घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार १३ मार्च ते शनिवार १९ मार्च २०२२

राशीभविष्य रविवार १३ मार्च ते शनिवार १९ मार्च २०२२

Subscribe

मेष : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. धावपळ वाढेल. वादाचा प्रसंग टाळा. राहिलेले पैसे वसूल करा. कर्जाचे काम करून घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनात राहून वागल्यास नुकसान होईल. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी वेळ द्या. घरातील कामे होतील. वास्तू, जमीन खरेदी-विक्री करण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दि. 13, १5

वृषभ : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. घरातील कामे वेळच्या वेळी करून घ्या. थट्टा-मस्करी करताना काळजी घ्या. वाद, गैरसमज होतील. धंद्यात आळस न करता काम करा. अनाठाई खर्च होईल. त्यावर बंधन घाला. नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने तुमचा मान वाढेल. होळीच्या सणाला चांगली बातमी कळेल. धूलिवंदनाला व्यसन करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. योजलेले काम पूर्ण करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. नवीन ओळख झालेल्या माणसावर भरवसा ठेवू नका. शोधमोहीम यशस्वी कराल. मोह आवरा. शुभ दि. १6, १8

- Advertisement -

मिथुन : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करून घेता येईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. बदल करता येईल. घरातील कर्तव्य पूर्ण करा. मुले, जीवनसाथी यांना खूश करता येईल. वास्तू, दुकान खरेदीचा विचार करू शकाल. होळीचा सण उत्साह, आनंद देईल. धूलिवंदन नीट साजरे करा. राजकीय क्षेत्रात तुम्हाला लोकप्रियता मिळेल. योजना पूर्ण करता येतील. लोकप्रियता मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे कार्य कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासात सावध राहा. केस जिंकाल. शुभ दि. 14, १9

कर्क : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात प्रयत्न केल्याशिवाय काम मिळणार नाही. रागावर ताबा ठेवा. बाकी वसुली करता येईल. नोकरीत तणाव होईल. काम जास्त वाटेल. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाला व्यसन करू नका. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. घरातील वृद्ध व्यक्तीविषयी समस्या वाढत आहे असे वाटेल. राजकीय क्षेत्रात तुमचा अहंपणा दिसून येईल. सामाजिक कार्यात लोकांसाठी उत्साहाने काम करा. ओळखी वाढतील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत होईल. कोर्ट केस जिंकणे सोपे नाही. शोधमोेहिमेत धावपळ होईल. शुभ दि. १3, १6

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात कठीण निर्णय लवकर घेऊन कामास सुरुवात करा. कर्जासाठी प्रयत्न करता येतील. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. होळीच्या दिवशी आनंदी वातावरण राहील. धूलिवंदन दिवशी व्यसन करू नका. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. प्रॉपर्टी खरेदीचा विचार होईल. मुलांची प्रगती समाधानकारक ठरेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या मुद्यावर लवकर चर्चा करा. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पैसा मिळेल. जनहितासाठी काम कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोधमोहीम यशस्वी होईल. शुभ दि. 17,१8

कन्या : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, शुक्र हर्षल युती होत आहे. धंद्यात छोट्या कारणावरून तणाव होऊ शकतो. भागीदारी सोडण्याची भाषा होईल. कर्ज वाढवू नका. नोकरीत काम करताना चूक होण्याचा संभव आहे. होळीच्या सणाला मोठी खरेदी कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनाच्या नादी लागू नका. मौजमजा करण्यात वेळ जाईल. संसारात जवळच्या व्यक्तीचा विरह संभवतो. मनस्थिती बिघडेल. राजकीय क्षेत्रात रागावर ताबा ठेवा. सामाजिक कार्यात भलत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. विरुद्ध व्यक्तीकडून अपमान होईल. शोधमोहीम त्रासाची वाटेल. शुभ दि. १4,१9

तूळ : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात कामाचा अंदाज नीट घ्या. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी तारतम्य ठेवा. वाहवत जाऊ नका. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. मौजमजेत वेळ घालवाल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची कामे लवकर मार्गी लावा. सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करता येतील. नवीन मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. अर्थसहाय्य समजून समाजासाठी योजना करता येतील. शोधमोहीम यशस्वी कराल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 15,१6

वृश्चिक : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. आपसात गैरसमज होऊ शकतो. काळजी घ्या. काम तुटता कामा नये. सौम्य शब्दांत घरात, बाहेर बोला. नोकरीत जबाबदारी वाढेल. जवळचे लोक ईर्षेने वागतील. होळीच्या सणादिवशी आनंद, उत्साह द्विगुणीत होईल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसन करू नका. घर, वाहन इ. खरेदीचा विचार कराल. राजकीय क्षेत्रात विरोधक आक्रमक होतील. प्रतिष्ठा राहील. सामाजिक कार्याला मनाप्रमाणे प्रतिसाद मिळणे कठीण आहे. नुकतीच ओळख झालेल्या माणसांबरोबर व्यवहार करणे टाळा. कोर्ट केस जिद्दीने जिंका. शुभ दि. 13,१8

धनू : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात तुमची विचार करण्याची पद्धत कौतुकास्पद ठरेल. भागीदार खूश होईल. कर्जाचे काम होईल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. नोकरी मिळेल. घरातील समस्या सोडवता येतील. वाटाघाटीसंबंधी प्रश्न निकालात काढा. होळीचा सण उत्साहात साजरा कराल. धूलिवंदनाच्या दिवशी व्यसनाच्या नादी लागू नका. राजकीय क्षेत्रात प्रभाव पडेल. भाषणात बाजी माराल. समाजकार्य वेगाने पुढे नेता येईल. वेळेला महत्त्व द्या. कला-क्रीडा क्षेत्रात नवे प्रोत्साहन मिळेल. कोर्ट केस जिंकाल.
शोधमोहीम गाजेल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. 15,१9

मकर : या सप्ताहात मीन राशीत सूर्य प्रवेश, सूर्य नेपच्यून युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात जम बसवता येईल. नवे काम मिळवा. होळी सणाला आनंददायी वातावरण राहील. कोणतेही व्यसन माणसाला कमीपणा देणे हे लक्षात ठेवा. धुळीवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन घातक ठरेल. नोकरीत प्रभाव वाढेल. बदली करण्याचा विचार करता येईल. घरातील व्यक्तींना खूश कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. राजकीय क्षेत्रात योजनांच्या वर काम करा. तुमचे विचार पक्के करा. सामाजिक कार्यात फसगत होऊ शकते. मदत मागणारी व्यक्ती प्रथम नीट तपासून पहा. कला-क्रीडा क्षेत्रात नवे शिकाल. शुभ दि. १6,१7

कुंभ : मीन राशीत सूर्य प्रवेश, शुक्र हर्षल युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. होळीचा सण परिवारासोबत आनंदाने साजरा कराल. धुलीवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष द्या. वाद वाढवू नका. प्रवासात घाई नको. धंद्यात वाढ होईल. नवे कामही मिळेल. मागिल येणे मिळवा. घर खरेदीचा विचार कराल. राजकीय क्षेत्रात तुमचे काम महत्त्वाचे ठरेल. योजनांना न्याय घ्या. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकसंग्रह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शोध मोहिमेत यश मिळेल. शुभ दि. १7, १9

मीन : या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश होत आहे. चंद्र शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. वाट पहा. सौम्य शब्दात तुमचे मत नोकरीत व्यक्त करा. कायद्याचे पालन करा. उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. घरातील वडील माणसांचा सल्ला घ्या. त्यांची काळजी घ्यावी लागेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या मुद्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्र मदत करतील. होळीच्या सणाला मौज मजा कराल. धुळीवंदनाच्या दिवशी कोणतेही व्यसन करू नका. सामाजिक कार्यात अतिशयोक्तीपूर्ण बोलू नका. संधीची वाट पहा, मगच कामे होतील. शोध मोहिमेत सहकारी मदत करतील. शुभ दि १3, १7

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -