घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार १९ नोव्हेंबर ते शनिवार २५ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : रविवार १९ नोव्हेंबर ते शनिवार २५ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष :- या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. कामातील अडचणींवर मात करू शकाल. धंद्यात गोड बोलून वागा. नवा परिचय होईल. मोठेपणा करून उपयोग नाही. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही विचारपूर्वक कार्य पद्धतीची मांडणी करा. तुमचा मुद्दा इतरांना पटणे कठीण आहे. अरेरावी नको. मैत्रीच्या भावनेतून वागा. धंद्यात तात्पुरतीच गुंतवणूक करा. शेअर्समध्ये अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात उतावळेपणा नको. संयम ठेवा. संशोधनाच्या कामात घाई करून प्रश्न सुटेलच असे नाही. वरिष्ठांचा सल्ला घ्या. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. शुभ दि. १९, २३

वृषभ :- या सप्ताहात सूर्य, गुरू युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करू शकाल. घरातील लोकांच्या इच्छेनुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात पूर्वी झालेल्या चुका सुधारून नवे कार्य करता येईल. आळस करू नका. नव्या ध्येयाची तयारी करा. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संसारातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकाल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला उच्च यश मिळवता येईल. तसे प्रयत्न करत रहा. शुभ दि. २०, २४

- Advertisement -

मिथुन :- या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, सूर्य, बुध युती होत आहे. तुमच्या मनाची द्विधा अवस्था होईल. कोणताही निर्णय घेताना मागचा-पुढचा विचार करावा लागेल. मुले साथ देतील. राजकीय-सामाजिक कार्यात कठोर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास समस्या निर्माण होईल. मनाचा खंबीरपणा राहील. धंद्यात मतभेद होईल. गुंतवणूक करण्यात चूक होऊ शकते. शेअर्समद्ये उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोडीने वागा. कोर्ट केसमध्ये प्रभाव टिकवता येईल. संशोधनाच्या कामात वरिष्ठांचा विचार घ्या. विद्यार्थी वर्गाने गर्विष्ठपणा करू नये. अभ्यासात जास्त लक्ष द्यावे.
शुभ दि. २१, २५

कर्क :- या सप्ताहात सूर्य, गुरू युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. किरकोळ मतभेद होतील. कोणताही वाद जास्त वाढवू नका. मंगळवारपासून तुमच्या कार्यातील अडचणी कमी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात ठरविलेली योजना पूर्ण करता येईल. जनहितासाठी चांगले कार्य होईल. धंद्यात वाढ होईल. धंद्यात मोठ्या लोकांच्या मदतीने प्रगतीची संधी मिळेल. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस जिंकता येईल. संशोधनाच्या कामात कौतुक होईल. नोकरी लागेल. परदेशात जाता येईल. शुभ दि. १९, २२

- Advertisement -

सिंह :- या सप्ताहात बुध, मंगळ केंद्रयोग, सूर्य, बुध युती होत आहे. तुम्ही ठरविलेले काम होईल. नातलगांच्या भेटी होतील. उत्साह वाढेल. धंद्यात फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला विचारपूर्वक कामांची आखणी करावी लागेल. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. धंद्यात किरकोळ वाद होईल. ताणू नका. धंदा सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. मित्र मदत करतील. घरातील वृद्ध व्यक्तींसाठी दगदग करावी लागेल. नोकरीत काम वाढेल. संशोधनाच्या कामात चौफेर सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा.
शुभ दि. २०, २३

कन्या :- या सप्ताहात सूर्य, गुरू युती, बुध, मंगळ केंद्रयोग होत आहे. घरातील कामे उत्साहाने पूर्ण होतील. घर, वाहन खरेदी करण्यासाठी शोध घेता येईल. धंद्यात सुधारणा होईल. मैत्रीपूर्ण भाषेत जरब वाढवता येईल. धंद्यात प्रगती करा. थकबाकी मिळवा. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी नम्रता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात तडफदार काम कराल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. संशोधनात कौतुकास्पद काम कराल. विद्यार्थी वर्गाने स्वतःच्या ध्येयासाठी झगडावे. मागे राहू नये. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. संशोधन कार्यात पुढे जाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करू शकाल. शुभ दि. २१, २४

तूळ :- या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, बुध युती होत आहे. रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. धंद्यात मोठा फायदा होईल. नवीन ओळख वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतः पुढाकार घेऊन कार्यात जोरात सुरुवात करा. लोकांचे व वरिष्ठांचे विचार समजून घ्या. धंद्यात प्रयत्नांचा वेग वाढवा. घर, जमीन, वाहन इत्यादी खरेदी-विक्रीत यश मिळेल. घरात शुभ समाचार मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. मार्गदर्शन मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. शुभ दि. २२, २५

वृश्चिक :- या सप्ताहात बुध, मंगळ केंद्रयोग, सूर्य, बुध युती होत आहे. घरातील प्रश्न विचार करून सुटेलच असे नाही. दडपणाखाली राहू नका. नम्रतेने बोला. धंद्यात आळस नको. राजकीय-सामाजिक कार्यात मागे न राहता नव्या पद्धतीने कार्य करा. जवळच्या लोकांचा त्रास होईल. धंद्यात कष्ट घ्या. यश मिळेल. कामात उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कर्जाचे काम होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागू शकते. मोठे लोक तुम्हाला आश्वासन देतील. कोर्ट केसमध्ये संयमाने प्रकरण सोडवा. संशोधनाच्या कामात धागादोरा मिळेल. घरातील ताण कमी होईल. पुढे जाता येईल. शुभ दि. १९, २१

धनु :- या सप्ताहात बुध, मंगळ केंद्रयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. नातलगांच्या भेटी घेता येतील. कठीण कामाची चर्चा सफल होईल. महत्वाची वस्तू शोधून काढता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात नुसते बोलून चालणार नाही. प्रत्यक्ष कार्य करावे लागेल. वरिष्ठांच्या बरोबर खंबीरपणे बोला; पण गर्विष्ठपणाने नको. धंद्यात अडचणी येतील. सप्ताहाच्या मध्यावर कोर्ट केसमध्ये चिंता वाढेल. नोकरीत नम्रता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. संधीची वाट पहावी लागेल. घरातील वाटाघाटीसाठी तटस्थपणे चर्चा करा. परीक्षेसाठी मुलांनी फाजिल आत्मविश्वास न ठेवता अभ्यास करावा. शुभ दि. २०, २२

मकर :- या सप्ताहात सूर्य, गुरू युती, बुध, मंगळ केंद्रयोग होत आहे. रविवारी विचारांचा गुंता वाढेल. खर्च होईल. मनाप्रमाणे घटना घडणे कठीण आहे, जिद्द फार महत्वाची ठरेल. डोळ्यांची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात या सप्ताहात प्रगतीची संधी मिळेल. दगदग जास्त होईल. चिडचिडेपणाने नुकसान होईल. सर्वत्र संयमाने वागून कामे करा. धंद्यात वाढ होईल. प्रवासात सावध रहा. शेअर्समध्ये घाईने निर्णय घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टसंबंधीच्या कामात विचारपूर्वक वागा. संशोधनाच्या कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत प्रगतीकारक घटना घडेल. शुभ दि. २१, २३

कुंभ :- या सप्ताहात सूर्य, बुध युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. कामांचे नियोजन केल्यास अनेक कामे होतील. चपळता वाढेल. प्रकृती सुधारेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात विचारपूर्वक योजना बनवा. वेळ फुकट जाऊ देऊ नका. प्रतिष्ठा वाढेल. अधिकार मिळेल असा प्रयत्न करत रहा. सप्ताहाच्या मध्यावर विरोधकांना स्पष्ट शब्दात बोलण्याची वेळ येऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पैसा मिळेल. कोर्ट केसमध्ये जिंकता येईल. नोकरीसाठी चांगला प्रयत्न करू शकाल. परीक्षेत चमकदार यश मिळवता येईल. शुभ दि. २२, २४

मीन :- या सप्ताहात सूर्य, गुरू युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. कामे वाढतील. धंद्यात वेळ कमी पडेल. कठीण कामे करता येतील. सहकारी कामात मदत करतील. थकबाकी वसूल करता येईल. प्रेमाने बोला. सर्वांना जिंका. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला महत्वाची घटना घडेल. चर्चा सफल होईल. धंद्यात जम बसेल. घरात सप्ताहाच्या शेवटी तणाव व गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. यशाचा किरण दिसेल. संशोधनात दिशा मिळेल. नोकरीतील समस्या कमी होईल. शुभ दि. २३, २५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -