

वृषभ :- तुमचा हुरूप वाढेल. उद्योग व्यवसायात जे बेत तुम्ही आखून ठेवले त्यात यशस्वी व्हाल. घरात खूशखबर मिळेल. धंद्यात काम मिळेल. हिशोबात चूक करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक, जवळचे लोक नाहक अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही तटस्थ राहा. घरातील कामे होण्यास विलंब होऊ शकतो. खर्च वाढेल. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत कामाचा व्याप राहील, पण तुम्ही पुढे राहाल. शोधमोहिमेत सहकारी मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्ट केसमध्ये फसगत टाळा. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यास करून यश खेचून आणावे. शुभ दि. 13, 14

- Advertisement -

मिथुन:- उद्योग व्यवसायाच्या कामात जर शिथिलता आली असेल तर आता त्यामध्ये हळूहळू गती येईल. सरकारी कामे व कोर्टव्यवहार अशा कामांना वेग द्याल. प्राप्तीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसू लागतील. गुप्त कारवाया तुम्ही ओळखाल. घरामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याचे निराकरण होण्याची आशा निर्माण होईल. धंद्यात जम बसवता येईल. आपली धावपळ वाढेल. जमिनीशी निगडित कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. वेळेला महत्त्व द्या. प्रयत्नाने यश मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. सामाजिक कार्यात रागावर ताबा ठेवा. प्रवासात, दौर्‍यात काळजी घ्या. एखादी खूशखबर मिळेल. शुभ दि. 13, 18

कर्क :- धंद्यात सुधारणा करू शकाल. घरात चांगली घटना घडेल. नोकरीत अधिकारी वर्गाला मदत करू शकाल. तुमचा प्रभाव वाढेल. संसारात किरकोळ समस्या येईल. आपल्या रागावर ताबा ठेवावा. तुमचा काहीही दोष नसताना ज्या प्रश्नांमध्ये तुमचा विनाकारण वेळ किंवा शक्ती खर्च झाली त्यातून बाहेर पडता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याबद्दल झालेला गैरसमज दूर करता येईल. वाटाघाटीच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. शोधमोेहीम यशस्वी कराल. कला क्षेत्रात विशेष मन रमेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. तुमच्या कामात नावलौकिक मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष द्यावे, तरच उत्तम यश मिळेल. शुभ दि. 15, 19

- Advertisement -

सिंह :- लांबलेली कामे गती घेतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा झालेला गैरसमज तुम्ही चांगले काम करून दूर कराल. घरामध्ये कठीण समस्येवर सर्वानुमते तोडगा काढला जाईल. धंद्यात नवे काम लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा. मागील वसुली करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती आणि प्रसिद्धी होईल. कोर्ट केस प्रभावी ठरवता येईल. शोधमोहिमेत आपणास धाडसी पाऊल उचलावे लागेल. नोकरीत अधिकारी वर्गाच्या धाकाखाली काम करावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यातला तणाव कमी करता येईल. प्रतिष्ठा सांभाळता येईल. रागावर ताबा ठेवावा. लोकसंग्रह वाढवा. विद्यार्थी वर्गाने मोठ्या व्यक्तीचा सल्ला मानावा. शुभ दि. 17, 18

कन्या:- व्यापार उद्योगामध्ये आर्थिकदृष्ठ्या चांगल्या योजना राबवण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील तर त्या तुम्ही दूर करू शकाल. घरामध्ये कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. मिळतेजुळते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. नोकरीत काम वाढेल. कामाचा गोंधळ होऊ शकतो. उतावळेपणा दिसू देऊ नका. योग्य विचाराने कोणतेही विधान करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आपली तब्येत सांभाळा. शोधमोहिमेत दगदग वाढेल. कोर्टाच्या कामात योग्य शब्द वापरा. परीक्षेसाठी मुलांनी आळस करू नये, तरच प्रगती होईल. शुभ दि. 13, 15

तूळ:- शिक्षण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवता येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरात काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता राहील. घरासंबंधीच्या प्रश्नांना छान गती मिळेल व अपेक्षांची पूर्तता करू शकाल. धंद्यात वाढ करता येईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. तटस्थपणे तुमचे काम करा. नोकरीत कामाची गर्दी होईल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक छोट्या गोष्टींचा बाऊ करतील. संततीकडून अध्ययनात यश मिळू शकेल. प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अपरिचित व्यक्तीशी जपून आणि नेमकेच बोला. शुभ दि. 16, 19

वृश्चिक:- सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडू शकाल. सरकारी नियमांचे पालन करा. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जोडीदाराचे उत्तम सहाय्य मिळेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. मोठ्या लोकांकडून आश्वासन मिळेल. धंद्यात विलंबाने यश येईल. नोकरीत काम वाढेल. प्रेरणादायी घटना घडेल. प्रवासात घाई करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त हितशत्रू कारवाया करतील. प्रतिष्ठेवर टीका होईल. प्रभाव मात्र तुमचाच राहील. स्पर्धा जिंकणे सोपे नाही. घाईने निर्णय घेऊ नका. कोर्टाच्या कामात मुद्दा नीट समजून घ्या. परीक्षेसाठी अभ्यासाला आळस करू नये. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. शुभ दि. 13, 15

धनु:- हुशारी, सामंजस्य व संयम यांचा अवलंब केल्यास बर्‍याचशा गोष्टी साध्य करू शकाल. सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळू लागेल. प्रवासाचे योग येतील. सरकारी कामांना प्राधान्य द्याल. अनेक प्रकारचे निर्णय घेता येतील. व्यवसायात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. कोर्टाच्या कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. आपलेच खरे करण्याचा हट्ट न धरता सामंजस्य बाळगणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही कारणाने आपली प्रतिष्ठा डागाळणार नाही याची काळजी घ्या व त्या दृष्टीने वागण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. शुभ दि. 16, 19

मकर:- नोकरीमध्ये एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम संपण्याची चिन्हे दिसू लागतील. घरामध्ये विरंगुळा देणारे आणि करमणूक करणारे काही कार्यक्रम सर्वानुमते ठरतील. धंद्यात वाढ करता येईल. ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. एकाग्र व्हावे. यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. चांगल्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. व्यसनी, कुसंगतीपासून दूर राहणे हितकारक राहील. राजकारण, क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सरळ मार्ग स्वीकारा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्याने वागा. दुसर्‍याचा विचार ऐकून घ्यावा. शुभ दि. 13, 14

कुंभ:- राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. कठीण काम रेंगाळत ठेवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस जिंकाल. शोधमोहिमेत खंबीरपणा दिसेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. धंद्यात वाढ करताना क्षुल्लक अडचण येईल. वाद वाढवू नका. प्रवासात सावध राहा. व्यसनाच्या नादी लागू नका. नोकरीत तुमच्याकडून महत्त्वाचे काम करून घेतले जाईल. प्रतिष्ठा वाढेल. किरकोळ कारणाने घरातील व्यक्तींची नाराजी होण्याची शक्यता आहे. कामात तुमचा उत्साह वाढेल. मनात ठरवलेले काम करून घेण्याची जिद्द ठेवा. रागावर ताबा ठेवा. खर्च वाढेल. आपल्या जोडीदाराचा सल्ला डावलू नका. शुभ दि. 15, 17

मीन:- आपल्या कार्यक्षेत्रात नव्या कार्याचा तसेच योजनांचा आरंभ करता येईल. आपली प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या समस्या सोडवाल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या प्रकृतीबाबत विशेष लक्ष द्यावे. कमी महत्त्वाच्या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाका. शोधमोहिमेत बाजी माराल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीत आळस करू नये. मोठे यश संपादन करता येईल. आवडत्या छंदामध्ये थोडा वेळ घालवाल. तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. धंद्यात व्यावहारिक चर्चा नीट करा. शुभ दि. 13, 18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -