Eco friendly bappa Competition
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार १७ सप्टेंबर ते शनिवार २३ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य रविवार १७ सप्टेंबर ते शनिवार २३ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : या सप्ताहात मिथुनेत बुध, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव व समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. मंगळवार, बुधवार वाद, गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरू शकतात. लोकप्रियतेचा अनुभव येईल. संसारात चांगली बातमी मिळेल. घर, जमीन खरेदी-व्रिकीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. नवीन ओळख उत्साह वाढवणारी असेल. कोर्टाच्या कामात यश मिळण्याची आशा वाटेल. संशोधनाच्या कामात धावपळ झाली तरी यशस्वी व्हाल. मनाप्रमाणे नोकरीत बदल होऊ शकेल. शुभ दि. १७, २१

- Advertisement -

वृषभ : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात काम मिळवा. थकबाकी मिळवताना संयम ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व राहील. पदाधिकारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी विरोधक, जवळचे लोक कारस्थान करण्याचा संभव आहे. संसारात लक्ष द्या. नाराजी वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. डोळ्यांची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने व्यसन करू नये. भलत्या भानगडीत पडू नये. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. १८, २२

मिथुन : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुधाचे राश्यानंतर, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. तुमचा अती आत्मविश्वास वापरू नका. धंद्यात बदल होण्यास वेळ लागेल. करार घाईत करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दबाव तुमच्यावर राहील. घरातील व्यक्तींची प्रगती सुखावह ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. प्रसिद्धीसाठी कदाचित थांबावे लागेल. कोर्टाच्या कामात सावध रहा. मोठ्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. संशोधनाच्या कामात कष्ट घ्या. यश मेहनतीनेच मिळवा. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. १९, २३

- Advertisement -

कर्क : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पदाधिकार मिळेल. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रेमाला चालना मिळेल. लाभही मिळेल. नोकरीत बदल करता येईल. नोकरीत मोह आवरा. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. वरिष्ठ खूश होतील. व्यसनी लोकांच्या नादी लागू नका. तब्येत सांभाळा. विद्यार्थी वर्गाने मागे राहू नये. प्रगती करावी. शुभ दि. १७, २०

सिंह : या सप्ताहात मिथुन राशीत बुध प्रवेश, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर धावपळ होईल. थकवा वाटेल. धंद्यात फायदा होईल. लवकर धंद्यातील कामे करून घ्या. जमिनीचा व्यवहार संपवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. लोकप्रियता वाढेल. घरगुती समस्या सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. विशेष कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. कोर्ट केस जिंकण्याची शक्यता आहे. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवावी. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. १८, २१

कन्या : या सप्ताहात मिथुन राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. अडचणी येतील. प्रयत्नानेच प्रगती करावी लागेल. धंद्यात काम मिळेल. भागीदाराशी वाद संभवतो. विरुद्धलिंगी व्यक्तीचा मोह ही फसगत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. नातेसंबंध जपावे लागतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. व्यसन करू नका. कोर्टाच्या कामात सावध रहा. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. पण यश मिळू शकेल. जवळचे लोक मदत करण्यात आळस करू शकतात. विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे. खाण्याची काळजी घ्यावी. शुभ दि. १९, २२

तुला : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, शुक्र नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात अडचण येईल. थकबाकी मिळवता येईल. सप्ताहाच्या शेवटी खूशखबर मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांकडून त्रास होईल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर तुमच्यावर आरोप येऊ शकतो. पदाधिकार मिळण्याची आशा दाखवली जाईल. घरातील व्यक्तीचे सहाय्य चांगले मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक झाले तरी प्रगतीची संधी पुढे मिळेल. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. मदतीची अपेक्षा संशोधनाच्या कामात ठेऊ नका. तुमच्या बरोबर स्पर्धा होईल. विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. यश मिळवा. शुभ दि. २०, २३

वृश्चिक : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच धंद्यातील व इतर महत्त्वाची कामे करा. क्षुल्लक कारणाने वाद वाढवू नका. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व राहील. लोकप्रियतेत कमतरता जाणवेल. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. प्रवासात सावध रहा. गुप्त कारवाया करणारे लोक आजूबाजूला असतील हे लक्षात ठेवा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. घरातील वातावरणात नाराजी होऊ शकते. लक्ष द्या. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. शुभ दि. १७, १९

धनु : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. मन धैर्य टिकून राहील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन नीट करा. धंद्यात काम सुरुवातीलाच मिळेल. नाही तरी शेवटच्या दिवसात चांगली संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पद मिळणे सोपे नाही. लोकप्रियता असेल. घरगुती वाद जास्त वाढवू नका. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी विलंब होईल. ओळखी होतील. संशोधनाच्या कामात दिशाभूल होईल. विद्यार्थ्यांनी बेसावध राहू नये. नम्रपणे वागावे. अभ्यासच करावा. शुभ दि. १८, २०

मकर : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. कारस्थाने करणारे लोक आग लावतील. तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. प्रश्न रेंगाळत ठेवण्यापेक्षा मिटवावा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. वाटाघाटीत प्रभाव वाढेल. पद मिळेल. धंदा मिळेल. थकबाकी वसूल करा. घरगुती समस्या किरकोळ असेल. नोकरीत बदल करता येईल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने वेळच्यावेळी परीक्षा देऊन पुढे जावे. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. १९, २१

कुंभ : या सप्ताहात मिथुनेत बुध प्रवेश तुमच्या कायद्याचा ठरेल. शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. थकबाकी मिळवा. नवीन नोकरीत जम बसवण्यास वेळ लागेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मत महत्त्वाचे असले तरी कोणतेही काम सावधपणे करा. तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न होईल. घरगुती समस्या सोडवाल. घर, जमीन घेण्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कष्ट जास्त घ्यावे लागतील. संशोधनाच्या कामात मन स्थिर ठेवा. नम्रपणे वागा. यश येईल. विद्यार्थी वर्गाने ध्येय सोडू नये. शुभ दि. २०, २२

मीन : या सप्ताहात मिथुन राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ समस्या येईल. धंद्यात प्रगती होईल. मागील येणे वसूल करता येईल. नोकरीत बदल करण्याचा विचार करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. पदाधिकार मिळेल. नवी ओळख फायदेशीर ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. घर, वाहन इत्यादी खरेदी-व्रिकीत फायदा होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. शुभ दि. २१, २३

- Advertisment -