Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 17 नोव्हेंबर ते शनिवार 23 नोव्हेंबर 2024

Horoscope : रविवार 17 नोव्हेंबर ते शनिवार 23 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष :- अनेक क्षेत्रांमध्ये आपली यशाची घोडदौड सुरू राहील. घरातील कौटुंबिक वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहील. मुलांकडून आपणास शैक्षणिक क्षेत्रातील सुवार्ता समजतील. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत. धंद्यात जम बसवाल. मागील येणे वसूल करा. कोणावरही व्यवहाराच्या बाबतीत संपूर्ण विश्वास ठेवताना त्याची शहानिशा करावी. दैनिक व्यवहारात काही अडथळे येऊ शकतात. डोळ्यांसंबंधीच्या आजारावर विशेष लक्ष द्यावे. नवीन ओळखीतून आपणास चांगले काम मिळवता येईल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. प्रकृतीकडे लक्ष ठेवा. शुभ दि. 20,23

वृषभ :- धंद्यातील महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. धंद्यात वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत टिकून राहता येईल. कधीही कठोर बोलणे टाळा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मदतीने निर्णय घ्या. सप्ताहाच्या शेवटी संसारात तणाव होऊ शकतो. मैत्रीत गैरसमज होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शोधमोहीम यशस्वी करता येईल. व्यसनात वेळ घालवू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात मेहनत घ्यावी. ओळखी वाढतील. कोर्ट केस संपवा. शोधमोहीम यशस्वी होईल. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करताना दक्षता घ्यावी. शुभ दि. 18, 19

- Advertisement -

मिथुन :- धंद्यात मोठे कंत्राट मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. नोकरी मिळेल. बदल करता येईल. वैवाहिक जीवनातील आपली मतभेदाची दरी वाढणार नाही याची दक्षता घ्या. कोणालाही शब्द अथवा आश्वासने देऊ नका. आपले कार्य साध्य होण्यासाठी गोड बोलून कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारा. प्रकृतीची पथ्ये पाळा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. योजना मार्गी लावता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. जुना वाद मिटवा. व्यवहार पूर्ण करा. शुभ दि. 21, 23

कर्क :- धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. मार्ग मिळेल. दादागिरी चालणार नाही. कामगार वर्गाचा विचार ऐकून घ्या. विरोध करण्याने काम बिघडेल. नम्रता ठेवा. गोड बोला. रागावर ताबा ठेवा. नोकरीत गुप्त कारवायांचा त्रास होईल. कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. योजना गतिमान होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात उच्च यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात कोणतेही आक्रमक विधान करणे योग्य ठरणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात यश हुकण्याची शक्यता आहे. प्रयत्नानेच यश मिळेल. शुभ दि. 17, 22

- Advertisement -

सिंह :- व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी. धंद्यात वेळेला महत्त्व द्या. नवे काम मिळवा. जमिनीसंबंधीचे काम लवकर करून घ्या. नोकरीत प्रभाव राहील. सप्ताहाच्या मध्यावर धावपळ होईल. घरात किरकोळ वाद होईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. मोठा निर्णय घेता येईल. घर, वाहन घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख होईल. शोधमोहीम गाजेल. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत यश देईल. जास्त प्रयत्न करा. मोठे यश मिळवाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 19, 23

कन्या :- कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडित व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. काही ठिकाणी कठीण प्रसंगांचा सामना करावा लागणार आहे. धंद्यात वाद वाढवू नका. हातात असलेले काम पूर्ण करा. नोकरवर्गाला प्रेमाने वागवा. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होऊ शकते. भडक डोक्याने निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात काही लोक तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जी माहिती देतील ती नीट तपासून पाहा. मगच बोला. मुलांनी अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 17, 21

तूळ :- आपण प्रत्येक कृतीत तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास पुष्कळसे प्रश्न सोपे होऊ शकतील. कामात एकाग्रपणा ठेवा. प्रवासाचे योग येतील. खाण्यापिण्याची पथ्ये मात्र कटाक्षाने पाळा. महिलांनी सगळ्यांना समजून घेण्याचे धोरण स्वीकारावे. प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. कामाचे योग्य नियोजन कराल. धरसोड वृत्ती ठेवू नका. कौटुंबिक वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. कौटुंबिक कुरबुरी उद्भवतील. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. धंद्यात मेहनत घ्या. लाभ वाढेल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. 22, 23

वृश्चिक :- आपली आर्थिक बाजू सावरता येईल. सरकारी नियमांना प्राधान्य द्या व कायद्याची चौकट सांभाळावी. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. जुने येणे वसूल होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. नोकरीत गुप्त कारवाया होतील, मात्र आपला प्रभाव राहील. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. सौम्य धोरण ठेवा. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आपला आत्मविश्वास व अनुभव यांचा योग्य उपयोग करता येईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. नव्या ओळखीचा व्यवसाय-उद्योगासाठी उपयोग करून घेता येईल. शुभ दि. 18, 19

धनु :- व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट, कचेरीशी निगडित प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल. वाहनांशी निगडित व्यवसाय करणार्‍यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. धंद्यात सुधारणा करा. नवे काम मिळवा. वसुली करा. ओळखी वाढतील. तुम्हाला अधिकार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पुढे जाता येईल. नव्या योजना करा. जनसंपर्क वाढवाल. नावलौकिक मिळेल. घरातील कामे होतील. प्रेमाला चालना मिळेल. जीवनाला चांगली कलाटणी मिळेल. शुभ दि. 20, 22

मकर :- कौटुंबिक सौख्य लाभेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रयत्न करा. समस्या सोडवा. ओळखीतून काम मिळेल. हातात असलेले काम लवकर पूर्ण करा. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. कठोर भाषेत कुणावरही टीका करू नका. बाजू तुमच्यावर उलटू शकते. कायदा पाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. मोठे ध्येय समोर ठेवा. भलत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचे विचार बदलू नका. मागील जुना अनुभव तुम्ही आठवा. प्रगतीसाठी संघर्ष करावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कोर्ट केस जिंकाल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. नियमित अभ्यास करावा. प्रयत्नानेच यश खेचावे लागेल. शुभ दि. 19, 23

कुंभ :- व्यवसायाशी निगडित उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराल. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक तुम्हाला पेचात पकडतील. शोधमोहिमेत अडथळा येईल. शिक्षणात आळस नको. प्रगतीची संधी सोडू नका. कायद्याच्या कक्षेत राहून निर्णय घ्या. तुम्ही तडफदार काम करू शकाल. व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. मागे राहू नका. लोकप्रियता मिळवाल. लोकांमध्ये मिसळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील. शुभ दि. 20, 23

मीन :- शिक्षणात मोठे यश मिळेल. शोधमोहीम यशस्वी होईल. कोर्ट केस कठीण वाटेल. आपणास नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात. सर्वांशी नम्रपणे बोला. कठोर शब्दात चर्चा करू नका. नेहमी कायद्याने वागा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीने राहा. उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. कठीण प्रसंगात जोडीदाराची खंबीर साथ लाभेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा निष्भ्रम ठरेल. संसारात वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होऊ शकते. कुणालाही कमी समजू नका. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो अनावश्यक खर्च टाळावा. शुभ दि. 18, 21

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -