घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार १८ डिसेंबर ते शनिवार २४ डिसेंबर २०२२

राशीभविष्य रविवार १८ डिसेंबर ते शनिवार २४ डिसेंबर २०२२

Subscribe

मेष : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात येणारी समस्या कमी होईल. चर्चा करता येईल. रागाचा पारा वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. नोकरीत फायदेशीर बदल करण्याचा विचार करा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. संसारातील कामे होतील. नातलग भेटतील. दुरावा, गैरसमज दूर करता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग येईल. मान-प्रतिष्ठा वाढेल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. ओळखी वाढतील. काम फत्ते कराल. महत्त्वाचा पराक्रम केल्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. शुभ दि. १८, २१

वृषभ : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. संसारातील वाद जास्त चिघळू देऊ नका. एकमेकांना सावरून घ्या. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. धंद्यात दुर्लक्ष नको. गोड बोलून तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. नवे काम कष्टाने मिळवा. मदत मिळणे कठीण आहे. नोकरीत वरिष्ठांच्या बाजूने बोलावे लागेल. कायदा मोडला जाईल असा निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी करण्याने प्रतिष्ठा बिघडेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कला-क्रीडा-शिक्षणात जिद्दीने यश मिळेल. काम करण्यात अडचणी येतील. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ल्यानेेच बोला. व्यसनाने नुकसान होईल. शुभ दि. १९, २२

- Advertisement -

मिथुन ः या सप्ताहात धनु राशीत बुध वृश्चिक राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यातील परिस्थती सुधारता येईल. अति गोड बोलणार्‍या व्यक्तीसोबत जास्त व्यवहार करू नये. घरात वादविवाद होईल. महत्त्वाची वस्तू विसरू नका. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. जवळचे लोक राजकीय-सामाजिक कार्यात ढवळाढवळ करतील, परंतु प्रतिष्ठा राहील. वरिष्ठ मदत करतील. संयम ठेवा. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगतीची संधी मिळेल. मैत्रीत वाद होईल. कामात यश मिळेल. कुणालाही कमी समजू नका. शुभ दि. २०, २३

कर्क : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिक राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. गोड बोलून स्वतःचे काम करून घ्या. दादागिरीची, गर्वाची भाषा उपयोगी येणार नाही. नोकरीत काम करण्यात चूक होईल. काळजी घ्या. कोर्ट केस कठीण आहे. कमी बोला. योग्य सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला गुप्त कारवायांचा त्रास होईल. जवळचे लोक मदत करू शकतात. संसारात वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. कामात जिद्द ठेवा. यश मिळेल. कला-क्रीडा शिक्षणात कष्टाशिवाय उपाय नाही. मन स्थिर ठेवा.
शुभ दि. २१, २४

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिक राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात अडचण कमी येईल. बोलणी करता येईल. रागावर ताबा ठेवा. वसुली करता येईल. नोकरीत चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करू नका. एखादे गुपित राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रतिष्ठा वाढेल. संसारात खर्च होईल. वस्तू सांभाळा. नातलगांमध्ये गैरसमज होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. काम फत्ते कराल. शुभ दि. १८, २०

कन्या ः या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. अडचणीवर मात करून महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात काम मिळवण्यासाठी प्रयत्न जास्त करावा लागेल. ओळखीचा उपयोग होऊ शकतो. नोकरीत काम वाढेल पण मन स्थिर राहील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व कमीच मिळेल. उशिराने पद मिळू शकेल. कला-क्रीडा-शिक्षणात दुर्लक्ष करू नका. प्रयत्नाने यश खेचता येईल. कोर्ट केसमध्ये बुद्धिचातुर्य वापरा. घाई नको. कामात मेहनत जास्त होईल. यश उशिरा मिळेल. संसारात इतरांचे सहकार्य मिळेल. शुभ दि. १९, २१

तूळ : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदा होईल; पण खर्चही वाढेल. अनाठाई खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांची काळजी घ्या. वसुली करता येईल. नोकरी लागेल. नवीन बदल करता येईल. संसारातील कमतरता भरून काढा. विवाह, संतती प्राप्तीसाठी प्रयत्न यशस्वी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. अधिकार वाढेल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगती चांगल्या प्रकारे होईल. कामात नावलौकिक मिळेल. कोर्ट केस लवकर संपवा. शुभ दि. २०, २२

वृश्चिक : या सप्ताहात धनु राशीत बुध, तुमच्या राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. स्पष्ट बोलणे सप्ताहाच्या सुरुवातीला वादग्रस्त ठरेल. स्पष्ट बोलणे सप्ताहाच्या सुरुवातीला वादग्रस्त ठरेल. कठोर बोलणे घरातही टाळा. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार करता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. मागील बाकी वसूल करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. वरिष्ठांना खूश कराल. राजकीय-सामजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा राखली जाईल. रागावर नियंत्रण ठेवा. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. कला-क्रीडा-शिक्षणात नवी दिशा मिळेल. आळस करू नका. काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. संसारात लक्ष द्या. चांगल्या घटना घडतील. शुभ दि. २१, २३

धनु : या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. तणाव व वादाचा प्रसंग सप्ताहाच्या मध्यावर निर्माण होऊ शकतो. धंद्यात नवे काम शोधता येईल. परिस्थितीत बदल ग्रहणानंतर होईल. नोकरीत नम्र रहा. दुसर्‍याची चूक तुम्हाला दुरुस्त करावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाच्या लोकांचा परिचय होईल. कार्य वेगाने पुढे नेता येईल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगती कराल. लोकप्रियता मिळेल. नवीन ओळखी होतील. प्रेमाला चालना मिळेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. कोर्ट केस संपवता येईल. कठीण काम करून घ्या. शुभ दि. २२, २४

मकर : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुद्ध संतुलन कायम ठेवा. नम्र रहा, उदास होऊ नका. धंद्यात व्यवहारात सावध रहा. हिशोब नीट करा. नोकरी टिकवा. कायदा सांभाळूनच निर्णय घ्या. घरातील जवळच्या व्यक्ती मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रसंगानुरूप वागा. कमी बोला. कोर्ट केस जिंकणे सोपे नाही. दादागिरीची भाषा नको. कला-क्रीडा-शिक्षणात मेहनत घ्या, पुढे जाता येईल. कामात प्रयत्न जास्त करा. यश नक्की मिळेल. दिशाभूल होईल. शुभ दि. १९, २३

कुंभ : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यातील महत्त्वाचा निर्णय घ्या. भावना व व्यवहार यात फरक असतो. मोठे काम मिळेल. संसारात कामे वाढतील. नोकरीत वर्चस्व वाढेल. बढती मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. कोर्ट केस संपवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. अनोळखी व्यक्तीशी जपून रहा. कला-क्रीडा-शिक्षणात यशस्वी व्हाल. काम उत्तमरित्या पूर्ण कराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. शुभ दि. २०, २४

मीन : या सप्ताहात धनु राशीत बुध, वृश्चिकेत मंगळ प्रवेश करीत आहे. ताण-तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. रविवारी वाद होईल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. तब्येत उत्तम राहील. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. प्रयत्न करा. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. नवीन ओळखी कला-क्रीडा क्षेत्रात होतील. संसारात शुभ समाचार मिळेल. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींची काळजी घ्याल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. लोकसंग्रह वाढवता येईल. शिक्षणात मोठे यश मिळेल. कामात प्रगती होईल. तुमचे कौतुक होईल. कोर्ट केस जिंकाल.
शुभ दि. १८, २२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -