राशीभविष्य रविवार १४ ऑगस्ट ते शनिवार २० ऑगस्ट २०२२

horoscope
राशीभविष्य

मेष ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या कमी करता येईल. नवे काम सप्ताहाच्या शेवटी मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला दिशा देणारी घटना घडेल. मुले सहकार्य करतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. कामाचा व्याप वाढेल. घरातील ताण-तणाव मिटवता येईल. घर, जमीन घेण्याचा विचार कराल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख होईल. कोर्ट केससंबंधी योग्य चर्चा करता येईल. विद्यार्थी वर्गाचा उत्साह वाढेल. शुभ दि. १४, १७

वृषभ ः या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळवण्याचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ अडचण येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांकडून तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल. लोकांच्या समस्या सोडवण्यात कोणतीही कसूर करू नका. घरातील कामे होतील. वाटाघाटीत यश मिळेल. शेअर्सचा अंदाज सावधपणे घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. कोर्ट केस लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाला चांगले मित्र मिळतील. शुभ दि. १५, १८

मिथुन ः या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. नवीन सुधारणा करू शकाल. मोठे काम मिळेल. मंगळवार, बुधवार प्रवासात घाई करू नका. घरात क्षुल्लक तणाव होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या ठरविलेल्या योजना पुढे नेता येतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मोठी ऑफरही तुम्हाला मिळेल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. शुभ दि. १४,१९

कर्क ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. ग्रहांचा बदल फायद्याचा असला तरी मन अस्थिर राहील. रागाचा पारा वाढेल. संयमाने वागा. धंद्यात चांगली संधी मिळेल. मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करा. स्वतःचे प्रस्थान बसवा. अनेक लोक जोडले जातील असे काम करा. पुढे त्याचाच उपयोग होईल. घरात आनंदी वातावरण राहील. घर, जमीन खरेदी करू शकाल. परदेशात नोकरीची, शिक्षणाची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. ओळखी होतील. कोर्ट केस संपवा. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. शुभ दि. १५, १७

सिंह ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. समस्या वाढू शकतात. कोणतीही समस्या अधिक गुंतागुंतीची करून ठेऊ नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात मतभेद होतील. तुमच्यावर टीका होईल. घरातील वाद विकोपाला जाऊ देऊ नका. नोकरीत कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. सप्ताहाच्या शेवटी मार्ग मिळवण्याची आशा वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात टिकून रहा. कोर्ट केस किचकट असेल. कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. उतावळेपणा कुठेही करू नका. शुभ दि. १६, १८

कन्या ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात अडचण वाढू शकते. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. संसारात चर्चा करता करता मुद्दा वादाकडे जाण्याची शक्यता आहे. प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. जमीन, घर यासंबंधी कामे रेंगाळतील. समस्या येईल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. आर्थिक व्यवहार करताना नीट विचार करा. कोर्ट केस जिकरीची ठरेल. कामात जबाबदारी वाढेल. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवावा लागेल. विद्यार्थी वर्गाने आक्रमक भूमिका न घेता सलोख्याने वागावे. शुभ दि. १५, २०

तूळ ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात जुने येणे वसूल करता येईल. मोठे काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. नवीन ओळखी होतील. राजकीय-सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. प्रतिष्ठा मिळेल. लोकप्रियता वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न करा. संसारात शुभ समाचार मिळेल. कर्जाचे काम होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होईल. नव्या कामाचे आश्वासन मिळेल. परदेशात जाल. कोर्ट केस संपेल. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कामात यशस्वी व्हाल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. १७, १९

वृश्चिक ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. मूळ पत्रिकेत ज्याच्या हे ग्रह त्याच ठिकाणी असतील त्यांना विशेष लाभ होईल. धंद्यात वाढ होईल. वसुली करता येईल. नोकरीत चांगली प्रगती होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वाढ होईल. अधिकार मिळेल. मान-सन्मान होईल. संसारातील उणीव भरून काढता येईल. संततीप्राप्तीचा योग येईल. विवाहासाठी चांगले स्थळ मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा जिंकाल. शिक्षणात उत्साह वाढेल. कोर्ट केस जिंकाल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. शुभ दि. १६, २०

धनु ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यश देणारा ठरेल. धंद्यात वाढ करता येईल. समस्या सुटेल. आर्थिक मदत मिळेल. मनावरील ताण हलका होईल. राजकीय-सामाजिक कार्यात उत्साहवर्धक घडेल. वरिष्ठांना खूश करता येईल. प्रयत्न जोरदार करा. लोकांच्या उपयोगी पडा. घरातील वातावरण सुधारेल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. ओळखी वाढतील. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. प्रवास सुखाचा होईल. विद्यार्थी वर्गाने जिद्द सोडू नये. शुभ दि. १४, १८

मकर ः या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. रविवार, सोमवार मनावर ताण येईल. प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात एखादी तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात विरुद्धलिंगी व्यक्तीकडून फसगत होऊ शकते. सावध रहा. तुमचे मनोबल वाढणारी घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. टिकून राहता येईल. संसारात कामे वाढतील. क्षुल्लक वाद होईल. नोकरीत बदली संभवते. कोर्ट केसमध्ये बेसावध राहू नका. वरिष्ठांचा सल्ला घ्या. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत घ्यावी. व्यसन नको. शुभ दि. १५, १९

कुंभ ः- या सप्ताहाच्या शेवटी सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई नको. राजकीय-सामाजिक कार्यात तटस्थ भूमिका ठेवा. अभ्यास करून ठेवा. योग्य संधी मिळेल तेव्हा तुमचा मुद्दा मांडा. संसारात संमिश्र वातावरण राहील. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. घर, जमीन यासंंबंधी कामे करण्यासाठी एखादी व्यक्ती भेटेल. कला-क्रीडा क्षेत्रात तणाव संभवतो. कोर्टाच्या कामात अडचण येईल. थोड्या विलंबाने काम होईल. विद्यार्थी वर्गाला सहनशीलतेचा कंटाळा येईल. वाहन हळू चालवा. शुभ दि. १४, २०

मीन ः या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवी प्रवेश करीत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. गोड बोलणारी व्यक्ती धोकादायक असू शकते. राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. कट करणारे लोक लावालावी करतील. तुम्ही स्थिर रहा. हलक्या कानाचे राहू नका. संसारात महत्त्वाचा निर्णय घ्याल. कला-क्रीडा क्षेत्रात थोरा-मोठ्यांचा परिचय होईल. मार्गदर्शन मिळेल. कोर्टाच्या कामात फसगत होऊ देऊ नका. नोकरीत वरिष्ठ कौतुकाने तुमच्याकडे मोठे काम देतील. प्रवासाचा बेत आखाल. विद्यार्थी वर्गाने हार मानू नये. नम्र रहावे. शुभ दि. १६, १९