मेष ः- जीवनसाथीचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. काही भाग्यवंतांना वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवासाचे योग येतील. क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवू शकता. धंद्यात वाढ होईल. नोकरवर्गाला कडक शब्दांत बोलू नका. मागील वसुली करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. राजकीय-सामाजिक कार्यात यश मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान मिळेल. पूर्वी केलेल्या चुका सुधारण्याची तयारी ठेवा. संसारातील तणाव कमी होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करू शकाल. आपण करीत असलेल्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला कठीण प्रसंगावर मात करता येईल. बोलताना काळजी घ्यावी. शुभ दि. २०, २४
वृषभ ः- आर्थिक गुंतवणूक करणे लाभदायक ठरणार आहे. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा आधार मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेणे उपयुक्त ठरणार आहे. नको त्या प्रलोभनात अडकू नका. मित्रांचे सहकार्य मिळेल. पती-पत्नीमध्ये होणारे गैरसमज टाळावेत. धंद्यात काम मिळवण्यासाठी दादागिरी करून चालणार नाही. तुमची फसगत होऊ देऊ नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायद्याचे पालन करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. राजकीय-सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. लोकांची नाराजी सहन करावी लागेल. वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. प्रवासाचा बेत आखाल. शुभ दि. २३, २४
मिथुन ः- धंद्यात गोड बोला. गिर्हाईकाला समजून घ्या. फायदा वाढेल. नोकरीतील ताण कमी होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व लोकांना वाटेल. त्यामुळे यश मिळवाल. घरातील खरेदी मनाप्रमाणे कराल. कौटुंबिक जबाबदारी नेटाने पार पाडाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. काम यशस्वी करताना वरिष्ठांना मान द्या. तुमचे महत्त्व वाढेल. शिक्षणात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी वेळेवर अभ्यास करावा. तब्येत सांभाळा. खरेदी करताना खिसा , पाकीट सांभाळा. जास्त खर्च होऊ शकतो. कामात जास्त कष्ट पडतील. जोडीदाराने केलेली मदत मोलाची ठरेल. शुभ दि. १८, २१
कर्क ः- फार भावनिक न राहणे आपल्या दृष्टीने ठीक राहील. प्रकृतीस्वास्थ्याला प्राधान्य देऊन वेळीच योग्य उपाययोजना करावी. विरोधकांची धास्ती न बाळगता आपल्या कार्यात अधिक लक्ष द्या. नवे काम मिळवता येईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. मागील येणे वसूल कराल. नोकरीत कामाचा व्याप सहन करावा लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी नको. मन अस्थिर होईल. यश मिळवणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. कला-क्रीडा क्षेत्रात अत्मविश्वासाने पुढे जाल. नवीन परिचय होईल. प्रेमाला चालना मिळेल. काम यशस्वी कराल. शिक्षणात आळस नको. घरातील वडीलधार्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे. शुभ दि. १९, २३
सिंह ः- बराच काळ रेंगाळलेली कामे आता मार्गी लागतील. नशिबाची साथ आपणास मिळणार आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींना मनासारख्या यशाची अपेक्षा ठेवता येईल. मोठे काम मिळेल. वादविवाद जास्त वाढवू नका. मैत्रीचा उपयोग होईल. नोकरी लागेल. प्रयत्न करा. नवा बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव असला तरी यश खेचून आणता येईल. जिद्द ठेवा. मेहनत घ्या. बोलण्यात सावध राहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संसारात मुलांची प्रगती होईल. प्रवासाचा बेत आखाल. घरातील खरेदी मनाप्रमाणे कराल. कठोर बोलणे टाळा. शुभ दि. २२, २४
कन्या ः- व्यापार-व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. अपेक्षित मदतीचा ओघ सुरू होईल. महिलावर्गाची चांगली प्रगती होईल. नवे कपडे, दागिने यांच्या खरेदीचे बेत आखाल. मुलांकडून शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक आताच करून ठेवा. नोकरीत चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. राग अनावर होणारी घटना सप्ताहाच्या मध्यावर घडू शकते. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. संसारात मुलांची मदत मिळेल. मुले प्रगती करतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. खरेदी मनाप्रमाणे होईल. नवीन लोक मदत करतील. शुभ दि. १९, २४
तूळ ः- कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कौटुंबिक वातावरण छान राहील. प्रकृतीची पथ्ये मात्र पाळा. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. शेअर्समध्ये फायदा होईल. येणे वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व दिले जाईल. लोकांचे सहकार्य मिळेल. संसारात सुखद संवाद होईल. रस्त्याने चालताना काळजी घ्या. रागावर ताबा ठेवा. कौटुंबिक वादविवाद टाळा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवी संधी मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. शिक्षणात प्रगती कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. भावनेच्या आहारी जाऊ नये. शुभ दि. २३, २४
वृश्चिक ः- कौटुंबिक जीवन आनंददायी जाईल. मातापित्यांचा स्नेह प्राप्त होईल. नोकरीत सुलभता जाणवेल. तडजोड करावी लागेल. जुनी मैत्री तोडू नका. नवे काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक करू नका. कायदा पाळा. आरोप येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. विरोधक शह देण्याचा प्रयत्न जोरदार करतील. संसारात कामे वाढतील. चिडचिड होेऊ शकते. खरेदी करताना उतावळेपणा नको. खर्च जास्त होईल. प्रवासात सावध राहा. वाहन जपून चालवा. काम यशस्वी करण्याची जिद्द ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रभाव पडेल. स्पर्धा कठीण होईल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. १८, २२
धनु ः- घरासंबंधीची व जमिनीबाबतची प्रकरणे सुटू लागतील. विद्यार्थीवर्गासाठी हा काळ उत्तम राहील. प्रकृतीबाबतची पथ्ये पाळण्यास विसरू नका. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळू शकेल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. कोणतीही चर्चा करताना बोलणे सावधपणे करा. क्षुल्लक गैरसमज होतील. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव दिसेल. लोकांचे सहकार्य मिळेल. छोट्या व्यक्तींना कमी लेखू नका. संसारात सुखद घटना घडेल. खरेदी करताना मनाप्रमाणे वस्तू मिळतील. प्रवासाचा बेत आखाल. कामात दगदग झाली तरी तुम्ही यशस्वी व्हाल. शुभ दि. २०,२१
मकर ः- कोर्टकचेरीच्या कामात सफलता मिळू शकेल. वैवाहिक जीवनातील प्रश्न सामोपचाराने सोडवणेच योग्य राहील. प्रकृती जपा. आताच काही समस्या सोडवल्या जातील. नोकरीनिमित्त परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. यश मिळवाल. बुद्धी, शक्तीचा योग्य तो वापर करा. संसारात मौल्यवान खरेदी कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन परिचय होतील. प्रतिष्ठा मिळेल. चौफेर सावध राहा. कोणतेही व्यसन करू नका. शिक्षणात यश मिळेल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेवू नका. चांगली संगत ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. शुभ दि. १८, २३
कुंभ ः- वैवाहिक व कौटुंबिक जीवनात चांगले बदल संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी संभवतात. धंद्यात वाढ होईल. विरोध मोडून काढता येईल. तुम्ही रागावर ताबा ठेवा म्हणजे तुमचे महत्त्व अधिक राहील. नोकरीतील तणाव कमी होईल. प्रवासात घाई करू नका. दुखापत संभवते. वाहन चालवताना सावध राहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे स्थान पक्के राहील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. प्रयत्नात कसूर करू नका. प्रेमानेच माणसे जोडली जातात. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. घरातील वस्तूंची खरेदी करण्याचा उत्साह राहील. मनाप्रमाणे वस्तू मिळेल. कठीण काम यशस्वीपणे पूर्ण कराल. शुभ दि. २०, २४
मीन ः- कामाचे योग्य नियोजन, योग्य निर्णय ह्या गोष्टी पाळल्यास आपले उद्दिष्ट गाठू शकाल. धंद्यात काम मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. लोकांशी गोड बोला. व्यवहारात भावनांचा गुंता करू नका. काही शुभ समाचार प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात उत्पन्नाचे नवे संकेत प्राप्त होतील. आपल्या मैत्रीत दुरावा येऊ शकतो. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. कायदा पाळा. घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीचे बेत आखाल. नोकरवर्गाची बरीच धावपळ वाढणार आहे. कला क्षेत्राला चांगला वाव मिळेल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. अनाठाई खर्च टाळावा लागेल. शुभ दि. १९, २०