मेष ः- शुभवार्ता समजल्याने उत्साह वाढीला लागेल. विशेषतः बँक कर्मचारी, शिक्षण क्षेत्र, खेळाडू या क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यात एखादी भेट मिळण्याची शक्यता राहील. प्रवासाचे योग येतील. धंद्यात किरकोळ अडचण येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला तडजोड करावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला काही ठिकाणी तटस्थपणे राहून तडजोड करावी लागेल. विचार मांडा, पण आग्रह धरू नका. जवळच्या लोकांना नीट समजून घ्या. घरातील समस्येवर उपाय शोधता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. नवीन ओळखी होतील. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वरिष्ठांबरोबर जमवून घ्यावे लागेल. शुभ दि. १७, २१
वृषभ ः- आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. एकंदरीत पाहता वैवाहिक जीवनात आनंददायी प्रसंगाने मानसिक समाधानाचे क्षण येतील. कामात झोकून देण्याचा मार्ग अधिक सुखकर व यशदायी ठरेल. धंद्यात चांगला जम बसवता येईल. प्रयत्न करा नवे कामही मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती द्या. वेळेला महत्त्व द्या. लोकप्रियता वाढवा. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. नोकरीत वर्चस्व वाढेल असे काम करा. कोर्ट केस संपवा. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ वाद व अडचण येऊ शकते. शोधकार्यात प्रगती कराल. शुभ दि. १६, २०
मिथुन ः- नव्या व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कुरबुरी सतावण्याची शक्यता आहे. कोणाचीही नाराजी पत्करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आपल्या बर्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकतील. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळवता येईल. प्रयत्नांचा जोर वाढवा. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना खूश करता येईल. नवी योजना पूर्ण करण्याची तयारी करा. दौर्यात यश मिळेल. मागील येेणे वसूल कराल. संसारात सुखद समाचार मिळेल. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थीवर्गाचा आलेख चढा राहील. शुभ दि. १५, १६
कर्क ः- बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहा व नियमित औषधपाणी घ्या. कुठल्याही गोष्टींचा फक्त विचार न करता प्रयत्न व कृतीला प्राधान्य द्या. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंददायी राहील. धंद्याला कलाटणी मिळेल. समस्या सोडवता येतील. गुंतवणूक करणारे भागीदार मिळतील. मोठे कंत्राट मिळवाल. संसारातील तणाव कमी होईल. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात चुका सुधारून चांगले भरीव कार्य करता येईल. लोकसंग्रह वाढवा. पुढच्या यशासाठी प्रयत्न करा. विचारांना दिशा देता येईल. शुभ दि. १७, २१
सिंह ः- आर्थिक व्यवहारात झालेले गैरसमज दूर करता येतील. ज्येष्ठांच्या सल्ल्याने काही मोठे व्यवहार मार्गी लावता येतील. एखाद्या छोट्या व्यक्तीकडूनसुद्धा तुमचे अडलेले काम होऊ शकेल. धंद्यात कोणताही व्यवहार सावधपणे करा. गुंतवणूक करताना फसू नका. घरात क्षुल्लक तणाव होईल. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. ग्रहमान आपणास साथ देणारे राहील. कला, साहित्य, संस्कृती मार्गाने आपली प्रगतीची वाटचाल होऊ शकेल. सामाजिक क्षेत्रात मानमरातब मिळण्याची संधी प्राप्त होईल. शोधकार्यात धावपळ होईल. रागावर ताबा ठेवा. आपले उद्दिष्ट गाठू शकाल. प्रवासाचे योग येतील. कामाचा आनंद घेता येईल. शुभ दि. २०, २१
कन्या ः- सरकारदप्तरी असणारी आपली कामे मार्गी लागतील. स्वतःचाच दुराग्रह चालू ठेवणे अहितकारक राहील. धंद्यात आळस न करता समस्या सोडवा. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकेल. मोठे कंत्राट मिळवून ठेवाल. नोकरीत बदल करता येईल. वरिष्ठ खूश होतील. राजकीय-सामाजिक कार्यात दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्या. संसारात आनंदाची बातमी मिळेल. कार्याची मांडणी करा. वेळेला महत्त्व द्या. संसारात समजुतीने वागा. कला-क्रीडा क्षेत्रात चमत्कारजन्य कामगिरी करून दाखवाल. आपली प्रसिद्धी वाढेल. कोर्ट केस संपवा. सप्ताहाच्या शेवटी अडथळा येईल. विद्यार्थ्यांना चांगला मार्ग निवडता येईल. शुभ दि. १७, २०
तुला ः- आर्थिकदृष्ठ्या हा आठवडा फार मोठ्या उलाढालीचा नसला तरी उधारीची वसुली व रोखीचे व्यवहार यातून आपणास अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल. धंद्यात जम बसेल. पैसा योग्य ठिकाणी गुंतवाल. थकबाकी वसूल कराल. आपल्या संसारात चांगली घटना घडेल. तुमचा कामाचा उत्साह वाढेल. राजकीय-सामाजिक कार्याला योग्य वेळी अपेक्षित गती देता येईल. लोकप्रियतेत वाढ होईल. स्वतःचे स्थान निर्माण करू शकाल. नोकरी मिळेल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे शिक्षणात पुढे जाता येईल. शुभ दि. १५, १९
वृश्चिक ः- मुलांच्या प्रगतीच्या वार्तांनी घरातील वातावरण चांगले राहील. धंद्यात वाढ होईल. कामगारांकडून थोडा त्रास होऊ शकतो. नोकरीतील तणाव कमी होईल. तुमचे बोलणे जाचक वाटू शकते. राजकीय-सामाजिक कार्यात अधिक वेगाने प्रगती करता येईल. पुढील यशाचा मार्ग खुला होईल. लोकांच्या समस्या सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. संसारात चांगली घटना घडेल. तणाव कमी होईल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी अडचण येईल. शोधकार्य पूर्ण कराल. प्रवास योग संभवतात. नोकरी-व्यवसायात मिळणार्या संधीचा योग्य उपयोग करून आपला लाभ करून घेता येईल. शुभ दि. १६, १७
धनु ः- व्यापारात येणार्या संधीचा लाभ घेतल्याने अपेक्षित नफा मिळवता येईल. प्रवासाचे योग संभवतात. नव्या क्षेत्रांचा व व्यक्तींचा परिचय होईल व त्याचा लाभ घेता येईल. भागीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. लोकांची नाराजी होऊ शकते. दौर्यात काळजी घ्या. आपण प्रवासात सावध राहावे. कला-क्रीडा स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे आहे. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना सावध राहा. कोर्ट केस जिंकाल. शोधकार्यात प्रगती होईल. वरिष्ठांना दुखवू नका. वरिष्ठांचा सल्ला ऐकावा. शुभ दि. १५, २०
मकर ः- घरातील मोठ्यांचा सल्ला आपल्या दैनिक व्यवहारासाठी व भावी काळासाठी मोलाचा ठरणार आहे. जागेसंबंधीच्या प्रश्नांना सुलभता येईल. वाहन खरेदीबाबतही चालना मिळेल. पथ्ये मात्र पाळा. काही वेगळे अनुभव येतील. धंद्यात सुधारणा करता येईल. नवी दिशा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योग्य विषयांची मांडणी करून कार्य केले पाहिजे. भविष्याकडे लक्ष ठेवा. जिद्द ठेवा. मोठ्यांचा सल्ला घेता येईल. घरातील तणाव मिटेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष यश मिळवता येईल. नोकरीत प्रभाव दाखवाल. शोधकार्यात प्रगती होईल. कोर्ट केस लवकर संपवा. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. शुभ दि. १८, २१
कुंभ ः- आपले सहकारी आणि वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मन स्थिर राहिल्यास आपल्या समस्येवर उपाय शोधता येईल. धंद्यात तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. नोकरीत कायद्याचे पालन करूनच निर्णय घ्यावेत. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दबाव राहील. नोकरी-व्यवसायात आपणास लाभ घेता येणे शक्य होईल. क्षुल्लक वाद संभवतो. प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा तटस्थपणे प्रसंग अभ्यासा. कला-क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना बढतीच्या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागेल. आर्थिक बाबतीत चांगले व्यवहार करू शकाल. शुभ दि. १५, १७
मीन ः- वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. मुलांचे प्रश्न सामोपचाराने सोडवू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. धंद्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. काम वाढेल. अडचण दूर करू शकाल. तुमच्या राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. मोठ्या यशासाठी आताच प्रयत्न करावा. आपल्या हितशत्रूंची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. लोकांच्या मनात स्थान निर्माण कराल. घरगुती कामे होतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी काम कराल. प्रवासाचे योग येतील. कामकाजात गुंतून राहणेच हितकारक ठरणार आहे. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. कोर्ट केस जिंकाल. विद्यार्थ्यांची प्रगती वेगाने होईल. शुभ दि. १८, २०